
प्रार्थना अवधी खालील टप्प्याने घ्यावी
- नाडगीत : दिवसाची सुरुवात
- संविधान प्रास्ताविक वाचन
- दैनिक बातम्या: सध्याच्या घटनांची माहिती.
- विशेष उपक्रम: निवडलेल्या थीमवर आधारित क्रियाकलाप.
- राष्ट्रगीत व समारोप
विशेष सुचना : म्हैसूर अनंतस्वामी यांनी गायलेल्या पद्धतीने २ मिनिटे ३० सेकंदात राष्ट्रगीत गायन. (सरकारी आदेश क्रमांक: सी.एस.यू.ई. १६८ रास २०२२ बंगळुरू, दिनांक: २५-०९-२०२२).
५२ सेकंदात राष्ट्रगीत गायन.
जुलै महिन्याचे उपक्रम
इयत्ता – 4थी ते 8वी
थीम : विशेष विषय
मी पाहिलेल्या पक्ष्यांची ओळख :
- दररोज दिसणाऱ्या पक्ष्यांची यादी करणे आणि त्यांची नावे सांगणे.
- विविध पक्ष्यांच्या आवाजांची नक्कल करणे.
- पाठ्यपुस्तकातील पक्ष्यांचे चित्रे गोळा करून कोलाज तयार करणे आणि दाखवणे.
- आवडत्या पक्ष्याविषयी बोलणे.
सोपे गणित :
- गणित माला वापरून मूलभूत गणित क्रिया शिकवणे.
- व्यवहार गणितावर आधारित लघुनाट्य सादर करणे.
- पाठ्यपुस्तकातील सोपे गणिती उदाहरणे सोडवणे.
नवे कन्नड शब्द :
- नवे व सोपे कन्नड शब्द यादी करणे.
- यादीतील शब्द मोठ्याने वाचून त्यांचा अर्थ सांगणे.
नवे इंग्रजी शब्द :
- शिक्षक/मोठ्यांच्या मदतीने इंग्रजी शब्द शिकणे आणि ते स्पष्ट उच्चाराने म्हणणे.
- शब्दांचा अर्थ सांगणे.
- त्या शब्दांचा वापर करून सोपे वाक्य तयार करणे.
थीम – खेळ
स्थानिक खेळ ओळखूया :
- काचा कवड्या,लगोरी,विटी-दांडू यासारख्या स्थानिक खेळांची माहिती देणे.
- नियम, आवश्यक वस्तू आणि साहित्य दाखवणे.
- स्थानिक खेळांमुळे होणारे फायदे समजावून सांगणे.
- एखादा खेळ निवडून प्रार्थना वेळेत सादर करणे.
अंतर्गत व बाह्य खेळ :
- अंतर्गत खेळांची यादी करणे
- दोन खेळांचे नियम, खेळाडूंची संख्या आणि गुणपद्धती सांगणे
- खेळांमुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक फायदे सांगणे
मोजमाप शिकूया :
- कबड्डी / खो-खो मैदानी क्षेत्राचे मोजमाप, आकार व रेषा समजावून सांगणे.
- कबड्डी / खो-खो चे नियम व खेळाडूंची संख्या सांगणे.
राष्ट्रीय खेळ ओळखूया :
- भारताच्या राष्ट्रीय खेळ हॉकीची माहिती देणे.
- विविध देशांचे राष्ट्रीय खेळ यादी करून सांगणे.
जागतिक लोकसंख्या दिन :
या विषयाचे महत्त्व मुलांना सोप्या भाषेत समजावून देणे.
११ जुलै रोजी साजरा होणाऱ्या जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व व उद्देश सांगणे.
लोकसंख्येमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे फायदे व तोटे समजावून सांगणे.
या विषयाचे महत्त्व मुलांना सोप्या भाषेत समजावून देणे.
प्रतिभेचे अनावरण
कथाकथन:
मुले त्यांच्या अनुभवांवर आधारित कथा तयार करून सर्व मुलांना कथा सांगतील.
मोठ्या व्यक्ती किंवा शिक्षकांकडून कथा जाणून घेऊन कथा सांगितल्या जाऊ शकतात.
अभिनय / नक्कल:
विविध प्राणी आणि पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करता येते.
गणित कोडे क्रियाकलाप:
गणिताचे सोपे कोडे गोळा करून त्यांना एकत्र जुळवणे.
पाठ्यपुस्तकातील गणिताची सोपी कोडी मित्रांसोबत प्रार्थनेच्या वेळी सादर केली जाऊ शकतात.
कथेतील संवाद:
पाठ्यपुस्तकातील कोणतीही एक परिस्थिती निवडून त्यावर साधा संवाद करणे.
मोठ्या व्यक्ती/शिक्षकांच्या मदतीने एक कथा तयार करून मित्रांसोबत कथेतील संवाद साधणे.
एकपात्री अभिनय – इंग्रजी:
पाठ्यपुस्तकातील कोणतीही एक परिस्थिती निवडून, विशिष्ट भूमिका आणि संवाद वापरून मुले एकपात्री अभिनय करू शकतात.
कोणत्याही आवडत्या चित्रपटातील पात्राचा संवाद वापरून इंग्रजीमध्ये एकपात्री अभिनय करता येतो.
लोकगीत गायन:
घरातील मोठ्यांच्या मदतीने लोकगीते गोळा करून ती गाणे.
इंटरनेट किंवा सोशल मीडियावर उपलब्ध असलेली लोकगीते गोळा करून मित्रांसोबत सुरात गाणे.
लोक नृत्य:
विविध राज्ये/जिल्हे/प्रादेशिक लोकनृत्य सादर करता येतात.
वेशभूषा आणि संगीत: नृत्याच्या वेळी परिधान केले जाणारे वस्त्र आणि वापरले जाणारे पारंपरिक वाद्य चित्रांद्वारे जाणून घेणे.
गणिताचे कागदी हस्तकला नमुने:
गणिताशी संबंधित मूलभूत आकृत्या आणि कोन तयार करता येतात.
त्रिकोण, चतुर्भुज, घन, घनाकृती, कोन, कागद वापरून गणिताचे हस्तकलेचे नमुने तयार केले जातात.
पाठ्यपुस्तकातील नाटकाचा भाग सादर करणे:
पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका नाटकातून एक प्रसंग निवडून तो सादर करणे आणि त्यातील मूल्यांविषयी माहिती देऊन मुलांना समजावणे.