संकलित मूल्यमापन-2 (SA-2): इयत्ता 8वी मराठी नमुना प्रश्नपत्रिका 2025-26
प्रस्तावना: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बांधवांनो! शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या द्वितीय सत्राची तयारी आता जोरात सुरू झाली असेल. विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आणि परीक्षेचे स्वरूप समजून घेण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत— इयत्ता 8वी मराठी (SA-2) नमुना प्रश्नपत्रिका-1.
या प्रश्नपत्रिकेची ठळक वैशिष्ट्ये:
- अद्ययावत अभ्यासक्रम: 2025-26 च्या शैक्षणिक आराखड्यावर आधारित.
- गुण विभागणी: एकूण 40 गुणांची परिपूर्ण प्रश्नपत्रिका.
- वेळेचे नियोजन: 90 मिनिटांच्या वेळेत पेपर कसा सोडवावा, याचा सराव करण्यासाठी उपयुक्त.
- सर्वसमावेशक प्रश्न: यामध्ये गद्य, पद्य, व्याकरण आणि उपयोजित लेखन या सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
संकलित मूल्यमापन – 2 (मार्च – 2026)
नमूना प्रश्नपत्रिका – 1
प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून लिहा. (4 गुण)
1. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेमध्ये प्रामुख्याने कोणत्या भाषेचा वापर केला गेला आहे?
अ) कोकणी
ब) अहिराणी/खानदेशी
क) हिंदी
ड) संस्कृत
2. ‘तीन मुद्दे’ या पाठाचे लेखक कोण आहेत?
अ) साने गुरुजी
ब) विनोबा भावे
क) पु.ल. देशपांडे
ड) प्रल्हाद बडवे
3. गोलघुमट कशासाठी प्रसिद्ध आहे?
अ) उंचीसाठी
ब) प्रतिध्वनीच्या चमत्कारासाठी
क) रुंदीसाठी
ड) रंगासाठी
4. संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय होते?
अ) डेबुजी झिंगराजी जानोरकर
ब) तुकाराम
क) नामदेव
ड) ज्ञानेश्वर
प्रश्न 2. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (6 गुण)
- मुक्ताईचे वय किती होते?
- माहेरवाशीण कशाची वाट पाहत आहे?
- ‘अगा वैकुंठीच्या राया’ या अभंगात कान्होपात्रा कोणाची भक्त आहे?
- शनिवारवाड्यात पाण्याची सोय नसल्याने पाणी कोठून आणण्याचे ठरले?
- कृष्णाजी ब. निकुंब यांनी आपला पहिला काव्यसंग्रह केव्हा प्रसिद्ध केला?
- ‘म्हाइंभटी सिद्धापणी’ या पाठाचे मूल्य काय आहे?
प्रश्न 3. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा / जोड्या जुळवा. (4 गुण)
- काम म्हणजे वेग, नेटकेपणा आणि _________ होय.
- कानडी ही मराठीची _________ असे बा. कृ. गलगली म्हणाले.
- ‘गोपाळकाला’ ही कविता _________ या पुस्तकातून निवडली आहे.
- महानुभाव पंथाचे संस्थापक _________ हे होते.
प्रश्न 4. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 3) (6 गुण)
- ज्ञानदेवांनी ताटी (दरवाजा) का बंद केला होता?
- ‘तीन मुद्दे’ पाठात लेखकाने कामाचा गाभा कशाला म्हटले आहे?
- बहिणीच्या मनात ‘दादा न येण्याची’ कोणकोणती कारणे येतात?
- म्हातारपणी उमाइसेस पश्चाताप का झाला?
प्रश्न 5. खालील वाक्यांचे संदर्भासह स्पष्टीकरण करा. (कोणतेही 2) (6 गुण)
- “मधले अंतर आहे 124 फूट.”
- “दिवस निघता निघता तिच्या देहातून प्राण गेला.”
- “तू शूद्र माझीये करवतीयेची पाणी का प्यालासी?”
प्रश्न 6. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (कोणतेही 2) (8 गुण)
- ‘आलोकाबाईस पत्र’ या पाठावरून गाडगेबाबांचा स्वभाव कसा होता हे स्पष्ट करा.
- ‘भाषा बांधव्य’ या पाठात कन्नड व मराठी संतांमधील समानता कशी व्यक्त झाली आहे?
- शनिवारवाड्यात कात्रजच्या तळ्याचे पाणी आणण्यासाठी श्रीमंत नानासाहेबांनी कोणते प्रयत्न केले?
प्रश्न 7. व्याकरणावर आधारित खालील प्रश्न सोडवा. (6 गुण)
- संधी विग्रह करा: सूर्यास्त
- ‘अं, अः’ या वर्णांना काय म्हणतात?
- नामाचे मुख्य प्रकार किती आहेत?
- अलंकार ओळखा: “शंकरास पूजिले सुमनाने.” (श्लेष / यमक / उपमा)
- वचन बदला: घर
- ‘ह’ या वर्णाला कोणता वर्ण म्हणतात?
MODEL ANSWER SHEET (नमूना उत्तरपत्रिका)
प्रश्न 1 (योग्य पर्याय):
1. ब) अहिराणी/खानदेशी
2. ब) विनोबा भावे
3. ब) प्रतिध्वनीच्या चमत्कारासाठी
4. अ) डेबुजी झिंगराजी जानोरकर
1. ब) अहिराणी/खानदेशी
2. ब) विनोबा भावे
3. ब) प्रतिध्वनीच्या चमत्कारासाठी
4. अ) डेबुजी झिंगराजी जानोरकर
प्रश्न 2 (एका वाक्यात):
1. मुक्ताईचे वय दहा वर्षे होते.
2. माहेरवाशीण भाऊबीजेच्या दिवशी आपल्या भावाची (भाऊरायाची) वाट पाहत आहे.
3. कान्होपात्रा विठ्ठलाची भक्त आहे.
4. शनिवारवाड्यात पाणी ‘कात्रजच्या तळ्यातून’ आणण्याचे ठरले.
5. इ.स. 1945 साली प्रसिद्ध केला.
6. या पाठाचे मूल्य ‘अस्पृश्यता निर्मूलन’ हे आहे.

प्रश्न 3 (रिकाम्या जागा):
1. ज्ञान | 2. अक्का | 3. वाचू आनंदे | 4. श्रीचक्रधरस्वामी
1. ज्ञान | 2. अक्का | 3. वाचू आनंदे | 4. श्रीचक्रधरस्वामी
प्रश्न 4 (थोडक्यात उत्तरे):
1. संन्यासाची पोरं म्हणून लोक त्यांना हिणवत होते, म्हणून रागावून ज्ञानदेवांनी ताटी बंद केली.
2. सुंदरता ही कामाची शोभा नसून तो कामाचा ‘गाभा’ आहे.
3. लहानपणी दादाला चावणे, भातुकलीचे दाणे खाणे, या गोष्टी आठवून त्याला राग आला असावा.
4. उमाइसाने चक्रधरस्वामींची शिकवण विसरून अस्पृश्य-स्पृश्य भेदभाव केला, म्हणून तिला पश्चाताप झाला.

प्रश्न 5 (संदर्भ):
1. संदर्भ: ‘कर्नाटकातील काही शिल्पसुंदर स्थळे’, लेखक – कृ. ब. निकुंब. स्पष्टीकरण: गोलघुमटाच्या दोन सज्जांमधील अंतर.
2. संदर्भ: ‘माय’ कविता, कवी – वामन निंबाळकर. स्पष्टीकरण: सर्पदंशामुळे मायचा मृत्यू झाला.
3. संदर्भ: ‘म्हाइंभटी सिद्धापणी’, संपादक – ना. वा. देशपांडे. स्पष्टीकरण: उमाइसाने कोथळोबाला शूद्र समजून राग व्यक्त केला.

प्रश्न 6 (सविस्तर):
1. गाडगेबाबा निष्ठावंत व परोपकारी होते. त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला संपत्तीचा मोह करू दिला नाही. गरिबांची सेवा हेच त्यांचे व्रत होते.
2. कन्नड संत पुरंदरदास आणि मराठी संत एकनाथ समकालीन होते. दोघांच्या साहित्यात भक्ती आणि समतेची शिकवण समान आहे.
3. नानासाहेबांनी पाण्याचे स्रोत शोधले, आठ दिवस मोटे चालवून पाणी आटत नाही याची खात्री केली आणि दगडी चिरेबंदी नळ बांधले.

प्रश्न 7 (व्याकरण):
1. सूर्य + अस्त | 2. स्वरादी | 3. तीन | 4. श्लेष | 5. घरे | 6. महाप्राण
1. सूर्य + अस्त | 2. स्वरादी | 3. तीन | 4. श्लेष | 5. घरे | 6. महाप्राण
ORAL TEST (तोंडी परीक्षा)
1. ‘माझी मुक्ताई’ ही कविता कोणी लिहिली आहे?
→ बहिणाबाई चौधरी
→ बहिणाबाई चौधरी
2. ज्ञानदेवाने वयाच्या कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी पूर्ण केली?
→ अठराव्या वर्षी
→ अठराव्या वर्षी
3. विजापूर ही कोणत्या राजाची राजधानी होती?
→ आदिलशाही
→ आदिलशाही
4. ‘इब्राहिम रोजा’ ही इमारत कशाने नटली आहे?
→ कोरीव काम आणि कलाकुसर
→ कोरीव काम आणि कलाकुसर
5. मराठी आणि कानडी भाषेला ‘जुळी भावंडे’ असे कोणी म्हटले आहे?
→ शं. बा. जोशी
→ शं. बा. जोशी
6. कामाची तीन स्वतंत्र अंगे कोणती?
→ वेग, नेटकेपणा आणि ज्ञान
→ वेग, नेटकेपणा आणि ज्ञान
7. ‘माय’ कवितेत मायचा मृत्यू कशामुळे झाला?
→ सर्पदंशाने
→ सर्पदंशाने
8. अमरावती विद्यापीठाला कोणाचे नाव दिले आहे?
→ संत गाडगे महाराज
→ संत गाडगे महाराज
9. श्रीकृष्णाने गोपाळकाला कोठे मांडला होता?
→ विस्तीर्ण शिळेवर
→ विस्तीर्ण शिळेवर
10. ‘रामा सावकाश चालतो’ – ‘सावकाश’ शब्दाची जात कोणती?
→ क्रियाविशेषण
→ क्रियाविशेषण