गवळण आणि तिच्या घागरी

गवळण आणि तिच्या घागरी

कथा क्र. २१ 
43503532 V
राधा गवळणीने गायीचे दूध काढले आणि तिच्याकडे दोन घागरभर सायीचे दूध जमा झाले. तिने दोन्ही घागरी काठीला टांगल्या आणि बाजाराकडे दूध विकण्यासाठी निघाली. वाटेवर चालताना ती घागरीं मध्ये जमा झालेल्या दुधाचा आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांचा विचार ती करू लागली.” जेव्हा मला पैसे मिळतील,तेव्हा मी कोंबड्या विकत घेईन.”
तिने विचार केला, “कोंबड्या अंडी घालतील आणि मला अजून कोंबड्या मिळतील, त्या सगळ्या कोंबड्या अंडी घालतील, आणि ती विकून मला अजून पैसे मिळतील. मग मी टेकडीवर घर घेईन, गावातील सगळे जण माझा हेवा करू लागतील.
ते मला विचारतील, “तुला पोल्ट्री फार्म विकायचे आहे का?” पण मी डोकं असं हलवून नकार देईन  असं म्हणत असतानाच राधा गवळणीने तिचे डोके हलवले आणि तिच्या घागरी पडल्या, सगळे दूध जमिनीवर सांडलेले पाहून राधा रडू लागली.
तात्पर्य: पेरल्याशिवाय उगवणार नाही.
Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now