इयत्ता – आठवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – २०२२ सुधारित
विषय – स्वाध्याय
भूगोल
प्रकरण 23.
वातावरण
पाठ 23 . वातावरण
I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1.नायट्रोजन व ऑक्सिजन हे वातावरणातील दोन प्रमुख वायू आहेत.
2. तपांबर किंवा क्षोभावरण हा वातावरणातील सर्वात खालचा थर आहे.
3. समुद्र सपाटीला वातावरणातील हवेचा दाब सरासरी 1013.25 मि.बा. इतका असतो.
4. पश्चिम वाऱ्यांना प्रतिव्यापारी वारे असेही म्हणतात.
5. हवेच्या शास्त्रीय अभ्यासाला हवेचे शास्त्र (मेट्रोलॉजी) म्हणतात.
II. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
6. वातावरण म्हणजे काय ?
उत्तर –पृथ्वीच्या सभोवती असणाऱ्या धूलिकण आणि बाष्प वायू,यांचा पातळ थर म्हणजे वातावरण होय.
2. वातावरणातील विविध स्तरांची नावे लिहा.
उत्तर – 1.तपांबर किंवा क्षोभावरण (Troposphere)
2.स्थितांबर )Stratosphere)
3.मध्यांबर )Mesosphere)
4.उष्णांबर )Thermosphere)
5.बाह्यांबर) Exosphere)
3. ‘ओझोन‘ च्या थराचे महत्व कोणते ?
उत्तर–पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 50 किलोमीटर पर्यंत पसरलेल्या स्थिताभरात ओझोन वायू अत्यंत महत्त्वाचा आहे कारण ओझोन वायू सूर्यापासून येणारे अतिनील किरण (अल्ट्राव्हायोलेट) शोषून घेतो आणि पृथ्वीवरील सर्व जीवांचे रक्षण करतो. हा थर ढग आणि हवामानाच्या इतर घटकांपासून मुक्त असतो.त्यामुळे जेट विमानांच्या वाहतुकीसाठी उपयुक्त आहे.असे ओझोन थराचे महत्व आहे.
4.कमी भाराचा शांत पट्टा )Doldrum) म्हणजे काय ? तो कोठे आहे?
उत्तर– विषुववृत्ताजवळील उष्ण,उबदार आणि अत्यंत शांत असणाऱ्या प्रदेशाला कमीभाराचा शांत पट्टा (Doldrum) असे म्हणतात .तो विषुववृत्तापासुन दोन्ही बाजूला म्हणजे उत्तरेस व दक्षिणेस 50 अक्षांशापर्यंत आढळतो.
5. नियमित वाऱ्यांचे प्रकार कोणकोणते ?
उत्तर – व्यापारी वारे,प्रति व्यापारी वारे,ध्रुवीय वारे हे नियमित वाऱ्याचे प्रकार आहेत.
6. स्थानिक वारे म्हणजे काय ? दोन उदाहरणे द्या.
उत्तर – स्थानिक तापमान आणि हवेच्या दाबातील बदलामुळे कमी वेळात वेगवेगळ्या दिशांकडून वाहणाऱ्या वाऱ्यांना स्थानिक वारे म्हणतात.. उदा.
उदा लू, चिनुक, फॉन, सिरोक्का
7. ढगांचे वेगवेगळे प्रकार कोणते ?
उत्तर– स्तरमेघ , पुंजमेघ,तंतू मेघ, निम्बस मेघ हे ढगांचे प्रकार आहेत.
8. हवा आणि हवामान यातील फरक स्पष्ट करा.
हवा | हवामान |
एखाद्या ठिकाणची ठराविक वेळेची अल्पकालीन वातावरणाची स्थिती म्हणजे हवा. | एखाद्या प्रदेशाचे अनेक दिवसांच्या किंवा दीर्घकालीन हवेतील अवस्थेचे सरासरी प्रमाण म्हणजे हवामान. |
हवेच्या शास्त्रीय अभ्यासाला हवेचे शास्त्र म्हणतात. | हवामानाच्या शास्त्रीय अभ्यासाला हवामान शास्त्र म्हणतात. |
ज्वालामुखीचा उद्रेक हा हवेचा परिणाम आहे. | जगातील अनेक पिकांवर हवामानाचा परिणाम होतो. |
एखाद्या ठिकाणाची हवा ही अल्पकालीन वातावरणाची स्थिती असते. | एखाद्या देशाचे किंवा विभागाचे हवामान हे दीर्घकालीन हवेतील अवस्थेचा परिणाम |
III. खालील पदांचा अर्थ सांगा.
1. आयनांबर (Inosphere) आयनांबर म्हणजे अधिक उष्णतेचा परिणाम म्हणून हवेच्या अणूंचे आयनामध्ये परिवर्तन होणे.
2. नित्य तापमान घट )Normal lapse rate) जसे उंचीवर जावे तसे तापमान कमी कमी होत जाते.याला ‘नित्य तापमान घट‘
म्हणतात.
3. शीतवलय (Frigid region) पृथ्वीवरील उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवा दरम्यानचा अत्यंत थंड प्रदेश .
4. अश्व अक्षांश (Horse latitudes) – दक्षिण उपउष्णकटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा अश्व अक्षांश या नावाने लोकप्रिय आहे.
5. आरोह पाऊस (Orogaphic rainfalls) उंचवट्याच्या अडथळ्यामुळे हा पाऊस पडतो म्हणून अशाप्रकारे पडणाऱ्या पावसाला प्रतिरोध पर्जन्य म्हणतात.
6. हवामान शास्त्र (Climatology) हवामानाच्या शास्त्रीय अभ्यासाला हवामान शास्त्र (Climatology) म्हणतात.
वरील प्रश्नोत्तरे pdf स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा..