Ling in marathi (लिंग विचार मराठी व्याकरण)

 

लिंग विचार

ज्या नामाच्या
रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की,स्त्री जातीची आहे
, की
दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरुन कळते त्याला त्याचे
लिंगअसे
म्हणतात.

मराठीत तीन लिंगे मानतात.

1. पुलिंग

2 स्त्रीलिंग

3. नपुंसकलिंग

मराठीत लिंग ओळखण्याची पद्धत कोणती ?

प्राणीमात्रातील
पुरुष किंवा नर यांचा उल्लेख
तोया शब्दाने करतात व स्त्री किंवा मादी यांचा उल्लेख ‘ती’ या
शब्दाने करतो.

उदा.  तो मुलगा

       ती मुलगी

      तो कुत्रा

      ती कुत्री.

सजीव
प्राण्यातील एखादा नर आहे कि मादी हे निश्चित सांगता येत नसेल तर त्याला
नपुंसकलिंगीमानून
त्याचा उल्लेख ते या शब्दाने करतो.

उदा.  ते-कुत्रे

        ते बाळ

       ते-पाखरु

निर्जीव
वस्तुच्या बाबतीत काही काल्पनिक पुरुषत्व व स्त्रीत्व लादून त्या वस्तूच्या मागे
तो-ती-ते हे शब्द वापरून आपण त्यांचे लिंग ठरवितो.




*काही अ-कारांत, आ – कारांत पुलिंगी शब्दात ईणहा प्रत्यय लावून त्याची स्त्रीलिंगी रूपे होतात.

उदा : तेली – तेलीण,

         पाटील-पाटलीण

पुल्लिंगी

स्त्रीलिंगी

पाटील

पाटलीण

कुंभार

कुंभारीण

नाग

नागीन

शेतकरी

शेतकरीण

भिकारी

भिकारीण

शिंपी

शिंपीण

वाघ

वाघीण

सिंह

सिंहीण

साहेब

साहेबीन

ससा

ससीन

साहेब

साहेबीन

सावकार

सावकारीन

भिकारी

भिकारीण

युवा

युवती

ससा

सशीण

सम्राट

सम्राज्ञी

साहेब

साहेबीण

सावकार

सावकारीण

सुतार

सुतारीन

हंस

हंसिनी

हत्ती

हत्तीण

माळी

माळीण

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 

* काही  अ-कारांत, आ – कारांत पुलिंगी नामाची
स्त्रीलिंगी रूपे ई – कारांत होतात.

  उदा : तरुण –
तरुणी
,

वानर – वानरी

पुल्लिंगी

स्त्रीलिंगी

पोरगा

पोरगी

मुलगा

मुलगी

दांडा

दांडी

गाडा

गाडी

तरुण

तरुणी

कुत्रा

कुत्री

वानर

वानरी

मामा

मामी

आरसा

आरशी

एकटा

एकटी

रेडा

रेडी

कुमार

कुमारी

चिमणा

चिमणी

पाहुणा

पाहुणी

निळा

निळी

काळा

काळी

थोरला

थोरली

छोटा

छोटी

नवा

नवी

देव

देवी

बकरा

बकरी

नवरा

नवरी

लाडका

लाडकी

लांडगा

लांडगी

भाकरा

भाकरी

पुल्लिंगी

स्त्रीलिंगी

पोरगा

पोरगी

मुलगा

मुलगी

दांडा

दांडी

गाडा

गाडी

तरुण

तरुणी

कुत्रा

कुत्री

वानर

वानरी

मामा

मामी

आरसा

आरशी

एकटा

एकटी

रेडा

रेडी

कुमार

कुमारी

चिमणा

चिमणी

पाहुणा

पाहुणी

वेडा

वेडी

हिरवा

हिरवी

पिवळा

पिवळी

निळा

निळी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 

*कांही अ-कारांत पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी
रूपे आ-कारांत किंवा ई कारांत होतात.

पुल्लिंगी

स्त्रीलिंगी

बालक

बालिका

सेवक

सेविका

लेखक

लेखिका

शिक्षक

शिक्षिका

मुख्याध्यापक

मुख्याध्यापिका

सेवक

सेविका

 


 

*कांही पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप –

पुल्लिंगी

स्त्रीलिंगी

नर

मादी

बोका

भाटी

नवरा

बायको

बेडूक

बेडकी

पुरुष

स्त्री

पुतण्या

पुतणी

बैल

गाय

दादा

वहिनी,ताई

माता

पिता

मोर

लांडोर

मित्र

मैत्रीण

मुंगळा

मुंगी

युवक

युवती

माझा

माझी

पुत्र

कन्या

रेडा

म्हैस

साधू

साध्वी

सर

मम

कवी

कवयित्री

काळवीट

हरिणी

दीर

जाऊ

पती

पत्नी

सासू

सासरा

बोकड

शेळी

वर

वधू

 

* मराठीत काही शब्द निरनिराळ्या लिंगातही आढळतात म्हणजे
कांही शब्दांचे
पुल्लिंगी,स्त्रीलिंगी रूप एकसारखे असते.

पुल्लिंगी

स्त्रीलिंगी

ढेकर

ढेकर

वेळ

वेळ

मजा

मजा

संधी

संधी

बाग

बाग

पोर

पोर

 


 

·      
मराठीत काही शब्दांचे पुल्लिंगी,स्त्रीलिंगी,नपुंसकलिंगी रूप एकसारखे असते.

पुल्लिंगी

स्त्रीलिंगी

नपुसकलिंगी

मूल

मूल

मूल

पोर

पोर

पोर

 

* संस्कृतातून मराठीत आलेल्या नामाची स्त्रीलिंगी
रूपे
प्रत्यय लागून होतात.

उदा : श्रीमान – श्रीमती,

भगवान – भगवती

युवत –  युवती

* परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच
अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून सामान्यता ठरवितात.

उदा : बूट (जोडा) पु. पेन्सिल (लेखणी) स्त्री. क्लास (वर्ग)
पु.बूक (पुस्तक) न. कंपनी (मंडळी) स्त्री ट्रंक (पेटी) स्त्री.

शब्द

लिंग

बूट  

पुल्लिंगी

क्लास  

पुल्लिंगी

कंपनी  

स्त्रीलिंगी

पेन्सिल  

स्त्रीलिंगी

ट्रक

पुल्लिंगी

 


                                                                                                  

* मराठीत कांही पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असणाऱ्या प्राण्यांचा
उल्लेख फक्त पुल्लिंगीच करतात
.

उदा. मासा,रुड,
पोपट, साप  

* मराठीत कांही पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असणाऱ्या प्राण्यांचा
उल्लेख फक्त स्त्रीलिंगीच करतात
.

 उदा.
घार, सुसर, घूस,



Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *