2.सर्वनाम (2. Sarvanam)




2. सर्वनाम  – 

नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.

उदा. कावळा आला.तो उडाला.

       कुत्रे फुंकले.ते गेले.

सर्वनामाचे प्रकार – 

सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत.

1. पुरुषवाचक सर्वनाम

2. दर्शक सर्वनाम

3. संबंधी सर्वनाम

4. प्रश्नार्थक सर्वनाम

5. अनिश्चित सर्वनाम 

6. आत्मवाचक सर्वनाम




1.पुरूषवाचक सर्वनाम – 

 

एकवचनी

अनेकवचनी

प्रथम पुरुषवाचक   

मी

आम्ही

द्वितीय पुरुषवाचक

तू

तुम्ही

तृतीय पुरुषवाचक

तो , ती, ते

ते, त्या, ती

उदा. तू मला क्षमा कर.

2. दर्शक सर्वनाम – 

जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. 

उदा. हा,ही,हे – तो,ती,ते

ही मुलगी हुशार आहे.


3.संबंधी सर्वनाम – 

वाक्यात आलेल्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाना संबंधी सर्वनामे म्हणतात.

उदा. जो – जी,जे , जसे – तसे  इत्यादी.

1. जे अभ्यास करतात ते पास होतात.

2. जसे करावे तसे भरावे.




4.प्रश्नार्थक सर्वनाम – 

वाक्यात नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.

उदा. कोण,काय,कोठे,कोणास,कोणता,कोणी इ. प्रश्नार्थक शब्दांचा उपयोग करतात 

 कर्नाटकची राजधानी कोणती?

 महर्षी व्यासांनी कोणता ग्रंथ लिहिला?

 काय मुलगा आहे हा?

5. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम- 

जी प्रश्नार्थक सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामा बदलले आहेत हे निश्चित सांगता येत नाही त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात.

उदा. काय सुंदर अक्षर आहे त्याचे!

कोण ही गर्दी!

कोणी कोणास ओळखले नाही!

6. आत्मवाचक सर्वनाम – 

स्वतः किंवा आपण या अर्थी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात.

उदा. आपण आता खेळूया. 

तू स्वतः कष्ट कर.

ती आपणहून गावाकडे आली.

स्वाध्याय –  

1. आम्ही या शाळेत शिकतो. 

2. ताई कधी येणार ?

3. हा माझा भाऊ आहे.

4. तो लाल पतंग माझा आहे.

वरील वाक्यातील सर्वनामांची वर्गवारी करून तक्ता भर.

दर्शक सर्वनाम – 

पुरुषवाचक सर्वनाम – 

प्रश्नार्थक सर्वनाम – 




Share with your best friend :)