घटक
3. कृत्रिम तंतू आणि प्लॅस्टिक
1. काही तंतूना कृत्रिम तंतू असे का संबोधतात स्पष्टीकरण द्या.
उत्तर – रासायनिक पदार्थांचा उपयोग करून मानवाने तयार केलेल्या तंतूंना कृत्रिम तंतू असे म्हणतात.
2. योग्य पर्याय निवडा.
रेयॉन हे कृत्रिम तंतूच्या तुलनेत भिन्न आहे कारण –
(a) याचे रुप रेशीमप्रमाणे आहे.
(b) हे लाकडी लगदयापासून प्राप्त करतात.
(c) यांच्या तंतूंना नैसर्गिक तंतूप्रमाणे विणले जावू शकते.
उत्तर – (b) हे लाकडी लगदयापासून प्राप्त करतात.
3. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
(a) कृत्रिम तंतूना मानवनिर्मित अथवा कृत्रिम तंतू संबोधतात.
(b) कृत्रिम तंतूंची निर्मिती कच्च्या मालापासून केली जाते. त्याला पेट्रोकेमिकल्स असे संबोधतात.
(c) कृत्रिम तंतूप्रमाणे प्लॅस्टिकही एक पॉलिमर आहे.
4. नायलॉन तंतू अतिशय प्रबळ आहेत हे दर्शविणारी उदाहरणे द्या.
उत्तर – नायलॉन तंतू प्रबळ लवचिक हलका आणि स्टील तारेपेक्षा मजबूत असतो.म्हणून त्याचा उपयोग पॅराशुटमध्ये,पर्वत चढण्याचे दोरखंड,कारच्या शेडचे पट्टे आणि मासे पकडण्याची जाळी इत्यादींमध्ये करतात.
5. खाद्यपदार्थांच्या साठवणीसाठी प्लॅस्टिकच्या पात्रांना प्राधान्य का दिले जाते! स्पष्टीकरण द्या.
उत्तर – कारण त्याचे कमी वजन,कमी किंमत,चांगले सामर्थ्य आणि हाताळण्यासाठी सोपे आहे,तसेच प्लॅस्टिक पाणी आणि हवेशी क्रिया करीत नाही,त्याला सहजपणे गंज येत नाही.
6. थर्मोप्लॅस्टिक्स आणि थर्मोसेटींग प्लॅस्टिक्स यांची तुलना करणारे स्पष्टीकरण द्या.
थर्मो प्लॅस्टिक | थर्मो सेटिंग प्लॅस्टिक |
1. तापवल्यावर मऊ होते. | 1.तापवल्यावर मऊ होत नाही. |
2.याचा पुनर्वापर करता येतो. | 2.याचा पुनर्वापर करता येत नाही. |
3.उदा. पॉलिथिन आणि PVC (पॉली व्हीनाईल क्लोराईड). | 3. बॅकेलाइट आणि मेलामाइन. |
7. खालील पदार्थ थर्मोसेटींग प्लॅस्टिकपासूनच का बनविलेले आहेत याचे स्पष्टीकरण करा.
(a) पसरट पातेल्याचे हँडल्स
(b) विद्युत प्लगस / स्विचेस / प्लगबो र्डस/तंतू आणि प्लॅस्टिक
उत्तर –
कारण थर्मोसेटिंग प्लॅस्टिक अग्नीचा प्रतिरोधक आहे आणि इतर प्लॅस्टिकच्या
तुलनेत उष्णता सहन करण्याची क्षमता यामध्ये अधिक असते म्हणून याचा उपयोग करतात.
8. खालील पदार्थांना ‘पुनः चक्रिकरण करता येणारे‘ आणि ‘पुनः चक्रिकरण करता न येणारे‘ यामध्ये वर्गिकरण करा.
दूरध्वनी उपकरण,प्लॅस्टिक खेळणी, कुकरचे हँडल्स, कॅरीबॅग्स, बॉल फांऊटनपेन,प्लॅस्टिक चेंडू, विद्युत तारेवरील प्लॅस्टीकचे आवरण, प्लॅस्टिक खूर्च्या, विद्युत स्विचेस.
उत्तर – पुन: चक्रीकरण करता येणारे – प्लॅस्टिक खेळणी,कॅरीबॅग,बॉल,फाउंटन पेन,प्लॅस्टिक चेंडू,विद्युत तारेवरील प्लॅस्टिकचे आवरण,प्लॅस्टिक खुर्च्या.
पुनर्चक्रीकरण करता न येणारे – दूरध्वनी उपकरण,कुकरचे हँडल्स,विद्युत स्विचेस,
9. राणा उन्हाळ्यासाठी शर्टस खरेदी करणार आहे. त्याने सुती शर्टस कि कृत्रिम पदार्थापासून बनलेले शर्टस खरेदी करावेत ? राणाला सकारण सल्ला द्या.
उत्तर – राणाने सुती शर्टस खरेदी करावेत कारण सुती कापड घाम शोषून घेतो आणि त्यातील छिद्रामुळे घामाचे बाष्पीभवन होऊन आपले शरीर थंड राहते पण कृत्रिम कपडे घाम शोषून घेत नाही त्यामुळे ते उन्हाळ्यामध्ये सोयीस्कर होत नाहीत.
10. उदाहरणाच्या सहाय्याने दर्शवा की प्लॉस्टीकचे स्वरुप न गंज चढणारे आहे.
उत्तर – प्लॅस्टिक पाणी आणि हवेशी क्रिया करीत नाही.त्यामुळे त्याला सहजपणे गंज येत नाही.
*प्लॅस्टिकचा उपयोग अन्नपदार्थ खाद्यपदार्थ साठवण्यासाठी करतात.
*टेफ्लॉनचा उपयोग स्वयंपाक पात्रावर न चिकटणारे वेष्टन लावण्यासाठी होतो.
*अनेक रसायने साठविण्यासाठी करतात.
*विविध प्रकारच्या पदार्थांच्या साठवणीसाठी करतात.
11. दात स्वच्छ करणाऱ्या ब्रशचे हँडल आणि आखूड केस एकाच पदार्थापासून बनले पाहीजेत का ?’ तुमच्या उत्तराचे स्पष्टीकरण द्या.
उत्तर – नाही.आखूड केस नायलॉन पासून बनविले पाहिजेत.कारण ते प्रबल,लवचिक,हलके, चकचकीत आणि धूण्यासाठी सोपे असतात.ब्रशचे हँडल्स कठीण प्लॅस्टिकपासून बनवले पाहिजेत कारण ते कठीण असून उष्णता व विद्युतचे अवाहक आहेत.
12. शक्य तेवढे प्लॅस्टिक टाळा‘ या सल्ल्यासाठी टिप्पणी करा.
उत्तर – सद्या प्लॅस्टिक हे आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे तरीही शक्य तेवढे प्लॅस्टिक टाळा हे खालील कारणासाठी –
1. प्लॅस्टिक हे जैविक अविघटक आहे.कारण त्याचे विघटन होण्यास कित्येक वर्षे लागतात.
2. प्लॅस्टिक हे पर्यावरण पूरक नाही कारण यांच्या ज्वलनाने वायू प्रदूषण होते.
3. प्लॅस्टिक मुळे मातीचे आणि पाण्याचे प्रदूषण होते.
4. काही वेळेला जनावरे व इतर प्राणी पॉलिथिनच्या पिशव्या आणि खाद्यपदार्थांचे वेस्टन सारखे पदार्थ घालतात त्यामुळे त्यांची श्वसन संस्था बंद पडते अथवा जठरावर अस्तर निर्माण होतात आणि मृत्यूही होतो.
5. प्लॅस्टिक मुळे जलाशयातील प्राण्यांवर परिणाम होतो.
13. A स्तंभ मधील संज्ञाना B स्तंभामधील दिलेल्या वाक्याना अचूक जुळवा.
उत्तर – A B
(i) पॉलीस्टर b) सहजपणे कपड्यांना गुंडाळी पडत नाही.
(ii) टेफ्लॉन c) न चिकटणाऱ्या स्वयंपाकाच्या भांडयाच्या निर्मितीसाठी उपयोग.
(iii) रेयॉन (a) लाकड़ी लगद्याचा उपयोग करुन निर्मिती.
(iv) नायलॉन (b) पॅराशूट आणि पायमोज्याच्या निर्मितीसाठी उपयोग
14. ‘कृत्रिम तंतूंची निर्मिती करणे हे वास्तविकता वनांचे संरक्षण करण्यास मदत करते‘ यावर टिपा लिहा.
उत्तर – कृत्रिम तंतू हे मानवनिर्मित असून हे पेट्रोकेमिकल्स पासून तयार करतात.यांच्या निर्मितीसाठी झाडे तोडणे किंवा प्राण्यांना मारणे आवश्यक नाही.त्यामुळे आपण वनांचे संरक्षण करू शकतो.म्हणून आपण असे म्हणू शकतो की कृत्रिम तंतूंचे निर्मिती करणे हे वास्तविकता वनांचे संरक्षण करण्यास मदत करते.
15. थर्मोप्लॅस्टिक हे विद्युत प्रवाहाचे मंदवाहक आहे हे दर्शविणाऱ्या उपक्रमाचे वर्णन करा.
उत्तर – विद्युत मंडल पूर्ण करून जेव्हा आपण विद्युत प्रवाह सुरू करतो.तेव्हा बल्ब पेटतो.पण जेव्हा आपण दोन वाहक तारांच्या मध्ये प्लॅस्टिकचा तुकडा जोडतो व विद्युत प्रवाहित करतो.तेव्हा बल्ब पेटत नाही यावरून थर्मोप्लॅस्टिक हे विद्युतप्रवाहाचे मंद वाहक आहे हे स्पष्ट होते.