LBA 7वी समाज विज्ञान नमूना प्रश्नपत्रिका पाठ 7-8

दिनांक: 14.08.2025 रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार –

  1.  पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वीसाठी 20 गुण विचारात घ्यावे.
  2.  भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक पाठ आणि एक कविता विचारात घ्यावी.
  3. इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक पाठ-आधारित मूल्यमापन करावे.
  4. इयत्ता 1 ते 5 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
  5. इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
पाठ आधारित मूल्यमापन 2025-26

पाठ आधारित मूल्यमापन 2025-26

इयत्ता – 7वी विषय – समाज विज्ञान गुण: 20

पाठ 7. म्हैसूरू आणि इतर प्रांत

पाठ 8. भक्ती पंथ आणि सुफी परंपरा

पाठ 7.2. केळदी, चित्रदुर्ग आणि यलहंका येथील नायक

Question Paper Blueprint

Learning ObjectiveMarks (Weightage)Difficulty LevelMarks (Weightage)
Knowledge (ज्ञान)9 (45%)Easy (सोपे)9 (45%)
Comprehension (आकलन)8 (40%)Average (साधारण)8 (40%)
Application/Skill (उपयोजन/कौशल्य)3 (15%)Difficult (कठीण)3 (15%)
Total20Total20

I. बहुपर्यायी प्रश्न (1 × 4 = 4 गुण)

1. म्हैसूरू वडेयर घराण्याची कुलदेवी कोणती?
अ) चामुंडेश्वरी ब) दुर्गा परमेश्वरी क) लक्ष्मी ड) सरस्वती (ज्ञान – सोपे)

2. यलहंका नाडप्रभूचे नाव काय ज्याला ‘प्रजावत्सल’ हा किताब देण्यात आला?
अ) गड्डिपिड्ड नायक ब) शिवाप्पा नायक क) वेंकटप्पा नायक ड) पहिला केंपेगौडा (ज्ञान – सोपे)

3. एक पारंपारिक पंथ जो मोक्ष मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणून भक्तीचा उपदेश करत होता:
अ) मुक्ती पंथ ब) चिस्ती पंथ क) भक्ती पंथ ड) हरे कृष्ण पंथ (ज्ञान – सोपे)

4. कर्नाटकातील असा जिल्हा जिथे कोडव व अरेभाषा बोलल्या जातात.
अ) उडुपी ब) दक्षिण कन्नड क) उत्तर कन्नड ड) कोडगू (ज्ञान – सोपे)


II. एका वाक्यात उत्तरे द्या. (1 × 3 = 3 गुण)

5. ‘नवकोटी नारायण’ ही पदवी कोणाला मिळाली? (ज्ञान – सोपे)

6. शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत? (ज्ञान – सोपे)

7. चित्रदुर्ग किल्ल्याच्या कोणत्या दिशेला वीरांगना ओबव्वा यांचे प्रवेशद्वार आहे? (ज्ञान – सोपे)


III. जोड्या जुळवा. (1 × 3 = 3 गुण)

‘अ’ गट‘ब’ गट
8. नाल्वडी कृष्णराज वडेयरअ) आधुनिक म्हैसूरूचे शिल्पकार
9. सर एम. विश्वेश्वरय्याब) नवकोटी नारायण
10. चिक्क देवराज वडेयरक) राजर्षी (आकलन – साधारण)

IV. थोडक्यात उत्तरे द्या. (2 × 3 = 6 गुण)

11. म्हैसूरू राज्यातील पहिली रेल्वे लाईन कोणती? आणि याचे श्रेय कोणत्या आयुक्ताला जाते? (आकलन – साधारण)

12. कबीरदास यांनी दिलेला संदेश सांगा. (आकलन – साधारण)

13. ज्येष्ठ वेंकटप्पा नायक यांची कार्ये लिहा. (आकलन – साधारण)


V. दीर्घोत्तरी प्रश्न. (1 × 4 = 4 गुण)

14. ‘सर एम. विश्वेश्वरय्या हे आधुनिक म्हैसूरूचे शिल्पकार आहेत’ हे स्पष्ट करा. (उपयोजन – कठीण)

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now