प्रजासत्ताक दिन भाषण – 4 INDIAN REPUBLIC DAY MARATHI SPEECH-4

प्रजासत्ताक दिन भाषण-4

प्रजासत्ताक दिन भाषण - 4 INDIAN REPUBLIC DAY MARATHI SPEECH-4

HAPPY INDIAN REPUBLIC DAY
भारतीय प्रजासत्ताक दिन मराठी भाषण 
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ….
आपल्या भारत देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन.. प्रजासत्ताक दिना दिवशी सर्वत्र देशात उत्साहाची वातावरण असते. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या देशाचे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी उपयुक्त भाषण आम्ही उपलब्ध करून देत आहोत.

भारतीय राज्यघटनेचा विजय असो..
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो…
बोलो भारत माता की जय..
जय हिंद
जय भारत


    माननीय अध्यक्ष,पुज्य गुरुजन आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रानो,सर्वात प्रथम सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    26 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील एक अविस्मरणीय दिवस आहे.कारण यादिवशी स्वतंत्र भारताची राज्यघटना अंमलात आली आणि आपला भारत देश प्रजासत्ताक देश बनला.

सरफरोशी की तमन्ना

अब हमारे दिल में है

देखना हैं जोर कितना
बाजू ए कातिल में है…

असे म्हणत देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देऊन अनेक देशभक्तांनी आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळवून दिले.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले पण आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालणार असा प्रश्न त्यावेळी आपल्या देशापुढे होता..अशावेळी डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती नेमण्यात आली.
राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी भारताचे पहिले कायदामंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नेमण्यात आली.
डॉ. आंबेडकरांनी अहोरात्र कष्ट करून आपल्या देशाची राज्यघटना तयार केली व ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली.आपल्या देशात खरी सत्ता लोकांच्या हाती आली.
        लोकांनी,लोकांसाठी,लोकांकडून चालवली जाणारी लोकशाही राज्यपद्धती स्वीकारणारा व जगात सर्वात मोठी लिखित राज्यघटना असणारा देश म्हणजे आपला भारत देश असे आपण अभिमानाने म्हणू लागलो.
        डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून सन्मानित करण्यात आले.राज्यघटनेने आपल्याला शिक्षण,भाषण,धार्मिक, गुप्तता इत्यादी आवश्यक हक्क दिले आहेत.आपल्या संविधानातील भाषण स्वातंत्र्य या हक्कामुळेच मी आपल्या समोर भाषण करत आहे.याचा मला अभिमान वाटतो.
        राज्यघटनेने दिलेल्या सर्व हक्कांचे संरक्षण करूया व देशाला प्रगतीच्या दिशेने नेऊया आणि अभिमानाने गाऊया..

मेरा मुलक मेरा देश
मेरा ए वतन
शांती का उन्नती का
प्यार का चमन
इसके वास्ते निसार है
मेरा मन मेरा तन..

➖➖➖➖➖➖➖➖

भारतीय प्रजासत्ताक दिन

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 263

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *