आपल्या भारत देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन.. प्रजासत्ताक दिना दिवशी सर्वत्र देशात उत्साहाची वातावरण असते. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या देशाचे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी उपयुक्त भाषण आम्ही उपलब्ध करून देत आहोत.
मैं उस देश का नागरिक हुं
नमस्कार मी……. मी आज प्रजासत्ताक दिनाबद्दल भाषण करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे…
15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारतीय स्वातंत्र्याची पहाट झाली.150 वर्षांच्या गुलागीरीतून भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले.हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे व देशाचा राज्य कारभार सुरळीतपणे चालवणे हे आव्हान आपल्या देशासमोर होते.अशावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून अनेक जाती,धर्म,भाषा,संस्कृती इत्यादी मध्ये विविधता असणाऱ्या भारत देशाची राज्यघटना लिहिली व ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 दिवशी अंमलात आली.या दिवसापासून आपला देश प्रजासत्ताक देश बनला.
भारत देशाला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक बनवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आणि नेत्यांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करून हा दिवस आनंदाने आणि उत्साहाने साजरा करूया.