SHIKSHAN SAPTAH DAY-2 शिक्षण सप्ताह दिवस-दुसरा

राष्ट्रीय शिक्षण घोरण 2020 व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान :
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये प्राथमिक स्तरावर सन 2027 पर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. सदर धोरणातील महत्वपूर्ण कार्यनिती पुढीलप्रमाणेः

1) पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण (ECCE) याला प्राधान्यक्रम

2) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या राष्ट्रीय अभियानाची निपुण भारत अभियान म्हणून अंमलबजावणी (शासननिर्णय 27 ऑक्टोबर 2021)

3) उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण अध्ययन व अध्यापन साहित्य चे विकसन

4) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान गतिमान करण्यासाठी नियमित मूल्यांकन

5) बालकांच्या घरातील अध्ययनाकरिता पालकांचा व समुदायाचा सक्रीय सहभाग

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता 2 री च्या अखेरीस आकलनासह वाचन व मुलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणे होय. संबंधित कौशल्ये ही पुढील बाबीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतात.

  • बोधात्मक विकास व सर्व अध्ययन क्षमतांचे विकसन
  • अध्ययनासाठी सकारात्मक दृष्टीकोन व आत्मविश्वास निर्मिती.
  • समतामूलक शिक्षणाची खात्री व अध्ययन अंतर कमी करणे.
  • शिक्षणाच्या विविध स्तरावर विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी सक्षम करणे.

सप्ताहाचा दुसरा दिवस हा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा.





Share with your best friend :)