2022-23 शैक्षणिक वर्षात इंद्रधनुष्य कार्यक्रम आयोजीत करणेबाबत…..
आदेश दि. 13.05.२०२२
प्रस्तुत 2022-23 सालातील शैक्षणिक उपक्रम/ क्रियाकलाप अत्यंत परिणामकारकपणे आयोजित करून मागील तीन वर्षातील अध्ययन कमतरता भरून काढणे गरजेचे आहे.या उद्देशाने प्रस्तुत 2022-23 वर्षात सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयत्ता १ली ते ९वी च्या वर्गांसाठी अध्ययन पुनर्प्राप्ती हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच मुलांच्या अध्ययन अभिवृद्धीसाठी प्रस्तुत 2022-23 हे वर्ष ‘अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष’ असा संकल्प करण्यात आला आहे.
अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमाच्या पूर्वतयारीसाठी शाळेत
शाळा प्रारंभ एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करावा यासाठी विद्यार्थ्यांना आवडीचे
उपक्रम शाळेत आयोजित करावे हा उद्देश समोर ठेवून शाळेतील विद्यार्थ्यांना आनंदित
वातावरण निर्माण होण्यासाठी शाळा प्रारंभापासूनच पहिले दोन आठवडे इंद्रधनुष्य
कार्यक्रमाची योजना करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी वर्गात मुक्तपणे सहभागी व्हावे यासाठी हा
कार्यक्रम असून विद्यार्थ्यांची विचार व कल्पना यांना वा मिळावा यासाठी कोणताही
व्यत्यय न आणता आवश्यक नियोजन करावे आणि वर्गात सर्वसमावेशक वातावरण निर्माण
करावे.
इंद्रधनुष्य कार्यक्रमांतर्गत 14
दिवसांचे उपक्रमांचे नियोजन थोडक्यात खालील प्रमाणे अधिक
माहितीसाठी इंद्रधनुष्य हस्तपुस्तिका पहावी..
पहिला दिवस – क्रीडा उत्सव
दुसरा दिवस – खेळासाठी खेळणी बनवणे
तिसरा व चौथा दिवस – नाटकोत्सव
पाचवा दिवस – चित्र रेखाटन कला समारंभ
सहावा दिवस – चित्र जगत
सातवा दिवस –कथा उत्सव
आठवा दिवस – कविता रचूया – गाणी गाऊया
नववा दिवस – परिसर उत्सव
दिवस दहावा- गणिताच्या गंमती
अकरावा दिवस – इतिहासाचा उत्सव
बारावा दिवस – स्वयंपाक खोलीतील विज्ञान
तेरावा दिवस – सांस्कृतिक सोहळा
चौदावा दिवस – शाळा सजावट
वरील सर्व उपक्रमांची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे -:
पहिला दिवस – क्रीडा उत्सव
खेळ म्हटले की मुले त्याकडे
आकर्षित होतातच त्यामुळे मुलांमध्ये उत्साह निर्माण होतो म्हणून पहिल्या दिवशी
मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळ आयोजित करावे.
दुसरा दिवस – खेळासाठी खेळणी बनवणे
सुलभरीत्या उपलब्ध वस्तूंचा उपयोग
करून सोपी खेळणी करून व त्यांचा उपयोग करून खेळ खेळण्यास मार्गदर्शन करणे.
तिसरा व चौथा दिवस – नाटकोत्सव
नाटकाची तयारी करणे.नाटकासाठी पात्रांची तयारी व पात्रांचा परिचय करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ देणे. त्यांनी पाहिलेल्या आवडलेल्या भूमिकांची तयारी करण्यासाठी संधी द्यावी.नाटकासाठी आवश्यक स्वतः ची वेशभूषा, चेहरा सजावट,गाणी, नृत्य,व्यासपीठ इत्यादी तयारी विद्यार्थ्यांनी स्वतः करावी विद्यार्थ्यांनी स्वतः गटानुसार नाटकाची तयारी करावी.शिक्षकानी विद्यार्थ्यांना नाटक प्रदर्शनास संधी द्यावी.
पाचवा दिवस – चित्र रेखाटन कला समारंभ
असा उद्देश ठेवून आपल्या आसपास असणाऱ्या टाकाऊ वस्तू घेऊन
त्यापासून शोभिवंत वस्तू बनवणे व रंगवणे.
सहावा दिवस – चित्र जगत
पेपर,ब्रश,रंग,पेन्सिल,स्केच
इत्यादींचा वापर करून स्वतःच्या भावना,विचार,सृजनात्मकता यांचा उपयोग करून सुंदर पद्धतीने चित्र
काढण्यास सांगणे.
सातवा दिवस – कथा उत्सव
मुलांची सृजनशीलता,कल्पनाशक्ती,भाषा अभिव्यक्ती यांचा उपयोग करुन सरळ साध्या कथा तयार
करण्यास प्रोत्साहन देणे.विद्यार्थ्यांची इयत्ता व आवड यांचा विचार करून
इंद्रधनुष्य हस्तपुस्तिका दिलेल्या योग्य विषय निवडून कथा रचण्यात प्रोत्साहन
देणे.
आठवा दिवस – कविता रचुया – गाणी गाऊया
मुलांना दिलेल्या संदर्भ आणि शब्द
यांच्या मागणीवरून स्वतःची कविता तयार करण्यास सांगणे व त्यांच्या आवडीच्या चालीत
गाण्यास सांगणे.
नववा दिवस – परिसर उत्सव
त्यांची यादी तयार करणे. वनस्पती-प्राण्यांचे संरक्षण व ‘चला निसर्गाकडे जाऊया‘ या शीर्षकाखाली नैसर्गिक
वस्तू वापरून रंग तयार करण्याची कृती आयोजीत करणे.
दहावा दिवस – गणिताच्या गंमती
विद्यार्थ्यांना गणित विषयाच्या
भितीवर मात करण्यासाठी आणि गणित हा फक्त एक खेळ आहे असे वाटावे यासाठी गणितातील
गंमतीदार कृती घेणे. गणिताच्या गंमतीदार कृती इंद्रधनुष्य हस्तपुस्तिकेत देण्यात
आलेल्या आहेत.
अकरावा दिवस – इतिहासाचा उत्सव
विद्यार्थ्यांना भूतकाळातील
घटनांची जीवनाची जाणीव करून देणे, आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या वस्तू/साहित्याबद्दल आदर
निर्माण करणे आणि स्थानिक लोकजीवनाचा आदर करणे या उद्देशाने उपक्रम आयोजित करणे.
गुगल अर्थ वरून गावाचा नकाशा…
बारावा दिवस – स्वंयपाक खोलीतील विज्ञान
स्वयंपाकघरातील साहित्य वापरून
स्वयंपाकघरातील विविध प्रक्रियांमागील साधी वैज्ञानिक तत्त्वे समजून घेणारे उपक्रम
राबवणे.
तेरावा दिवस
सांस्कृतिक सोहळा-
भाषेचे बंधन न ठेवता स्थानिक भाषेचा
समावेश करून लोकगीते,भावगीते,भक्तिगीते,भजन,देशभक्ती गीत,सुगम संगीत इत्यादी गायन करणे.तसेच संगीत वाद्यांचा उपयोग करून संगीत प्रदर्शन
करण्यास शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे.
चौदावा दिवस – शाळा सजावट
विद्यार्थ्यांनी
शाळेचा परिसर स्वच्छ करणे,रांगोळी काढणे, तोरण बांधून शाळा सजवणे त्यानंतर इंद्रधनुष्य कार्यक्रमात
पहिल्या दिवसापासून तयार केलेल्या वस्तू,कलाकुसर यांनी आठवणी तसेच आपल्यातील विविध कलांचे प्रदर्शन
करणे. शेवटी पालक सभा घेऊन दिवसभर झालेल्या कार्यक्रमाबद्दल पालकांचे अभिप्राय व
सूचना घेणे.