तिसरी – मराठी पाठ
6 – आवडती मज
नवीन शब्दार्थ
वाकुल्या दाखविणे – चिडविणे.
झुलणे – डोलणे
इमानी – प्रामाणिक
ऐटदार – डौलदार
माय आई
गट्टी – मैत्री
आरवणे – कोंबड्याचे ओरडणे.
ही प्रश्नोत्तरे pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठ येथे क्लिक करा..
अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
१. कवितेतील प्राणी व पक्षी यांची नावे लिही.
उत्तर – पोपट,खार,चिमणी,कुत्रा,कोंबडा,गाय
२. पोपटाला फराळ करण्यासाठी काय काय लागते ?
उत्तर – पोपटाला मिरची,पेरू,पिकलेली
डाळिंब हे सर्व फराळ करण्यासाठी लागते.
३. मोत्याचे कौतुक कसे केले आहे?
उत्तर – मोत्या आमचा सदा भुंकतो,घराची
राखण करणारा खरा इमानी प्राणी आहे असे मोत्याचे कौतुक केले आहे.
४. आरवून जागे कोण करतो ?
उत्तर –कोंबडा आरवून जागे करतो.
५. गायीला आजी काय म्हणते ?
उत्तर – गायीला आजी सर्व जगाची माय
असे म्हणते.
आ. खालील कवितेच्या ओळी पूर्ण कर.
१. आवडतो मज पोपट हिरवा
लाल लाल चोचीचा
२. मोत्या अमुचा सदा भुंकतो
आगे मागे पळतो
३. इकडून तिकडे झाडावरती
सर सर पळते खार
४. ऐटदार चालतो कोंबडा
डोईवरती तुरा
५. शिंगे सुंदर रंग काळा
अमुची कपिला गाय
गोंडेदार
दमदार
इमानदार
चवदार
झुपकेदार
ई. तक्ता भरा.
एकवचन | पोपट | खार | चिमणी | कुत्रा | कोंबडा | गाय | शिंक | शेपूट |
अनेकवचन | पोपट | खारी | चिमण्या | कुत्री | कोंबडे | गायी | शिंका | शेपट्या |
ऊ. कवितेतील लयबद्ध शब्द लिहा.
चोचीचा – डाळींबाचा
खार – दार
म्हणते – झुलते
पळतो – करतो
तुरा – खरा
गाय – माय
ए. कल्पना कर. तू काय करणार? ते एका वाक्यात लिही.
१. पोपट होऊन – पेरू खाईन
२. खार होऊन – झाडावरून सरसर पळीन
३. चिमणी होऊन – चिव चिव गाणे म्हणीन.
४. मोत्या होऊन – घराची राखण करीन
५. कोंबडा होऊन – आरवून लोकांना जागे करीन
ओ. नमुन्यांप्रमाणे लिहा.
उदा. मुलगा – मुलगी
१. कोंबडा – कोंबडी
२. कुत्रा – कुत्री
३. गाय – बैल
४. चिमणी – चिमणा
५. मोर – लांडोर
६. वाघ – वाघीण
७. कावळा – कावळी
८. घोडा – घोडी
औ.
प्राणी आणि घरे यांच्या जोड्या जुळवा.
1. कोंबडा 6. घरटे
2. साप 7.
गुहा
३. गाय 8. खुराडे
4.चिमणी 9.वारुळ
5. सिंह 10. गोठा
अं. कवितेतील चित्रे
पुन्हा बघ आणि प्रश्नांची उत्तरे लिही.
१. ऐटदार कोण चालतो ?
उत्तर – ऐटदार कुत्रा
चालतो.
२. गोंडेदार शेपूट
कोणाची आहे ?
उत्तर – गोंडेदार
शेपूट खारीची आहे.
३. खरा इमानी प्राणी कोण
आहे ?
उत्तर – कुत्रा
हा खरा इमानी प्राणी आहे.
४. सुट्टीच्या दिवशी
कोणा बरोबर खेळायचे आहे ?
उत्तर – सुट्टीच्या
दिवशी चिमणी,पोपट,खार,कुत्रा,गाय यांच्याबरोबर खेळायचे आहे.
वरील प्रशोत्तरे PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा…