प्रजासत्ताक दिन मराठी भाषण संग्रह -:
प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक अत्यंत महत्वाचा राष्ट्रीय सण आहे.26 जानेवारी 1950 या दिवशी भारताची राज्यघटना अंमलात आली व भारत देश प्रजासत्ताक देश बनला.म्हणून हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवशी देशात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते.अनेक ठिकाणी तिरंगा ध्वज फडकावून. मिठाई वाटून हा सण साजरा केला जातो.शाळा,महाविद्यालयात या दिवशी देशभक्ती गीत,भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात व भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि प्रगतीसाठी प्रयत्न केलेल्या,स्वतःची आहुती दिलेल्या देशभक्तांचे स्मरण केले जाते.भाषणांमध्ये देशाच्या इतिहासाचा, संस्कृतीचा, विकासाचा आणि आधुनिक आव्हानांचा उल्लेख केला जातो.या भाषणांमधून लोकांना देशाच्या प्रगतीसाठी जागृत करण्याचा आणि राष्ट्रभक्ती जागवण्याचा प्रयत्न केला जातो.
या ठिकाणी आम्ही तुम्हाला गणतंत्र दिवसाच्या भाषणांच्या काही उत्कृष्ट उदाहरणे देणार आहे.या उदाहरणांमध्ये तुम्ही भाषणांची रचना, शैली, विषय, आणि प्रभाव बघू शकता.या उदाहरणांमधून तुम्ही तुमच्या स्वतःचे गणतंत्र दिवसाचे भाषण लिहिण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स शिकू शकता. तर चला, या लिंकमध्ये वाचन सुरू करूया.