5वी गणित 5.अपूर्णांक (LBA नमुना प्रश्नपत्रिका)

CLASS – 5

MEDIUM – MARATHI

SUBJECT – MATHEMATICS

SYLLABUS – KARNATAKA STATE 

LESSON BASED ASSESSMENT MODEL QUESTION PAPER

  1. सर्व प्रश्न फक्त LBA प्रश्नसंचातून घ्यावेत का?
    ➤ होय, शिकवण्यापासून मूल्यमापनापर्यंत LBA प्रश्नांचा उपयोग करावा. प्रश्नपत्रिका स्वतः तयार करता येते.
  2. उर्दू माध्यमासाठी LBA प्रश्नसंच मिळेल का?
    ➤ होय, त्याचे भाषांतर व रचना सुरू असून लवकरच उपलब्ध होईल.
  3. प्रत्येक पाठासाठी ब्लूप्रिंटनुसार प्रश्नपत्रिका तयार करावी का?
    ➤ होय,
    • इयत्ता 1 ते 5: 10 लेखी + 5 तोंडी = 15 गुण
    • इयत्ता 6 ते 10: 20 लेखी
    • पुनः सिंचन (Marusinchan) असलेल्या जिल्ह्यांसाठी: LBA 15 + पुनः सिंचन 5 = 20 गुण

पाठ आधारित मूल्यमापन

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 5वी विषय – गणित गुण: 20

प्रकरण: 5. अपूर्णांक

Question Paper Blueprint

Knowledge LevelMarksDifficulty LevelMarks
Remembering (ज्ञान)4 (20%)Easy (सोपे)6 (30%)
Understanding (आकलन)7 (35%)Average (मध्यम)7 (35%)
Application (उपयोजन)6 (30%)Difficult (अवघड)7 (35%)
Skill (कौशल्य)3 (15%)Total20
Total20

I. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. (3 × 1 = 3 Marks)

1. 2/4 ह्या अपूर्णांकातील अंश.

  • A) 4
  • B) 2/4
  • C) 2
  • D) 4/2

2. 2/3 चा समान अपूर्णांक.

  • A) 4/6
  • B) 1/3
  • C) 2/4
  • D) 4/3

3. 6/12 चे संक्षिप्त रूप.

  • A) 6/12
  • B) 1/3
  • C) 2/5
  • D) 1/2

II. एका वाक्यात उत्तरे लिहा. (3 × 1 = 3 Marks)

1. अपूर्णांकामध्ये रेषेच्या वर असलेल्या संख्येला ______ म्हणतात.

2. 3/7 मधील अंश.

3. अपूर्णांक वाचताना ______ प्रथम सांगावा.

III. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (2 × 3 = 6 Marks)

1. समान अपूर्णांक म्हणजे काय? उदाहरणासह स्पष्ट करा.

2. पिंटूने 1/4 भाग भाकरी आणि चिंटूने 2/4 भाग भाकरी खाल्ली. त्यांनी खालेल्या भाकरीचे भाग चित्ररूपात दाखवून रंगवा.

IV. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (2 × 2 = 4 Marks)

1. 3/5 आणि 1/3 हे समान अपूर्णांक आहेत का ? तपासा.

2. संक्षिप्त रूपात लिहा. a) 12/16 b) 9/27

V. खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. (1 × 4 = 4 Marks)

1. राजूने त्याच्याकडील 12 चॉकलेटपैकी 2/6 भाग आपल्या मित्राला दिला. तर राजूने मित्राला दिलेल्या चॉकलेटची संख्या किती?

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now