LBA 10वी मराठी गद्य 1 – अनंतशक्ति परमेश्वरु | पद्य 1 – पैल तो गे काऊ कोकताहे

  1.  पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वीसाठी 20 गुण विचारात घ्यावे.
  2.  भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक धडा आणि एक कविता विचारात घ्यावी.
  3.  इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक धडा-आधारित मूल्यमापन करावे.
  4.  इयत्ता 1 ते 5 वीच्या धडा-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
  5. इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
  6. इयत्ता 8 ते 10 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील बहुपर्यायी आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
  7. ‘मुरुसिंचन’ कार्यक्रम राबवणाऱ्या जिल्ह्यांनी इयत्ता 6 ते 10 वीसाठी हिंदी भाषा वगळता 15 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील आणि 05 गुणांसाठी ‘मुरुसिंचन’ कार्यक्रमातील प्रश्नांचा विचार करून एकूण 20 गुणांसाठी लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
  8. पाठ-आधारित मूल्यमापन प्रश्न बँकेचा वापर शिकण्याच्या आणि मूल्यमापनाच्या प्रक्रियांमध्ये सतत करून विद्यार्थ्यांनी उत्तम शैक्षणिक प्रगती साधावी यासाठी कार्यवाही करावी.
पाठ आधारित मूल्यमापन नमूना प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन नमूना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 10वी

विषय – मराठी

गुण – 20

गद्य 1 – अनंतशक्ति परमेश्वरु | पद्य 1 – पैल तो गे काऊ कोकताहे

प्रश्नपत्रिकेची ब्लूप्रिंट (Question Paper Blueprint)

उद्दिष्टानुसार प्रामुख्यतागुण विभागणीकठीण पातळीनुसारगुण विभागणी
स्मरण (Knowledge)9 गुण (45%)सोपे (Easy)11 गुण (55%)
आकलन (Understanding)6 गुण (30%)मध्यम (Average)6 गुण (30%)
अभिव्यक्ती (Expression)5 गुण (25%)कठीण (Difficult)3 गुण (15%)
एकूण (Total)20 गुण (100%)एकूण (Total)20 गुण (100%)

विभाग अ: गद्य – अनंतशक्ति परमेश्वरु (10 Marks)

प्रश्न 1. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) (1 x 2 = 2 Marks)

  1. ‘जात्यंध’ शब्दाचा संधी विग्रह असा होतो.
    • अ) जात + अंध
    • ब) जात्य + अंध
    • क) जात यंद
    • ड) जाति + अंध
  2. ‘परमेश्वर’ या शब्दाचा संधी प्रकार कोणता?
    • अ) स्वर संधी
    • ब) विसर्ग संधी
    • क) व्यंजन संधी
    • ड) यापैकी नाही

प्रश्न 2. एका वाक्यात उत्तरे लिहा. (1 x 3 = 3 Marks)

  1. महानुभाव पंथाचे संस्थापक कोण?
  2. हत्ती पाहण्यासाठी कोण गेले?
  3. पोट पाहणाऱ्यास हत्ती कसा वाटला?

प्रश्न 3. दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (2 x 2 = 4 Marks)

  1. डोळस मनुष्य आंधळ्याना काय म्हणाला?
  2. ‘अनंतशक्ति परमेश्वरु’ या कथेचे तात्पर्य कोणते?

प्रश्न 4. संबंध ओळखून लिहा. (1 Mark)

  1. सर्व जाणणारा : सर्वज्ञ :: जन्मापासून अंध :________

विभाग ब: पद्य – पैल तो गे काऊ कोकताहे (10 Marks)

प्रश्न 5. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) (1 x 2 = 2 Marks)

  1. ‘कोकताहे’ या शब्दाचा संधी विग्रह असा होतो.
    • अ) कोकत + आहे
    • ब) कोक + आहे
    • क) कोकः + आहे
    • ड) का + कताहे
  2. पंढरीराव या सामाजिक शब्दाचा समास हा होतो.
    • अ) अव्ययीभाव
    • ब) षष्ठी तत्पुरुष
    • क) बहुव्रीही
    • ड) द्वंद्व

प्रश्न 6. एका वाक्यात उत्तरे लिहा. (1 x 3 = 3 Marks)

  1. ज्ञानेश्वर कोणाशी बोलत आहेत?
  2. लोकसाहित्यात कोणत्या पक्षाला माहेरचा दूत मानले जाते?
  3. पाहुणे म्हणून घरी कोण यावे असे कवीला वाटते?

प्रश्न 7. दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (2 x 2 = 4 Marks)

  1. हवा असलेला शकुन सांगण्यासाठी कवी कावळ्याला कोणकोणत्या गोष्टी देऊ करतो?
  2. “पाहुणे पंढरीरावो घरा कै येती.” संदर्भसहित स्पष्टीकरण करा.

प्रश्न 8. अलंकार ओळखून लक्षणे सांगा. (1 Mark)

  1. सुसंगती सदा घडो सुज्जन वाक्य कानी पडो |

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now