इयत्ता – नववी
विषय – विज्ञान
घटक 5. सजीवांमधील मुलभूत घटक
पेशी
शोध –रॉबर्ट हूक (1965)
लॅटिन भाषा – Cell
सजीवांच्या शरीरातील रचनात्मक व कार्यात्मक घटकास पेशी असे म्हणतात.
मानवी शरीरात असणाऱ्या पेशी
चेतापेशी
अस्थिपेशी
कास्थिपेशी
वसा पेशी
रक्तपेशी
शुक्राणू (नर)
अंदुक (मादी)
पेशी सूक्ष्म असल्याने मायक्रोन मध्ये मोजल्या जातात.
पेशी सिद्धांत एम.जे.स्वीडन व थिडोअर स्वान यांनी मांडला.
पेशीतील मुख्य तीन घटक-
पेशी पटल
पेशी केंद्र
पेशी द्रव
1.पेशी पटल – प्लाझ्मा पटल
कार्य – तर्षण क्रिया पार पाडते.आवश्यक घटकांना आत बाहेर करू देते म्हणून याला निवडक पार्यपटल असेही
म्हणतात. CO2 व O2 या वायूंची अदलाबदल करण्यास मदत करते. सर्वात बाहेरील
आवरण असून पेशीचे संरक्षण करते.
पेशी द्रव – पेशीमध्ये सर्वत्र पाणी व जेलसारखा पदार्थ पसरलेला असतो.त्यास पेशी द्रव म्हणतात. पेशी द्रवात सर्व रासायनिक क्रिया घडतात. पेशी द्रवात जैविक घटक म्हणजे पेशी अंगके विखुरलेली असतात. पेशीमध्ये काही अजैविक घटक कॅल्शियम,झिंक,क्लोरीन, प्रथिने,मेद असतात.
पेशी केंद्र
पेशी केंद्र दुहेरी आवरणयुक्त असते. पेशी केंद्र सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवते. पेशी विभाजन ही क्रिया पार पाडते. पेशी केंद्रात रंगसूत्र जाल पसरलेले असते.
रंगसूत्रे ही दोऱ्यासारखे असून त्यांच्यापासून गुणसूत्रे तयार होतात.गुणसूत्रात जन्यू/जीन्स हा घटक असतो.त्यामध्ये गुणसूत्रात डीएनए हा अनुवंशिक माहितीचे संक्रमण करतो.
1. तुम्ही अशा दोनच अंगकांची नावे सांगू शकाल का की ज्यांच्या मध्ये त्यांचे स्वतःचे अनुवंशिक पदार्थ आहेत?
उत्तर – दोन अंगकांची नावे खालील प्रमाणे
1. कलकणू
2. लवके
2. जर एखाद्या पेशीच्या रचनेवर कांही रासायानिक किंवा भौतिक परिणाम झाले तर काय होईल?
उत्तर – पेशीचा आकार बदलेल तसेच पेशी नष्ट होईल.
३. लयकारीकांना आत्महत्त्या कुपी असे का म्हणतात?
उत्तर – कारण लयकारीकांमध्ये विविध विकरे साठवलेली असतात.जेव्हा पेशी अशक्त व खराब होते.तेव्हा लयकारिका फुगते व फुटते.त्यावेळी लयकारिकामधील विकरे संप्रेरके पेशींमध्ये पसरतात व पेशीला नष्ट करतात.म्हणून लयकारीकेला आत्महत्या कुपी असे म्हणतात.
4. पेशीमध्ये प्रोटीन्सचे संयोगीकरण कुठे होते?
उत्तर – पेशींमध्ये प्रोटीनचे संयोगीकरण रायबोसोम्समध्ये होते.हे अंतरद्रव्यजालीकेला चिकटलेले असतात.त्यामुळे अंतरद्रव्यजालिकेचा वापर करून रायाबोसोम्स प्रथिनांचे संश्लेषण करतो.
5. अमिबा आपले अन्न कसे मिळवितो?
उत्तर – अमिबा आपले अन्न एंडोसायटोसिस या क्रियेद्वारे मिळतो.
6. प्राणी पेशी व वनस्पती पेशी यामधील फरक सांगा.
प्राणी पेशी | वनस्पती पेशी |
1. प्राणी पेशी पेशी भीती नसते. 2. प्राणी पेशीत हरितलवके नसतात. 3. प्राणी पेशीत रितिका नसते. 4. प्राणी पेशीत लयकारीका असते. | 1. वनस्पती 2. वनस्पती पेशी मध्ये हरितलवके असतात. 3. वनस्पती पेशी रिक्तिका असते. 4. वनस्पती पेशीत लयकारिका नसते.क्वचितच
|
7. प्रोकॅरिऑटिक पेशी युकॅरीऑटिक पेक्षा वेगळी कशी आहे?
प्रोकॅरिऑटिक पेशी | युकॅरीऑटिक पेशी |
*आकार : साधारणपणे लहान असतो. *पेशी केंद्र: ठळकपणे दिसत नाही त्यास पेशी केंद्र म्हणतात. *एकच गुणसूत्र असते. *पटलयुक्त पेशीअंगके नसतात. | *आकार :साधारण मोठा असतो *(पेशी केंद्र: ठळकपणे दिसते. *अनेक गुणसूत्रे असतात.
*पेशीअंगके पटल युक्त असतात.
|
8. तर्षण क्रिया म्हणजे काय ?
उत्तर – पाण्याच्या रेणूचे वहन उच्च संहीतेकडून कमी संहीतेकडे होते.त्या क्रियेला तर्षण क्रिया असे म्हणतात.
9. पेशी पटल बनविणारे प्रोटिन्स व स्निग्ध पदार्थ कुठे तयार होतात?
उत्तर – पेशीपटल बनविणारे प्रोटिन्स व स्निग्ध पदार्थ रायबोसोम्स व तनुकले मध्ये तयार होतात.
10. पेशी पटल जर फाटले किंवा तुटले तर काय होईल?
उत्तर – पेशीपटल जर फाटले तर पेशीद्रव्य सगळीकडे पसरेल तर्षण क्रिया
घडणार नाही.पेशीला आकार प्राप्त होणार नाही.विजातीय घटक पेशीत शिरतील त्यामुळे
पेशी नष्ट होईल.
11. कोणत्या अंगकाला “पेशीचे
ऊर्जास्थान” म्हणतात ? का?
उत्तर – कलकणुंना पेशींचे ऊर्जा स्थान म्हणतात.कारण कलकणूमध्ये ग्लुकोज व ऑक्सिजन यांची रासायनिक
क्रिया होते व CO2,H2O आणि ऊर्जा मुक्त होते ही ऊर्जा कलकणू ATP मध्ये साठविते.
12.पेशीमध्ये जर तनुकले नसतील तर पेशीची अवस्था कशी होईल?
उत्तर – तनुकलेमध्ये विविध रसायने स्त्रवतात तसेच तनुकलेमध्ये विविध पदार्थ साठवून ठेवले जातात व तनुकले लयकारीकांच्या निर्मितीस मदत करतात.म्हणून पेशींमध्ये जर तनुकले नसतील तर वरील कार्ये व्यवस्थित होऊ शकणार नाहीत व लयकारिका नसल्यामुळे खराब पेशी साठून
राहतील.
13. खालील तर्षणाचा प्रयोग करा.
साल काढलेल्या बटाट्यांचे 4 अर्धे भाग घ्या.त्यापैकी एक भाग उकडलेल्या बटाट्याचा घ्या.प्रत्येक भागात एक खळगा करा.ते सर्व भरलेल्या भांड्यामध्ये ठेवा. उकडलेल्या आता,
a) A बटाटा रिकामा ठेवा.
b) B बटाट्यामध्ये एक चमचा साखर घाला.
c) C बटाट्यामध्ये एक चमचा मीठ घाला.
d) D या उकडलेल्या बटाट्यामध्ये एक चमचा साखर घाला.
हे सर्व दोन तास असे ठेवा. नंतर चारही बटाट्यातील खळग्यांचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
i) B आणि C या बटाट्यांच्या खळग्यामध्ये पाणी का साठले?.
उत्तर – येथे तर्षण क्रिया घडली.पेशीबाहेर पाण्याचे प्रमाण अधिक होते.त्यामुळे पेशींनी पाण्याचे शोषण केले.येथे असणाऱ्या रावणाला हायपोटोनिक
द्रावण असे म्हणतात.
ii) A बटाट्याची या प्रयोगासाठी का गरज होती ?
उत्तर – पेशींना पुरेसे पाणी असेल तर अधिक पाणी शोषून घेणार नाहीत आणि A बटाटा रिकामा होता.त्यामध्ये कोणतेही द्रावण नव्हते.याचा अर्थ तर्षण
क्रियेस द्रव माध्यमाची गरज असते.
iii) अ आणि D बटाट्यांमध्ये असलेल्या खळग्यात पाणी का साठले नाही?
उत्तर – A बटाटा रिकामा असल्यामुळे दर्शन क्रिया घडली नाही.D बटाटा उकडलेला असल्यामुळे तेथे मृतपेशी आहेत.
कांही महत्वाच्या आकृत्या –
वनस्पती पेशी
प्रोकॅरिऑटिक पेशी