शहाणपणाने केलेली मोजणी

 शहाणपणाने केलेली मोजणी

कथा क्र. १७ 
211677748 V
अकबराने दरबारात एकदा एक प्रश्न विचारून सर्वांना कोड्यात टाकले.
जेव्हा सगळे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत होते, तेव्हा बिरबल आला आणि त्याने विचारले “हे काय प्रकरण आहे?”
तेव्हा त्यांनी बिरबलाला प्रश्न सांगितला,”शहरात किती कावळे आहेत?”
बिरबल हसला आणि अकबराकडे गेला, आणि घोषित केले की त्याच्या प्रश्नाचे उत्तर आहे,”एकवीस हजार पाचशे तेवीस”
अकबराने बिरबलाला विचारले,”तुला उत्तर कसे ठाऊक?”
बिरबलाने उत्तर दिले, “तुमच्या शिपायांना कावळे मोजण्यास सांगा, जर जास्त असतील तर कावळ्यांचे नातेवाईक शहराबाहेरून त्यांना भेटायला आले असतील आणि जर कमी असतील तर शहरातले कावळे नातेवाईकांना भेटायला शहराबाहेर गेले असतील.”
बिरबलाच्या उत्तरावर खूष होऊन अकबराने बिरबलाला गळ्यातील मोत्याची माळ भेट दिली.
तात्पर्य : आपल्या उत्तरासाठी स्पष्टीकरण असणे हे उत्तराइतकंच महत्वाचे आहे.
Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now