ऑनलाईन सराव टेस्ट
STATE SYLLABUS
CLASS – 10
MARATHI MEDIUM
SUBJECT – SOCIAL STUDIES
PART – 2
समाज शास्त्र
प्रकरण-30वे
Rural DEVELPEMENT
प्रकरण 30: ग्रामीण विकास
1. ग्रामीण विकासाचा अर्थ आणि महत्त्व:
कृषी, गृहनिर्माण, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, आणि रोजगार निर्मिती यांचा समावेश.
स्थानिक संसाधनांचा वापर करून ग्रामीण लोकांचे जीवनमान उंचावणे.
शहरांकडे होणारे स्थलांतर थांबविणे व ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे.
2. विकेंद्रीकरण आणि पंचायत राज:
विकास प्रक्रियेची जबाबदारी स्थानिक पातळीवर सोपवणे.
73 व्या घटनादुरुस्तीने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था (ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत) निर्माण झाली.
रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा आणि शिक्षणाच्या सोयींसाठी पंचायत राज संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात.
3. महिला सबलीकरण आणि विकास:
महिलांचा सहभाग शेती, उद्योग, शिक्षण आणि राजकारणात वाढवणे.
पंचायत राज संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण मिळाल्याने त्यांची राजकीय भूमिका बळकट झाली आहे.
स्व-सहाय्यता गटांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले जात आहे.
4. महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि स्व-रोजगार योजना:
रोजगार निर्मिती आणि गरिबी निर्मूलनासाठी विविध सरकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जातात.
5. PURA प्रकल्प:
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागात नागरी सुविधा पुरविण्याचा प्रकल्प.
भौतिक, ज्ञान, इलेक्ट्रॉनिक आणि आर्थिक दुवे तयार करणे.
ऑनलाईन सराव टेस्ट