abc
>
इयत्ता - सहावी
विषय - समाज विज्ञान
अध्ययन अंश 15- स्थानिक सरकार
अध्ययन निष्पत्ती 15: स्थानिक सरकार निवड आणि प्रमुख जबाबदारी ओळखणे.
कृती :1 चित्रावरून चर्चा करा.हे चित्र पाहून समजले आहे ते लिहा.
1) वरील चित्रामध्ये असलेल्या प्रसंग तुम्ही सर्वजण पाहिला आहात का ? चर्चा करा व लिहा.
होय
ग्रामपंचायतचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील सर्व मतदार गावातील समस्यांवर चर्चा करतात.
2) वर दिलेल्या ग्राम / वार्ड सभेचे चित्र आहे या ग्राम / वार्ड सभेमध्ये तुम्ही ऐकला आहे काय?
होय, ग्राम सभेत गावातील सर्व मतदार गावातील समस्यांवर चर्चा करत करतात.
3) तुमच्या गावांमध्ये ग्रामसभेमध्ये सर्वजण भाग घेतात ? ते सांगा.
गावातील अठरा वर्षे पूर्ण झालेले व्यक्ती या ग्रामसभेत भाग घेतात.
4) ग्रामसभेला लोक का जातात ? येथे कोण कोणत्या गोष्टीवर चर्चा केली जाते ? ते लिहा
ग्रामसभेला लोक गावातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी, विविध योजना व त्यांच्या लाभार्थ्यांची नावे सुचवण्यासाठी जातात.
♦या ग्रामसभेत खालील विषयांवर चर्चा केली जाते.♦
ग्रामपंचायतच्या विकास कामांची मंजुरी देणे.
सरकारच्या विविध विकास कामांची माहिती देणे.
विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची नावे सुचविणे. इत्यादी.
कृती : 2 आमच्या स्थानिक ग्राम पंचायतीमद्ये चाललेली ग्राम / वार्ड सभेमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली आणि कोणता निर्णय घेतला यादी करा. (पालक किंवा स्थानिक ग्रामपंचायत सदस्याचे सहाय्य घ्या.)
दिनांक :
भाग घेतलेल्यांची नावे :
गावातील सर्व मतदार
पिडीओ आणि कार्यदर्शी
ग्रामपंचायत अध्यक्ष आणि सदस्य
ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग
चर्चा केलेले विषय -
विविध वस्ती योजना स्थानिक समस्या
गटारी व रस्ते निर्माण याविषयी
मूलभूत समस्यांबद्दल चर्चा
विविध सरकारी योजनांबद्दल चर्चा व माहिती.
घेतलेले निर्णय -
वरील विषयांवर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात आले.
वस्ती योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे.
बस स्थानकापासून नदीपर्यंतचा रस्ता पेव्हर ब्लॉक घालणे.
विविध सरकारी योजनेतील लाभार्थ्यांबद्दल चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
कृती : 3 शिक्षकांच्या सहकार्याने मुलांची सभा तुमच्या शाळेमध्ये आयोजन करून सभेला पंचायत सदस्य आणि अधिकारी वर्गाबरोबर संवाद करा.
लक्षात ठेवा : ग्राम/वार्ड स्तरावर समस्येवर चर्चा करण्यासाठी आणि विकास कामाचा निर्णय घेण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे.शहरांमध्ये यांना वार्ड सभा म्हणतात वार्ड सभामध्ये निवडून आलेले सदस्य आणि त्या व्यक्तीमधील येणारे मतदारभाग घेऊन वार्डच्या विकासाबद्दल चर्चा करतात.
कृती : 4 तुम्हाला माहित आहे ?समजून घेऊया
मुलांनो,
1) तुमच्या घराला - गल्लीला पाणी कोण वितरित करते? - ग्रामपंचायत
2) तुमच्या घराच्या जवळच कचरा कोण घेऊन जाते ? - ग्रामपंचायत
3) तुमच्या घराजवळ गटारी कोण स्वच्छ करतात? - ग्रामपंचायत
4) तुमच्या घराचा फाळा (कर ) / पाण्याचा कर कोठे भरता ? विचारून सांगा. - ग्रामपंचायत
5) तुम्ही कोणत्या स्थानिक संस्थेमध्ये येता ? सांगू शकता ? ग्रामीण की नगर - ग्रामीण
6) तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधीचे नाव सांगा. त्यांची निवड कशी झाली आहे ?
श्री.....................
निवडणुकीतून
कृती : 5 खालील तक्त्याचे निरीक्षण करा. स्थानिक सरकारबद्दल चर्चा करून समजून घ्या.
कृती : 1 आमच्या स्थानिक प्रतिनिधीशी भेट देऊया.
आमच्या स्थानिक संस्थेला प्रतिनिधीशी भेट घेऊन भेटल्यावर चर्चा करा.
उत्त्तर -
उत्त्तर - लोकांना सरकारी योजनांची माहिती देणे.
लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या त्यावर उपाय करणे.
3) स्थानिक सरकार निवडणूक लढविण्यासाठी पात्रता कोणती ?
उत्त्तर - भारताचा नागरिक असावा.
घरामध्ये शौचालय असावे.
गुन्हेगार व्यक्ती नसावा.
4) तुम्हाला कोणत्या प्रकारे निवड करण्यात आली आहे ?
उत्त्तर - माझी निवड निवडणुकीतून झाली आहे.
400 - 500 लोकसंख्येला एक वार्ड असे विभाग करून त्या वार्डामध्ये निवडणूक घेण्यात आली.
5) तुमचे सदस्यत्व किती वर्षांचे असते ?
उत्त्तर - 5 वर्षे
6) तुमच्या माहितीप्रमाणे ग्राम/वार्डमधील समस्या कोणत्या ?
पिण्याच्या पाण्याची स्वच्छता समस्या
स्वच्छतेची समस्या
रस्त्यांची समस्या
पथदिपांची समस्या
कचरा विल्हेवाटीची समस्या.
7) तुमच्या विकासासाठी तुम्ही कोणती कामे करत आहात ?
गावाचे विकासासाठी गाव स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे.यासाठी विविध युवक मंडळाचे गट करून त्याद्वारे गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्व समजून सांगण्यात येत आहे.
गावातील तरुणांच्या श्रमदानातून अनेक लोकोपयोगी कामे करण्यात येत आहेत.
कृती : 2
तुम्ही येत असलेल्या स्थानिक संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि कर्मचारी वर्ग नावाची यादी करा.
कृती 3 - आमच्या स्थानिक संस्थेला एकदा भेट देऊया
तुमच्या जवळच्या संस्थेला भेट द्या तेथील व्यवस्थापक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
नमस्ते सर,
1) तुमचे नाव काय आहे सर ?
उत्त्तर - श्री.
2) तुमचे ग्राम /पट्टण /पंचायत / पूरसभा / नगर सभा / महानगरपालिका पर्यंत आम्ही मुलांच्या वेगवेगळ्या विकास योजना कोण कोणत्या राबविता ?
उत्त्तर -
गरीब विद्यार्थी गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी विषयक कार्यक्रम घेण्यात येतात.
झाडे,पाणी व अरण्य यांच्या संरक्षणाविषयी उपक्रम घेण्यात येतात.
3) तुमच्या ग्राम / पट्टण /पंचायत / पूरसभा / नगर सभा / महानगरपालिका लोकांच्या कल्याणासाठी कोणकोणत्या योजना राबविता ?
उत्त्तर -
आरोग्य आणि कुटुंब कल्याण योजना राबविण्यात येत आहे.
माझ्या वार्डातील स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
कृती 4 प्रश्नांची उत्तरे लिहा
1) स्थानिक संस्थेचा सदस्य कोण निवडतो ?
a) 18 वर्षावरील नागरिक
b) सरकार नेमणूक करते
c) गावातीलप्रमुख व्यक्ती
d) अधिकारी
उत्तर -a) 18 वर्षावरील नागरिक
2) स्थानिक सरकारी सदस्य होण्यासाठी कोणती पात्रता पाहिजे ?
a) 21 वर्षे पूर्ण झाले पाहिजे
b) 18 वर्षे पुर्ण असले पाहिजे
c) अपराधी असला पाहिजे
d) परदेशी नागरिक असला पाहिजे
उत्तर - a) 21 वर्षे पूर्ण झाले पाहिजे
3) स्थानिक सरकारचे कार्य कोणते ते सांगा.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे आयोजन करणे.
प्राथमिक,माध्यमिक आणि अनौपचारिक शिक्षण पद्धतीला प्रोत्साहन देणे.
सर्व प्रकारचे प्रदूषण टाळणे आवश्यक उपयोगी वस्तूंच्या सवलती पुरविणे.
पंचायतीची मालमत्ता, सुव्यवस्थित आणि सुरक्षित ठेवणे जन्ममृत्यूची नोंद ठेवणे.
बाजाररस्त्यावरील दिवे,वाचनालय इत्यादी सेवा पुरविणे अनुसूचित जाती,जमाती यांच्या फायद्यांच्या कल्याणकारी योजना राखणे.
कर आणि दंड गोळा करणे.
सरकारच्या बऱ्याच कल्याणकारी योजनांसाठी लाभार्थी शोधणे.
4) स्थानिक सरकार सबंधित खालील कामे बरोबर की चूक ओळखा व लिहा.
1. ग्रामसभेला अध्यक्षस्थान ग्रामपंचायत अध्यक्ष असतो. (बरोबर)
2. ग्रामपंचायत पी.डी.ओ. मतदानाची निवड करतात. (चूक)
3. ग्रामसभेमध्ये निवडून आलेले सदस्यांनी फक्त भाग घेतात.(चूक)
4. ग्रामपंचायतीला घर फाळा आणि पाणी कर गोळा करण्याचा अधिकार आहे.(बरोबर)
5. गावच्या आरोग्य स्वच्छता करण्याचे काम ग्रामपंचायतीचे नाही.(चूक)
6. स्थानिक संस्थेमध्ये असलेल्या ग्रंथालयाचा लाभ घेऊ शकतो.(बरोबर)
7. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.(बरोबर)
कृती 5:स्थानिक संस्थेने केलेली विकास कामे वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातमीची कारणे संग्रह करा शिक्षकांचे सहाय्य घेऊन वर्गात चर्चा करा. तालुका आणि जिल्हा पंचायतीचे कार्य समजून घेऊया.