इयत्ता 10 वी : विषय – विज्ञान
सराव चाचणीपूर्वी वाचण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे (Important Points for Revision)
- कार्बनचे अष्टपैलू स्वरूप: कार्बनमध्ये कॅटेनेशन (Catenation) आणि चतु:संयुजी (Tetravalency) हे दोन वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असतात, ज्यामुळे तो बहुसंख्येने संयुगांची निर्मिती करतो.
- कॅटेनेशन (Catenation): कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणुबरोबर बंध निर्माण करण्याची अद्वितीय क्षमता असते, ज्यामुळे तो लांब शृंखला, शाखायुक्त शृंखला किंवा वलयांकित रचना (Ring) तयार करू शकतो.
- संयुजा: कार्बनची संयुजा 4 आहे, त्यामुळे तो इतर चार कार्बन अणूंबरोबर किंवा इतर मूलद्रव्यांच्या अणूंबरोबर बंध निर्माण करू शकतो.
- सेंद्रिय संयुगे (Organic Compounds): सेंद्रिय संयुगे केवळ सजीवांमध्येच तयार होतात हा समज खोटा ठरवत, 1828 मध्ये फ्रेडरिक वोहलरने अमोनियम सायनेटपासून ‘युरिया’ची (Urea) प्रयोगशाळेत निर्मिती केली.
- संपृक्त आणि असंपृक्त संयुगे: ज्या कार्बन संयुगांमध्ये कार्बनचे अणू परस्परांमध्ये एकेरी बंधाने (Single bond) जोडलेले असतात त्यांना संपृक्त (Saturated) संयुगे म्हणतात. तर, कार्बनचे अणू परस्परांमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंधाने (Double/Triple bond) जोडलेले असल्यास त्यांना असंपृक्त (Unsaturated) संयुगे म्हणतात.
- हायड्रोकार्बन्स: ज्या कार्बन संयुगांमध्ये केवळ कार्बन आणि हायड्रोजन असतात त्यांना ‘हायड्रोकार्बन्स’ असे म्हणतात. एकेरी बंध असणाऱ्या हायड्रोकार्बन्सना अल्केन्स (Alkanes), दुहेरी बंध असणाऱ्यांना अल्कीन्स (Alkenes) आणि तिहेरी बंध असणाऱ्यांना अल्काईन्स (Alkynes) म्हणतात.
- रचनात्मक आयसोमर (Structural Isomers): ज्या संयुगांची रेणूसूत्रे समान असतात परंतु रचना भिन्न असते, त्यांना रचनात्मक आयसोमर म्हणतात (उदा. ब्युटेन – C4H10).
- महत्त्वाची रेणूसूत्रे: मिथेन (CH4), सायक्लोहेक्झेन (C6H12), बेंझिन (C6H6), इथीन (C2H4), आणि इथाईन (C2H2).
- क्रियात्मक गट (Functional Groups): हायड्रोजनला विस्थापित करून कार्बन शृंखलेला विशिष्ट गुणधर्म प्राप्त करून देणाऱ्या गटांना क्रियात्मक गट म्हणतात. उदा. अल्कोहोल (-OH), हॅलोजन (Cl/Br).
- समजातीय श्रेणी (Homologous Series): ज्या संयुगांच्या श्रेणीमध्ये कार्बन शृंखलेतील हायड्रोजनची जागा एकाच प्रकारचा क्रियात्मक गट घेतो, त्याला समजातीय श्रेणी म्हणतात. या श्रेणीत लागोपाठ येणाऱ्या संयुगांच्या सूत्रांमध्ये -CH2 या एककाचा फरक असतो. अल्कीन्सचे सामान्य सूत्र CnH2n असे आहे.
महत्त्वाची सूचना: कृपया सर्व 15 प्रश्न सोडवा. योग्य पर्यायावर क्लिक करा. तुमची चाचणी पूर्ण झाल्यावर ‘Submit Test’ बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल आणि प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण पाहता येईल.


