विद्याप्रवेश कार्यक्रम (इयत्ता 1 ली)
कर्नाटक राज्यातील प्राथमिक शाळांसाठी सविस्तर मार्गदर्शिका
प्रस्तावना व उद्दिष्टे
कर्नाटक राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला इयत्ता पहिली (Class-1) मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 30 दिवसांचा विशेष ‘विद्याप्रवेश कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नवीन विद्यार्थ्यांना शालेय वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करणे आणि खेळकर पद्धतीने त्यांचा पायाभूत विकास करणे हा आहे.
महत्वाचे अंमलबजावणी मुद्दे
- इयत्ता पहिली वर्गासाठी दिलेल्या अधिकृत विद्याप्रवेश वेळापत्रकाप्रमाणेच दैनंदिन कृतींची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.
- वेळेचे नियोजन करताना, प्रत्येक शनिवारी अध्ययनासाठी 5 तासिका आणि इतर दिवशी प्रत्येकी 8 तासिका मुलांच्या अध्ययनासाठी वापरण्यात येतील असे काटेकोर नियोजन करावे.
- विद्याप्रवेशासाठी स्वतंत्र अध्ययन पत्रिका (साहित्य) उपलब्ध करून दिले आहे. 30 दिवसांच्या कालावधीत यातील उपयुक्त अध्ययन कृतींचा अवश्य वापर करावा.
- या शैक्षणिक कृती व अध्ययनपत्रातील उपक्रमांचे आयोजन वर्गात वैयक्तिक, गटात किंवा सामूहिकरित्या करावे.
- विद्याप्रवेश कार्यक्रमांतर्गत 30 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे पद्धतशीर मूल्यमापन करावे आणि ते मूल्यमापन पत्रक विद्यार्थ्यांच्या कृती संचास (Activity Portfolio) जोडावे.
4 नवीन अध्ययन स्थळे (Learning Centers)
मागील शैक्षणिक वर्षातील एकूण अध्ययन कोपरे (Learning Corners) यावर्षी वर्गातील मुलांना पुरेशा अध्ययन संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे 4 प्रमुख ‘अध्ययन स्थळांमध्ये’ रूपांतरित करावयाची आहेत:
तासिकांचे व वेळेचे नियोजन (8 तासिकांचा आराखडा)
विद्याप्रवेश कार्यक्रमांतर्गत दैनंदिन वेळेची विभागणी आणि उपक्रमांचे नियोजन खालील कोष्टकाप्रमाणे करावे:
| तासिका (Period) | अवधी (Duration) | कृती / उपक्रम (Activity) |
|---|---|---|
| 1 | 30 ते 40 मिनिटे | अभिवादन व संभाषण / संवाद |
| 2 | 30 ते 40 मिनिटे | माझा वेळ |
| – | 10 मिनिटे | छोटी विश्रांती |
| 3 | 30 ते 40 मिनिटे | पायाभूत संख्या ज्ञान |
| 4 | 30 ते 40 मिनिटे | सृजनशील कला |
| – | 40 मिनिटे | जेवणाची सुट्टी |
| 5 | 60 मिनिटे | भाषा विकास (श्रवण, बोलणे, वाचन, लेखन) |
| 6 | 30 ते 40 मिनिटे | मैदानी खेळ |
| – | 10 मिनिटे | माझा वेळ |
| 7 | 20 ते 40 मिनिटे | गोष्ट |
| 8 | 10 ते 20 मिनिटे | पुन्हा भेटू |
विद्याप्रवेश आवश्यक PDF साहित्य व लिंक्स
खालील बटनवर क्लिक करून आपण आवश्यक असणारे सर्व अधिकृत शैक्षणिक साहित्य डाउनलोड करू शकता:





