PANDIT NEHARUNCHE BALPREM




पंडित नेहरूंचे बालप्रेम

    चाचा नेहरूंचे मुलांवर खूप प्रेम होते.

” मुले म्हणजे देवा घरची फुले” असं ते नेहमी म्हणत असत. मुलेही त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत होते.

    पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ चाचा नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. दिल्लीतील तीन मूर्ती भवन या सरकारी निवासस्थानात ते रहात होते. तीन मूर्ती भवन प्रशस्त होते. भवन परिसरात भव्य बगीचा होता. त्यात विविध फुलझाडी होती. चाचा नेहरू यांना फुले फार आवडत होती.

    एके दिवशी नेहरूजी बगिचात हिंडताना खूप खूश झाले. पुढे गेल्यानंतर त्यांना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने नेहरूजी गेले असता एक- दोन महिन्याचे मुल त्यांना रडताना दिसले.

    पुढे रंगीबिरंगी फुग्यांनी पंडिजींचे लक्ष वेधले. त्यांना गाडी थांबवायला सांगितली ते गाडीतून उतरले व फुगे खरेदी करण्यासाठी फुग्यावाल्याकडे गेले. त्यांना फुगे खरेदी करताना पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले. नेहरूजींनी फुगे उपस्थित मुलांना वाटून दिले.

    नेहरूजी त्या बालकाच्या आईचा शोध घेतला परंतु बगीचात ती दिसली नाही. कोणीच नव्हते. नंतर ते बालक जरा जास्तच रडू लागले. नेहरूजींनी त्याला घेतले. ते बाळ नंतर शांत झाले. नंतर ते चाचा नेहरूंकडे पाहून हसू लागले. तितक्यात त्या बालकाची आई धावत आली. नेहरूजी हातात आपले बाळ हसताना पाहून तिला आश्चर्य वाटले. नंतर नेहरूजींनी बालकाला त्याच्या आईकडे सोपविले.

    एकदा पंडितजी तमिळनाडूच्या दौर्यावर गेले होते. चाचा नेहरूंना पाहण्यासाठी तेथील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. काही नागरिकतर सायकलीवर उभे राहून त्यांना बघत होते. जागा भेटेल तेथून प्रत्येकजण पंडिजींना बघत होता.

    पुढे गेल्यानंतर हवेत उडणाऱ्या रंगीबिरंगी फुग्यांनी पंडिजींचे लक्ष वेधले. त्यांनी गाडी थांबवायला सांगितली. ते गाडीतून उतरले व फुगे खरेदी करण्यासाठी फुगेवाल्याकडे गेले. त्यांना फुगे खरेदी करताना पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले. नेहरूजींनी खरेदी केलेले फुगे उपस्थित सगळ्यांना वाटून दिले. चाचा नेहरूंचे मुलांवर खूप प्रेम होते. ‘मुले म्हणजे देवा घरची फुले’ असं ते नेहमी म्हणत असत. मुलेही त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत होते.

वरील भाषणाची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा… CLICK HERE 


Pdf व संकलन : गिरीष दारुंटे सर, मनमाड (नाशिक)

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *