KALIKA CHETARIKE FAQ (कलिका चेतरीके सामान्य प्रश्न व उत्तरे)
 

खालील सर्व प्रश्न व उत्तरे DSERT कडून आलेली आहेत… कन्नड मधून मराठीमध्ये भाषांतर करण्यात आले आहे.

Covid-19 मुळे मागील दोन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना मुलभूत अध्ययन सामर्थ्ये पूर्णपणे प्राप्त साध्य झालेले नाहीत. त्यामुळे मागील दोन वर्षात साध्य करावयाची मूलभूत अध्ययन सामर्थ्य आणि चालू शैक्षणिक वर्षातील प्रमुख अध्ययन सामर्थ्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केली पाहिजेत या उद्देशाने अध्ययन पुनर्प्राप्ती हा उपक्रम आयोजित केला आहे.प्रस्तुत शैक्षणिक  वर्षात  शाळेत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अभ्यासासाठी वेळ मिळावा या दृष्टीने वार्षिक नियोजन करण्यात आलेले असून यावर्षी अध्ययन पुनर्प्राप्ती (LEARNING RECOVERY) हा उपक्रम इयत्ता पहिली ते नववी साठी आयोजित करण्यात आला आहे. (School reopening guidelines for HM & TEACHERS – CLICK HERE)
अध्ययन पुनर्प्राप्ती (LEARNING RECOVERY) हा उपक्रम राज्यात प्रथमच अंमलात येत असून याविषयी अनेक प्रश्न शिक्षक व विद्यार्थ्याना येत आहेत यासाठी कांही महत्वाचे प्रश्न व त्यावर शिक्षण विभागाकडून आलेले उत्तर यांची माहिती खालीलप्रमाणे –:

वर्ग प्रक्रियेशी संबंधित प्रश्न –

1) दरवर्षी होणाऱ्या सेतूबंध उपक्रमापेक्षा अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रम कसे वेगळे आहे?
 

 

अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रम हा विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील कमतरता भरून काढण्यासाठी रचना केलेला उपक्रम आहे.हा शिक्षणाचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न नाही तर अध्ययन निष्पत्तीवर आधारित शिक्षण पद्धतशीरपणे शिकवण्याचा प्रयत्न आहे.त्यामुळे ही संपूर्ण वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे.या प्रक्रियेमध्ये अध्ययनातील नुकसान,नवीन अध्ययन आणि मूल्यमापन प्राप्त करणे या सर्व बाबींचा समावेश होतो.

 
 

२) अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रम फक्त सरकारी शाळांमध्येच का स्वीकारला जात आहे?

 

 

 

आपल्या राज्यात शाळा बंद झाल्यामुळे शिकण्याचे प्रमाण जास्त आहे. दृकश्राव्य सुविधांचा अभाव, नेटवर्कचा अभाव आणि मोबाईल व इतर उपकरणांचा अभाव यामुळे अनेक सरकारी शाळेतील मुले दूर शिक्षणापासून वंचित झाली आहेत.त्यामुळेच सरकारी शाळांमध्ये हा उपक्रम जबाबदारीने स्वीकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.तथापि,अनुदानित आणि विनाअनुदानित अशा दोन्ही शाळांना त्यांच्या इच्छेनुसार अध्ययन पुनर्प्राप्तीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला गेला आहे.तसेच अधिक माहितीसाठी त्यांना शिक्षण विभागाशी संपर्क साधून अधिक माहिती घेण्यास सांगितले आहे.

 

 

 

३) शिक्षकांनी पाठ योजना तयार करावी का?पाठ योजना करायची असेल तर कशी करावी?

 

 

 

 पाठ योजना ही पाठ कसा शिकवावा? याबद्दल मार्गदर्शक आहेत.पाठ योजना अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे वर्णन करते.म्हणून शिक्षक मार्गदर्शिकेतील अध्ययन निष्पत्तीवर आधारित पाठ योजना करावी.शिक्षकांनी त्यांच्या वर्गातील मुलांसाठी अध्ययन निष्पत्तीवर आधारित पाठ योजना करावी.

 
 

 

4) अध्ययन पुनर्प्राप्ती दरम्यान पाठ्यपुस्तके कशी वापरायची?

 

 

 

 पाठ्यपुस्तकांचे संदर्भ घेऊन शिक्षक मार्गदर्शिकाची रचना केली आहे.त्यामुळे शिक्षकांना वर्ग अध्यापन पूर्वी शिक्षक मार्गदर्शिका वाचून आवश्यक असल्यास अभ्यास पत्रकांना पूरक म्हणून विषयानुसार पाठ्यपुस्तकांचा उपयोग करावा असे सांगण्यात आले आहे.

 

 

 

5) अध्ययन पत्रक आणि स्वाध्याय यात काय फरक आहे?

 

 

 

 अध्ययन पत्रक पुस्तकातून वेगळे करून ठेवता येते. हे मूल्यांकन आणि पून्हा अध्यापन सारख्या अनेक कारणांसाठी वापरले जाऊ शकते.अभ्यास पत्रकहे मुलांच्या वापरायला सुलभ आहे. स्वाध्याय पत्रकाचा वापर सराव आणि मूल्यांकनापुरता मर्यादित आहे.

 

 

 

6) अध्ययन पुनर्प्राप्ती अंमलबजावणी करताना प्रत्येक तासिका कालावधी 45 मिनिटांची

 

असेल का?

 

 

 

 होय,अध्ययन पुनर्प्राप्ती अंमलबजावणी नंतरही प्रत्येक तासिका कालावधी 45 मिनिटांची असेल.

 
 

 

मूल्यमापन संबंधित प्रश्न

7) प्रस्तुत अभ्यास पत्रकातील स्तराचे SATS मधील ग्रेडमध्ये रूपांतर कसे करावे?
 

 

  SATS मध्ये ग्रेडची माहिती कशी भरावी,याबाबत शिक्षण विभागाकडून लवकरच सर्व शिक्षकांना परिपत्रकाद्वारे माहिती देण्यात येईल.

 

 

 

8) पाठ्यपुस्तकातील अध्ययन निष्पत्ती आणि अध्ययन पुनर्प्राप्तीमध्ये अवलंबलेल्या अध्ययन निष्पत्ती भिन्न आहेत का? मूल्यमापनाच्या उद्देशाच्या संदर्भात यापैकी कोणता विचार केला पाहिजे?

 

 

 

  पाठ्यपुस्तकातील अध्ययन निष्पत्ती आणि अध्ययन पुनर्प्राप्तीमध्ये समाविष्ट केलेल्या अध्ययन निष्पत्ती वेगळे नाहीत.

 

          कोविडमुळे, विद्यार्थ्यांना मागील दोन शैक्षणिक वर्षांमध्ये पूर्ण अध्ययन सामर्थ्य प्राप्त झालेली नाहीत.म्हणून,गेल्या दोन वर्षांतील सर्वात महत्वाच्या अध्ययन निष्पत्ती आणि प्रस्तूत शैक्षणिक वर्षातील प्रमुख अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यानी प्राप्त केली पाहिजेत या उद्देशाने अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमाची अंमलबजावणी करुन शिक्षक मार्गदर्शिका आणि विद्यार्थी अभ्यास पुस्तिका यामधील अध्ययन निष्पत्ती यांचा मूल्यमापनासाठी विचार करावा.

 
 

9) विषयानुसार इयत्तेनुसार प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत का?

 

 

 

  नाही.शिक्षकांनी शाळा स्तरावर इयत्तेनुसार प्रश्नपत्रिका व मूल्यमापन प्रक्रिया करण्यास सांगण्यात आले आहे.

 

 

 

10) कोणती कागदपत्रे ठेवली पाहिजेत?

 

 

 

  विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती दर्शविणारे नैदानिक परीक्षांचे निकाल,विद्यार्थी संचयिका आणि अभ्यास पुस्तिकेतील सोडवलेल्या कृती इत्यादी दाखले अध्ययन पुनर्प्राप्ती संबंधी ठेवले पाहिजेत. अधिक माहितीसाठी शिक्षण विभागाशी संपर्क साधावा.

 

 

 

11)नैदानिक परीक्षा आणि पूर्व परीक्षा यामध्ये फरक काय?

 

 

 

  विद्यार्थ्यांचे अध्ययनपूर्व ज्ञान समजण्यासाठी नैदानिक परीक्षा मदत करते.विद्यार्थ्यांच्या आवश्यकता समजून घेण्यासाठी तसेच त्या पुरवण्यासाठी कोणत्या पद्धतीची योजना केली पाहिजेत हे समजण्यास सहाय्य करते.

 

 

पण पूर्व परीक्षा अशा पद्धतीची समग्र माहिती देऊ शकत नाही.

 
 

 

सामान्य प्रश्न

 

१२) सर्व पालक आणि अधिकाऱ्यांना अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली आहे का?

 

 

 

 शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना अध्ययन पुनर्प्राप्ती विषयी माहिती देण्यासाठी अनेक वेळा आवश्यक पावले उचलली आहेत. (शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच शिक्षक संघ पदाधिकाऱ्यांना कार्यशाळा व्हिडीओ कॉन्फरन्स व टेलिकॉन्फरन्स माध्यमातून माहिती देण्यात आली आहे.)

 

 
13) अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रम या वर्षात पूर्ण वर्षभर चालणार आहे का?
 

 

 होय, अध्ययन कमतरता भरून काढण्यासाठी प्रस्तुत इयत्तेच्या आवश्यक अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांनी प्राप्त कराव्या यासाठी 2022-23 शैक्षणिक वर्षात पूर्ण वर्षभर अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रम चालू राहणार असून 2022-23 शैक्षणिक वर्ष ‘अध्ययन पुनर्प्राप्ती’ वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.

 

 

 

14) विद्यार्थी अभ्यास पत्रिकेत दिलेल्या कृतीपेक्षा जास्त उपक्रम/कृती शिक्षक राबवू शकतात का?

 

 

 

 विद्यार्थी अभ्यास पत्रिका आणि शिक्षक मार्गदर्शिकामध्ये दिलेले उपक्रम साध्य झाल्यानंतर आवश्यकता असल्यास जास्त कृती आयोजित करू शकतात.

 
15) हायस्कूलचे विद्यार्थी NTSE आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमाची तयारी कशी करतील?
 

 अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रम हा शाळा पूर्णपणे उघडू न शकल्यामुळे अभ्यासाच्या झालेला तोटा भरून काढण्याचा उपक्रम आहे.त्यामुळे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा किंवा NTSE तयारी करू इच्छितात ते अध्ययन पुनर्प्राप्तीमधील अध्ययन सामर्थ्य प्राप्त केल्यानंतर वैयक्तिकरित्या इतर परीक्षांची तयारी करू शकतात.तसेच शिक्षकांची मदत घेऊ शकतात.

 

16) सकारात्मक/रचनात्मक अभिप्राय कसा द्यावा? उदाहरण द्या.

 

 

  विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन प्रगती होणे आवश्यक आहे आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांच्याबद्दल आवश्यक माहिती असणे आवश्यक आहे.नकारात्मक शब्दांचा वापर होणार नाही याची काळजी घ्यावी.

 

उदा. 1:  विद्यार्थ्याने उपक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.निर्दिष्ट सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी अधिक अभ्यासाची आवश्यकता असते.या कृतीपूर्वी इतर सोयीस्कर कृती करून विद्यार्थी हे सामर्थ्य प्राप्त करण्यास सुलभ होऊ शकते.

 

उदा-2: काही विद्यार्थ्यांना हा उपक्रम आव्हानात्मक वाटू शकतो.म्हणून इतर काही सोप्या सराव कृतींचा वापर करणे आवश्यक आहे.
 

 

उदा-3: विद्यार्थ्यांनी हे एखादे सामर्थ्य पूर्णपणे प्राप्त केले असेल तर तो पुढील सामर्थ्य कडे जाऊ शकतो.

 

17) एका शिक्षकाने एकापेक्षा जास्त अध्ययन पुनर्प्राप्ती प्रशिक्षणाला जावे का? (जेव्हा एखादा शिक्षक एकापेक्षा जास्त विषय अध्यापन करत असेल तर अशा संदर्भात….)

 

 

 पुनर्प्राप्ती मूलभूत तत्त्व सर्व सर्व विषयांसाठी समान आहे. शिक्षकांनी तिचे एका विषयाचे प्रशिक्षण घेतले असेल तर त्याच विषयाची तत्वे इतर विषयांच्या अध्यापनात केले जाऊ शकते.त्यामुळे तुम्ही शिकवत असलेल्या सर्व विषयांचे प्रशिक्षण घेण्याची गरज नाही.School reopening guidelines for HM & TEACHERS – CLICK HERE
KALIKA CHETARIK मूल्यमापन व पाठ योजना नमुने PDF
शैक्षणिक दाखले २०२२ -२३ 
KALIKA CHETARIKE ENGLISH HANDBOOKS KALIKA CHETARIKE ENGLISH WORKBOOKS 
कलिका चेतरीके ट्रेनिंग माहितीसाठी येथे स्पर्श करा…
कलिका चेतरीके माहितीसाठी येथे स्पर्श करा…
 
 
JOIN OUR GROUPS TODAY FOR LATEST EDUCATIONAL UPADATES  

 

 

  
Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.