जीवन प्रक्रिया
सजीवांच्या शरीराची निगा राखण्यासाठी तसेच व्यवस्थापनेचे कार्य एकत्रितपणे
करणाऱ्या क्रियांना जीवन प्रक्रिया असे म्हणतात.
फायदे
*पेशींची ऊतींची झीज
भरून निघते.
*शरीराची हानी व बिघाड टळते.
*ऊर्जा निर्मिती होते.
*नको असलेले घटक बाहेर टाकले जातात.
*शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे
अन्न ऊर्जा ऑक्सिजन यांचे वहन होते.
जीवन
प्रक्रिया
*पोषण
*श्वसन
*वहन
*उत्सर्जन
पोषण –
*सजीवात सर्वात मूलभूत जीवन प्रक्रिया गरजेचे आहेत ते म्हणजे
पोषण होय.
*पोषणामुळे शरीराची सजीवांची वाढ होते.
*काही सजीव स्वयंपोषी तर काही परपोषी आहेत.
स्वयंपोषी
*हिरव्या वनस्पती,बॅक्टेरियासारखे सजीव स्वतःचे अन्न स्वतः
तयार करतात.
*स्वयंपोषी पोषणात कार्बन प्रकाश ऊर्जा
पाणी इत्यादी वापर होतो.
हिरव्या वनस्पती –प्रकाश
संश्लेषण
*ही एक रासायनिक प्रक्रिया आहे.
*हरित द्रव्याच्या सहाय्याने प्रकाशाचे
शोषण होते. *प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत होऊन H2O चे विघटन H+ आणि OH- मध्ये होते व O2 ची निर्मिती होते.
*CO2चे रूपांतर
कार्बोहायड्रेट्स मध्ये होते (ग्लुकोज)
रासायनिक प्रक्रिया – 6CO2 +12H2O हरितद्रव्य/सूर्यप्रकाश C6H12O6 + 6O2 + 6H2O
हरितलवके -:
पर्णरंध्रे –
*पर्णरंध्राद्वारे वायूंची अदलाबदल होते.
*पर्णरंध्राद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी
बाहेर टाकले जाते.
*वनस्पतीला जेव्हा शेवटीची गरज नसते.तेव्हा
पर्णरंध्रे बंद होतात.
*पर्णरंध्रे उघडी/बंद करण्याचे कार्य रक्षण
पेशी पार पाडतात.
A. पाणी जास्त ®रक्षक
पेशी फुगतात ® पर्णरंध्रे
उघडी
B. पाणी कमी ® रक्षक पेशी आकुंचन ® पर्णरंध्रे बंद
परपोषी पोषण –
अमिबा –
*अमिबा हा सजीव विसरण क्रियेद्वारे सर्व क्रिया पार पाडतो.छद्मपादाद्वारे अन्नग्रहण करतो व ते अन्न अन्नपोकळीत तेथे संयुक्त घटकांचे रुपांतर साध्या रेणूत होते.
*पचन झालेले अन्न पेशी द्रवात मिसळते.
*न पचलेले अन्न पृष्ठभागात द्वारे बाहेर टाकले जाते.
अमिबामधील पोषण
पॅरामोशियम – पोषण
अवयव सिलिया- (हालचाल)अन्नग्रहण
पॅरामोशियम लहान केसासारखा असतो.
प्रश्न -:
1. विसरण क्रियेद्वारे मिळणाऱ्या प्राणवायूचा पुरवठा मानवासारखे बहुपेशीय सजीवांमध्ये अपुरा का पडतो?
कारण बहुपेशीय सजीवांमध्ये अनेक क्रिया पार पाडण्यासाठी अनेक सजीव पेशी
असतात.तसेच अमिबासारख्या एकपेशीय सजीवांमध्ये सर्व क्रिया पार पाडण्यासाठी एकच
पेशी असते.म्हणून विसरून क्रियेद्वारे मिसळणाऱ्या प्राणवायूचा त्यांना फायदा होतो.
2.एखादा प्राणी जिवंत आहे हे आपण कोणत्या गोष्टीवरून ठरवितो?
सजीवांच्या हालचालीवरून वाढीवरून आणि प्रतिसाद देण्यावरून एखादा प्राणी जिवंत आहे हे ठरवतो.
3.कोणते बाह्य पदार्थ कच्चामाल म्हणून सजीव वापरतात?
ऑक्सीजन (O2),अन्न,पाणी हे बाह्यपदार्थ कच्चामाल म्हणून वापरतात.
4.जीवनासाठी कोण कोणत्या प्रक्रिया आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते.
जीवनासाठी आवश्यक प्रक्रिया खालीलप्रमाणे
* पोषण
*श्वसन
*वहन
*उत्सर्जन
5.स्वयंपोषी आणि परपोषी पोषणातील फरक सांगा.
स्वयंपोषी | परपोषी |
जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना | जे सजीव अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतात |
6. प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट वनस्पती कोठून मिळवितात?
प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असणारा CO2 वातावरणातून मिळवतात.ऊर्जा स्त्रोत सूर्यापासून आणि पाणी जमिनीपासून मिळवितात.