इयत्ता – सातवी
विषय – विज्ञान
घटक 10 : – वनस्पतीमधील पुनरुत्पादन
अध्ययन निष्पत्ती : 25 फुलांमध्ये चालणारा लैंगिक पुनरुत्पादन टप्पा
समजून घेणे.
कृती 25.1
(1) विविध
फुलांचे निरीक्षण करून त्यातील केसर आणि किंजल्क भाग ओळखणे.
उत्तर – गुलाब,मोगरा,जास्वंद या फुलांची निरीक्षण करून केसर आणि किंजल भाग
ओळखणे.
2) फुलांचे
परागीभवन यावर आधारित व्हिडीओ पाहून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
3) स्त्री युग्मक आणि पु युग्मक यांच्या संयोगाला फलन म्हणतात.
4) परागकणांना पु म्हणतात.
5) बिजांडामध्ये स्त्री युग्मके असतात.
कृती 25.2: चित्राचे निरीक्षण
करून खालील क्रियांचे टप्पे ओळखा..
मूल्यमापन
1) निसर्गामध्ये
विविध ठिकाणी एका जातीची झाडे वाढलेली दिसतात. पण बीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
स्थलांतर कसे होतात ?
उत्तर- हवेमुळे किंवा वाहत्या पाण्यामुळे प्राण्यांच्या गवत
चालल्यामुळे मनुष्याच्या फिरण्यामुळे फळांच्या बिया स्थलांतरित होतात.
2) एका झाडाचे
बीज त्याच ठिकाणी एकत्र पडून तेथेच वाढले काय होईल ? विचार करा.
उत्तर- एकाच झाडाचे बीज त्याच ठिकाणी एकत्र पडून जर वाढले तर एकाच
ठिकाणी झाडांची गर्दी होईल व कोणत्याही झाडाची वाढ व्यवस्थित होणार नाही.
3) बीज
प्रसारण हे वनस्पतीला कसे सहाय्यभूत ठरते?
उत्तर – एकाच जागी
गर्दी होणे सूर्यप्रकाश पाणी खनिजे यासारखे होणारी स्पर्धा कमी होते वनस्पतींना
नवनवीन वास्तु स्थळे मिळतात.
4) वनस्पतीच्या
पुनरुत्पादनासाठी संबंधित असणारे शब्द शोधा.
फूल
केसर
स्त्रीकेसर
बीज
परागवाहिनी
बिजाके
पराग
5) परागकणांचे
वहन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे होते याचे विवरण करा.
उत्तर – वनस्पती फळे आणि बिया यांचे वहन वारा,प्राणी आणि पक्षी
यांच्यामुळे होते.मॅपल आणि शेवग्याच्या बियांसारख्या पातळ पापुद्रांनी
आच्छादलेल्या बिया आणि गवताच्या हलक्या बिया व सूर्यफुलाची केसाळ फळे यासारख्या
बिया जोराच्या वाऱ्याने दूरपर्यंत उडून जातात. काही बिया पाण्यामुळे वाहून
विखुरल्या जातात.ही फळे किंवा बिया यांच्या विशिष्ट रचनेमुळे सहजपणे तरंगू शकतात
काही बी या प्राण्यांमुळे विखुरलं जातात विशेषतः काटेरी कोस असलेल्या बिया
प्राण्यांच्या केसांमध्ये अडकून दूरपर्यंत वाहून नेला जातात उदाहरणार्थ दुतोंडी
आणि रानभेंडी.