ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಲಿ
ಕೆಎಸ್ಕ್ಯುಎಎಸಿ, ಮಲ್ಲೇಶ್ವರಂ, ಬೆಂಗಳೂರು-560003.
KARNATAKA SCHOOL EXAMINATION AND ASSESSMENT BOARD KSQAAC, Malleshwaram, Bengaluru-560003.
ಮೌಲ್ಯಾಂಕನ ಮಾರ್ಚ್ 2024 ಮಾದರಿ ಪ್ರಶೋತ್ತರ ಪತ್ರಿಕೆ
Assessment – March 2024 Model Paper
Class : 8
Subject : Physical Education
Marks: 60
Time -2.30 hours
I योग्य पर्याय निवडा व उत्तर लिहा. 8 x 1 = 8
1. शारीरिक तंदुरुस्तीचे घटक
(A) ताकद
(B) सहनशक्ती
(C) लवचिकता
(D) वरील सर्व
2. ‘हॉकेट‘ या शब्दाशी संबंधित खेळ
(A) हॉकी
(B) व्हॉलीबॉल
(C) क्रिकेट
(D) कबड्डी
3. उंच उडीमध्ये विशिष्ट उंची पर्यंत उडी मारण्यासाठी दिल्या जाणाऱ्या
प्रयत्नांची संख्या-
(A) 1
(B) 2
(C) 3
(D) 4
4. अष्टांग योगाचा तिसरे अंग हे आहे.
(A) आसन
(B) समाधी
(C) यम
(D) प्रत्याहार
5. सकारात्मक भावनांचे योग्य उदाहरण आहे
(A) शत्रुत्व
(B) प्रेम
(C) रागावणे
(D) मत्सर
6. शटलमधील पंखांची संख्या आहे
(A) 14
(B) 16
(C) 18
(D) 20
7. जेंव्हा मोठा मेंदू आपले कार्य थांबवतो त्या स्थितीला म्हणतात..
(A) तहान
(B) अशक्तपणा
(B) उलट्या होणे
(D) बेशुद्ध होणे
8. राष्ट्रगीताच्या गायल्या जाणाऱ्या एकूण ओळी –
(A) 10
(B) 13
(C) 15
(D) 18
II 9.स्तंभ-अ ची
खालील माहिती वाचा आणि स्तंभ-ब मध्ये दिलेल्या अचूक माहितीशी जुळवा, उत्तरे
त्याच्या पर्याय संकेतासह लिहा: 6 x 1 = 6
स्तंभ-अ स्तंभ- ब
i) शारीरिक क्रिया a. 07 खेळाडू
ii) हँडबॉल b. 42.195 मीटर
iii) बास्केट बॉल c. सहाना कुमारी
iv) मॅरेथॉन d. 07 ऑगस्ट 1906
v) उंच उडी e) 28 * 15 मीटर
vi) राष्ट्रध्वज प्रथम फडकविण्यात आला f. दीर्घकाळ आरोग्य उत्तम राहते.
g. 24 जानेवारी 1950
III खालील प्रश्नांची उत्तरे एक किंवा दोन वाक्यात द्या: 8 x 2 = 16
10. व्हॉलीबॉल क्रिडांगणाचा आकार कसा असतो?
11. व्हॉलीबॉल खेळासाठी आवश्यक साधनांची दी करा.
12. “थ्रो ऑफ” हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो?
13. बास्केटबॉल मध्ये “फ्री थ्रो” साठी किती गुण दिले जातात?
14. बॅडमिंटनमध्ये खेळाडूंचे गुण सम संख्येत झाल्यास क्रिडांगणाच्या कोणत्या बाजूने सर्व्हिस केली पाहिजे?
15. मध्यम आणि लांब पल्ल्याच्या शर्यतींमध्ये अंतिम निकाल कोण घोषित करतो?
16. उंच उडीतील कोणतीही एक चूक लिहा.
17. भावना म्हणजे काय?
18. राष्ट्रध्वजाची निर्मिती कोणी केली?
19. राष्ट्रगीत गाण्यासाठी वेळेची मर्यादा किती आहे?
IV. खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात उत्तरे द्या: 8 x 2 = 16
20. शारीरिक व्यायामामुळे तुम्हाला कोणते फायदे होतात?
21. हॉकीमधील गोलरक्षकाच्या संरक्षणासाठी आवश्यक साधनांची यादी करा?
22. हँडबॉलमध्ये दंड आकारण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.
23. बास्केटबॉल खेळातील नियम उल्लंघनाचे प्रसंग लिहा.
24. बॅडमिंटनमध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनांची यादी.
25. प्राणायामाची तयारी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राला कोणत्या सूचना द्याल ?
26. सकारात्मक भावना असलेल्या लोकांमध्ये तुम्ही कोणते मुख्य गोष्टी दिसून येतात?
27. तुमचा मित्र खेळाच्या मैदानात बेशुद्ध झाला तर तुम्ही कोणते प्राथमिक उपचार कराल?
V खालील प्रश्नांची उत्तरे पाच ते सहा वाक्यात द्या. 4 x 3 = 12
28. ऑलिम्पिकमध्ये हँडबॉल खेळाचा समावेश कसा करण्यात आला?
29. बास्केटबॉल खेळासाठी आवश्यक असलेल्या क्रीडा उपकरणांची यादी करा.
30. बॅडमिंटन हे नाव कसे मिळाले?
31. मध्यम आणि लांब पल्ल्याच्या शर्यती कोणत्या?
VII. क्रीडांगणाची आकृती काढून त्यांचे मोजमाप व आणि भाग दाखवा: 2×4=8
32. व्हॉलीबॉल क्रीडांगण
33. हॉकी क्रीडांगण