शिक्षण सप्ताह
दिवस पहिला
सोमवार दि. 22 जुलै, 2024.
उपक्रम- अध्यापन-अध्ययन साहित्य (TLI) दिन
Celebration of “Shiksha Saptah” from 22nd to 28th July, 2024 on the eve of 4th anniversary of National Education Policy (NEP) 2020
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै, 2024 या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करणेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्र. 1 नुसार कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक,धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.
प्रस्तुत दिन साजरा करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने वर्गनिहाय उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना/तत्त्वेः
1. घोषवाक्ये असलेले पोस्टर्सः “पाणी कसे वाचयायचे” आणि “इतरांना कशी मदत यासारख्या विषयावर आधारित पोस्टर्स बनविणे. करावी”
2. कोडी: विज्ञान आणि गणित या विषयांवर अधिक लव केंद्रित असणारी कोडी तयार करायला सांगणे.
3. खेळ (मैदानी/शारीरिक आणि डिजिटल स्वरूपाचे): सामाजिक शाखे, विज्ञान, गणित आणि भापां इत्यादी विषयांशी संबंधित खेळांचे आयोजन करणे.
4. त्रिमितीय प्रतिकृती (मॉडेल्स): ऐतिहासिक वास्तू, शारीरिक रचना किंवा भौमितिक आकारांचे त्रिमितीय मॉडेल तयार करण्यासाठी माती किंवा पेपर-मॅचे (कागदी लगदा) यासारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करणे.
5. बोर्ड गेम्स (पटावरील खेळ): अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याच्या दृष्टीने फैब्रिक किंवा कार्डबोर्डवर (कापड किंवा पुठ्यावर) खेळ विकसित करून शिकण्याच्या उद्देशांसह पटावरील खेळ तयार करणे.
6. भिंतीवरील तक्तेः महत्वाच्या संकल्पना किंवा ऐतिहासिक कालखंड/सनावळ्या सारांशित करणारे तक्ते तयार करण्यासाठी जुनी वर्तमानपत्रे किंवा कापड वापरणे.
7. वाचन कट्टा (क्लब): वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे.
1. कोडी आणि आव्हानात्मक कार्ड तयार करणे.
2. खेळ: लूडोसारखे इतर खेळ तयार करणे.
3. खेळणीः कागद आणि वांबूच्या कांड्या यासारख्या किंवा तत्सम प्रकारच्या स्थानिक साहित्यापासून खेळणी बनविणे.
4. कठपुतळी/बाहुलीनाट्यः कपडे आणि टाकाऊ वस्तूंनी कठपुतळी किंवा बाहुली बनविणे. 5. गोष्टीचे कार्डस (Story Cards): पाच ते सहा स्व-स्पष्टीकरणात्मक गोष्टींचे कार्डस तयार करणे. 6. तक्ते बनविणेः “अन्न आणि भाजीपाला”, “स्थानिक जारपेठ”, “माझे कुटुंब” इत्यादी विषयावर आधारित तत्क्ते बनविणे.
7. वाचन कट्टा (क्लब): वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे.
1. तत्क्ते बनविणेः “अन्न आणि भाजीपाला”, “स्थानिक बाजारपेठ”, “माझे कुटुंब” इत्यादी विषयाचे तत्त्क्ते बनविणे.
2. रंगीत पेटी घन आणि आयताकृती पेटीच्या बाजूला रंगीत कागद चिकटवून मुले अशा पेट्या तयार करू शकतात.
3. फळे, भाज्या, प्राणी इत्यादींचे कार्ड बनवणे.
4. मुखवटेः प्राणी, पक्षी इत्यादींचे मुखवटे बनवणे.
5. वाचन कट्टा आणि कथाकथन सत्र यांचे आयोजन करणे,
1. आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्य पेठ्या उदा. PSE Kit,भाषा व गणित पेटी, इंग्रजी साहित्य पेटी (ELCRLM) तमेच इतर साहित्याच्या माध्यमातून कृती घ्याव्यात.
2. पालक व शिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या छोट्या नाटिकांचे वैयक्तिक अथवा गटामध्ये सादरीकरण घ्यावे.
3. विविध माध्यमांच्या सहाय्याने ठसेकाम करून घ्यावे. उदा. पाणी, फुले, भाज्या, बोटांचे व हातांचे ठसे याप्रमाणे वैविध्यपूर्ण साहित्याचे ठसे घेता येतील.
4. पालक/शिक्षक/विद्यार्थी यांच्या माध्यमातून लोकगीते, लोकनृत्य, लोकसंगीत यांचे सादरीकरण घ्यावे.
5. गोष्टींचा कट्टा बालकांना स्थानिक व वैविध्यपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात यावे.
प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन साहित्य दिवस (TLM DAY) साजरा करणे विषयी मार्गदर्शक सूचना-:
शाळेत वैविध्यपूर्ण शैक्षणिक साहित्यांचे स्टॉल म्हणून प्रदर्शन भरवावे. या प्रदर्शनामध्ये पुढील प्रमाणे स्टॉल्स मांडावेत.
1. वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल्स वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शविणारे स्वतंत्र स्टॉल्स मांडण्यात यावेत. प्रत्येक स्टॉलला आकर्षक नावे द्यावीत. उदा. विविध भित्तीपत्रके असलेल्या स्टॉलला “चला शिकूया भित्तिपत्रकातून तर गोष्टीच्या स्टॉलला, “चला गोष्टी ऐकूया”, कठपुतळी किंवा पपेटच्या स्टॉलला “जर खेळणी बोलू लागली तर” अशी वैविध्यपूर्ण नावे द्यावीत.
2. शायरी वनचलेले शैक्षणिक साहित्य आशय शिकण्यासाठी व शिकविण्यासाठी उपयुक्त असणारे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध शैक्षणिक साहित्य यांचे प्रदर्शन भरवावे.
3. संगीतमय शैक्षणिक साहित्य या स्टॉलवर शिक्षक व विद्यार्थी यांनी गाणी व संगीत वाद्ये यांचा अध्ययन -अध्यापनात प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने दिग्दर्शन करावे. 4. हस्तलिखितांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी व कविता प्रदर्शित कराव्यात.
5. शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन विविध विषयाच्या अनुषंगाने प्रतिकृती, चार्ट्स, फ्लॅश कार्ड, तरंगचित्र, बाहुल्या अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करून प्रदर्शनात मांडावे. 6. दिग्दर्शन वर्ग जवळची अध्यापक विद्यालये अथवा अध्यापक महाविद्यालये येथील छात्राध्यापकांच्या मदतीने नाविन्यपूर्ण अशा शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने असे वर्ग घ्यावेत अथवा त्यांना तसे स्टॉल लावण्याची संधी द्यावी.
शिक्षण सप्ताह दिवस-दुसरा उपक्रमसाठी येथे स्पर्श करा..





