प्रजासत्ताक दिन भाषण-3

HAPPY INDIAN REPUBLIC DAY
भारतीय प्रजासत्ताक दिन मराठी भाषण
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ….
आपल्या भारत देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन.. प्रजासत्ताक दिना दिवशी सर्वत्र देशात उत्साहाची वातावरण असते. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या देशाचे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी उपयुक्त भाषण आम्ही उपलब्ध करून देत आहोत.
भारतीय राज्यघटनेचा विजय असो..
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो…
बोलो भारत माता की जय..
जय हिंद
जय भारत
प्रजासत्ताक दिन मराठी भाषण- 3
“उत्सव तीन रंगांचा,
उत्सव लोकशाहीचा !
उत्सव देशप्रेमाचा !
उत्सव प्रत्येक भारतीयाचा,
उत्सव प्रजासत्ताक दिनाचा !
उत्सव प्रजासत्ताक दिनाचा !
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मंगल समयी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
प्रचंड त्याग,बलिदान आणि रक्तरंजीत इतिहास असलेल्या भारत देशाला अनेक लढाया व चळवळीनंतर स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा इंग्रजांनी देशाची पार वाट लावली होती.अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था,देशाचा राज्यकारभार या प्रमुख समस्या देशापुढे होत्या.तरीही आज आपला देश जगातील सर्वात मोठी लोकशाही देश म्हणून ओळखला जातो.
26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अमलात आली व आपला भारत देश प्रजासत्ताक देश बनला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.राज्यघटना निर्मितीत आंबेडकरांचे योगदान पाहून म्हणावे वाटते की,
बहुजनांची तो तलवार होऊन गेला,
अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेला,
होता तो एक गरीबच,
पण जगात तो एक कोहिनूर होऊन गेला…
घटनेच्या शिल्पकारांनी लिहिलेल्या घटनेचे पालन करून देशाला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया..देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांसाठी मी एवढेच म्हणेन –
झेलली छातीवर गोळी त्या विरांसाठी,
दिला पोटचा गोळा त्या मातेसाठी,
पुसला कुंकवाचा टिळा त्या सौभाग्यासाठी,
निखळले डोईचे छत्र त्या पुत्रासाठी,
कोटी-कोटी प्रणाम रक्त सांडलेल्या प्रत्येक जवानांसाठी ।।
जय हिंद
जय भारत