इयत्ता – 5वी
विषय – परिसर अध्ययन
गुण – 10
LBA आधारित नमुना प्रश्नपत्रिका
पाठ 13.आश्चर्यकारक उर्जा
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 5वी • विषय – परिसर अध्ययन • पाठ 13.आश्चर्यकारक उर्जा • गुण – 10
प्रश्नपत्रिकेचा आराखडा (Blueprint) – गुण: 10
| प्रश्नाचे स्वरूप (Question Type) | सोपे (Easy) (45%) | मध्यम (Average) (40%) | कठीण (Difficult) (15%) | एकूण गुण (Total Marks) |
|---|---|---|---|---|
| MCQ / एका वाक्यात उत्तर | 3 Marks | 2 Marks | – | 5 Marks |
| रिकाम्या जागा भरा / चूक-बरोबर | 2 Marks | 2 Marks | – | 4 Marks |
| 2-3 वाक्यात उत्तर | – | – | 1 Mark | 1 Mark |
| एकूण गुण (Total) | 5 Marks | 4 Marks | 1 Mark | 10 Marks |
लेखी परीक्षा प्रश्नपत्र (Written Examination)
प्रश्न 1ला: योग्य उत्तर निवडा. (Marks: 3)
- ऊर्जेचे मूळ नसलेला खालीलपैकी कोणता पर्याय आहे?
(a) सौर शक्ती (b) वारा (c) पाणी(d) दगड - शारीरिक प्रत्येक कार्यासाठी आपणाला ऊर्जा कशामुळे मिळते?
(a) कपडे(b) अन्नाचे सेवन (c) झोप (d) खेळ - सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेला काय म्हणतात?
(a) उष्णता ऊर्जा (b) पवन ऊर्जा(c) सौर ऊर्जा (d) रासायनिक ऊर्जा
प्रश्न 2रा: खालील वाक्ये चूक की बरोबर ते सांगा. (Marks: 2)
- खेळण्यासाठी ऊर्जा लागत नाही. _________
- सूर्य हा ऊर्जेचा स्त्रोत आहे. _________
प्रश्न 3रा: खालील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात/वाक्यात लिहा. (Marks: 2)
- ऊर्जा म्हणजे काय?
- आम्हाला ऊर्जा देणारा तारा कोणता?
प्रश्न 4था: खालील रिकाम्या जागा भरा. (Marks: 2)
- वाऱ्या (वायु) पासून ___________ निर्माण करतात.
- _______________ हे इंधन संपणारे असून तयार होण्यास लाखो वर्षे लागतात.
प्रश्न 5वा: थोडक्यात उत्तर लिहा (2-3 वाक्यात). (Marks: 1)
- विद्युत ऊर्जा व्यर्थ (विनाकारण) वापरल्याने काय होईल?
तोंडी परीक्षा प्रश्न (Oral Exam Questions) – (15 Easy/Medium)
Q.1: कार्य करण्यास आम्हाला काय पाहिजे?
Q.2: सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेला कोणती ऊर्जा म्हणतात?
Q.3: कोणता तारा पृथ्वीला उष्णता (ऊर्जा) देतो?
Q.4: पवनचक्की पासून काय निर्माण होते?
Q.5: कोळसा आणि पेट्रोल ही संपणारी ऊर्जा आहे, बरोबर की चूक?
Q.6: पवनचक्की पासून विद्युत ऊर्जा निर्माण होते, बरोबर की चूक?
Q.7: सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास आपण कशाची बचत करू शकतो?
Q.8: आम्हाला ऊर्जा कुठून मिळते?
Q.9: न वापरलेली विद्युत उपकरणे बंद ठेवल्याने कोणती ऊर्जा वाचते?
Q.10: आमच्या शरीराला शक्ती मिळण्यासाठी ऊर्जा कुठून मिळते?
Q.11: सौर ऊर्जेचा एक उपयोग सांगा.
Q.12: सूर्यप्रकाशापासून अन्न शिजवण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?
Q.13: ऊर्जा बचत करण्याचा एक सोपा उपाय सांगा.
Q.14: विद्युत सेलमध्ये ऊर्जा निर्मिती हे कोणत्या ऊर्जेचे उदाहरण आहे?
Q.15: वाहत्या पाण्यामुळे कोणती ऊर्जा निर्माण होते?





