पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 6वी
विषय – मराठी
गुण – 20
3.निसर्गातील चमत्कार वीज
4. पाऊस (कविता)
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
पाठ 3 – निसर्गातील चमत्कार वीज
पाठ 4 – पाऊस (कविता)
प्रश्नपत्रिकेचा आराखडा
ज्ञान पातळी (Cognitive Level) | गुण | काठिण्य पातळी (Difficulty Level) | गुण |
---|---|---|---|
ज्ञान (Knowledge) | 7 (35%) | सोपे (Easy) | 13 (65%) |
आकलन (Understanding) | 9 (45%) | साधारण (Average) | 5 (25%) |
अभिव्यक्ती (Expression) | 4 (20%) | कठीण (Difficult) | 2 (10%) |
एकूण (Total) | 20 | एकूण (Total) | 20 |
I. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
1. ढग यापासून तयार झालेले असतात.
अ) हवा
ब) धूर
क) वाफ
ड) कापूस (सुलभ)
2. विरुद्ध जातीच्या विद्युतभारात …….. होते.
अ) आकर्षण
ब) अपसरण
क) स्फोट
ड) यापैकी नाही (सामान्य)
3. पृथ्वी व ढग या दोन टोकांमधील विद्युतभारामध्ये इतका फरक झाला की वीज चमकते.
अ) एक दशलक्ष
ब) दहा दशलक्ष
क) शंभर दशलक्ष
ड) एक लक्ष (सुलभ)
4. जलधारा अशा पडत आहेत.
अ) झिम झिम
ब) धड धड
क) सळ सळ
ड) खळ खळ (सुलभ)
5. दडून कोण बसले आहे?
अ) कावळा
ब) मोर
क) चिमणी
ड) यापैकी नाही (सुलभ)
II. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. (प्रत्येकी 1 गुण)
6. पावसाळ्यात ढगांच्यावर …….. विद्युतभार निर्माण होतो. (सुलभ)
7. निळ्या रंगाची वीज …….. व …….. मध्ये चमकल्यास दिसते. (सुलभ)
8. गुलाब कलिका …….. यांची राणी आहे. (सुलभ)
9. चिमणाताई येथे …….. दडून बसली आहे. (सामान्य)
10. गवताची तरतरीत पाती, पहा …….. होऊन न्हाती. (कठीण)
III. समानार्थी शब्द लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
11. पृथ्वी – …….. (सुलभ)
12. हवा – …….. (सुलभ)
13. जल – …….. (सुलभ)
14. ढग – …….. (सुलभ)
IV. खालील प्रश्नांची उत्तरे दोन-तीन वाक्यात लिहा. (प्रत्येकी 2 गुण)
15. वीज कशी निर्माण होते? (सुलभ)
16. विजेचे प्रकार किती व कोणते? (सामान्य)
17. ‘हसू खेळू नाचू या रे, भिजू पावसामध्ये सारे | फुलाप्रमाणे झेलून घेऊ, जलबिंदू हाती ||’ या ओळींचा अर्थ स्पष्ट करा. (कठीण)
6वी विज्ञान पाठावरील प्रश्नोत्तरे – येथे पहा.
6वी समाज विज्ञान पाठावरील प्रश्नोत्तरे – येथे पहा