अध्यक्ष महोदय, आदरणीय शिक्षकगण, आणि माझे सर्व मित्र-मैत्रिणींनो,
आज आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण याच दिवशी आपले भारतीय संविधान लागू झाले होते.
आपल्यापैकी बरेच जणांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यांच्यातील फरक माहित नसतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, पण 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला एक स्वतंत्र देश म्हणून ओळख मिळाली.आपले संविधान हे आपल्या देशाचे सर्वोच्च कायदा आहे. या संविधानामुळे आपल्याला बरेच मूलभूत अधिकार मिळाले आहेत, जसे की भाषण करण्याचा अधिकार, शिक्षण घेण्याचा अधिकार आणि स्वतंत्रपणे विचार करण्याचा अधिकार.
आपल्याला हे अधिकार मिळाले ते आपल्या स्वातंत्र्य सानिकांमुळे,त्यांनी आपल्या देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानाची रचना केली. त्यांनी आपल्या देशासाठी खूप मोठे काम केले.
आज आपल्याला आपल्या संविधानाचा अभिमान वाटतो. पण, आपण आपल्या अधिकारांसह आपली कर्तव्येही विसरू नयेत. आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा.शिक्षित व्हा, आपल्या देशाची सेवा करा आणि आपल्या देशाचे नाव उंच ठेवा.
आज आपण शपथ घेऊया की,आपण आपल्या देशासाठी काहीतरी करू. आपण एकजूट होऊन आपल्या देशाची उन्नती करू.
जय हिंद!
प्रजासत्ताक दिन मराठी भाषणे
11. मराठी भाषण
12. मराठी भाषण
13. मराठी भाषण
14. मराठी भाषण
15. मराठी भाषण
16. मराठी भाषण
17. मराठी भाषण
18. मराठी भाषण
19. मराठी भाषण
www.smartguruji.in
शैक्षणिक समूहात पाठवा.