
प्रार्थना सत्राचे टप्पे
प्रार्थना अवधी खालील टप्प्याने घ्यावी
- नाडगीत : दिवसाची सुरुवात
- संविधान प्रास्ताविक वाचन
- दैनिक बातम्या: सध्याच्या घटनांची माहिती.
- विशेष उपक्रम: निवडलेल्या थीमवर आधारित क्रियाकलाप.
- राष्ट्रगीत व समारोप
विशेष सुचना : म्हैसूर अनंतस्वामी यांनी गायलेल्या पद्धतीने २ मिनिटे ३० सेकंदात राष्ट्रगीत गायन. (सरकारी आदेश क्रमांक: सी.एस.यू.ई. १६८ रास २०२२ बंगळुरू, दिनांक: २५-०९-२०२२).
५२ सेकंदात राष्ट्रगीत गायन.
जुलै महिन्याचे उपक्रम
थीम : विशेष विषय
मी पाहिलेल्या पक्ष्यांची ओळख :
- दररोज दिसणाऱ्या पक्ष्यांची यादी करणे आणि त्यांची नावे सांगणे.
- विविध पक्ष्यांच्या आवाजांची नक्कल करणे.
- पाठ्यपुस्तकातील पक्ष्यांचे चित्रे गोळा करून कोलाज तयार करणे आणि दाखवणे.
- आवडत्या पक्ष्याविषयी बोलणे.
सोपे गणित :
- गणित माला वापरून मूलभूत गणित क्रिया शिकवणे.
- व्यवहार गणितावर आधारित लघुनाट्य सादर करणे.
- पाठ्यपुस्तकातील सोपे गणिती उदाहरणे सोडवणे.
नवे कन्नड शब्द :
- नवे व सोपे कन्नड शब्द यादी करणे.
- यादीतील शब्द मोठ्याने वाचून त्यांचा अर्थ सांगणे.
नवे इंग्रजी शब्द :
- शिक्षक/मोठ्यांच्या मदतीने इंग्रजी शब्द शिकणे आणि ते स्पष्ट उच्चाराने म्हणणे.
- शब्दांचा अर्थ सांगणे.
- त्या शब्दांचा वापर करून सोपे वाक्य तयार करणे.
थीम – खेळ
स्थानिक खेळ ओळखूया :
- काचा कवड्या,लगोरी,विटी-दांडू यासारख्या स्थानिक खेळांची माहिती देणे.
- नियम, आवश्यक वस्तू आणि साहित्य दाखवणे.
- स्थानिक खेळांमुळे होणारे फायदे समजावून सांगणे.
- एखादा खेळ निवडून प्रार्थना वेळेत सादर करणे.
अंतर्गत व बाह्य खेळ :
- अंतर्गत खेळांची यादी करणे
- दोन खेळांचे नियम, खेळाडूंची संख्या आणि गुणपद्धती सांगणे
- खेळांमुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक फायदे सांगणे
मोजमाप शिकूया :
- कबड्डी / खो-खो मैदानी क्षेत्राचे मोजमाप, आकार व रेषा समजावून सांगणे.
- कबड्डी / खो-खो चे नियम व खेळाडूंची संख्या सांगणे.
राष्ट्रीय खेळ ओळखूया :
- भारताच्या राष्ट्रीय खेळ हॉकीची माहिती देणे.
- विविध देशांचे राष्ट्रीय खेळ यादी करून सांगणे.
जागतिक लोकसंख्या दिन :
- ११ जुलै रोजी साजरा होणाऱ्या जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व व उद्देश सांगणे.
- लोकसंख्येमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे फायदे व तोटे समजावून सांगणे.
- या विषयाचे महत्त्व मुलांना सोप्या भाषेत समजावून देणे.
भाषा शिकूया
पावसाळ्याचा एक दिवस :
- पावसाळ्यातले आनंदाचे क्षण शेअर करणे
- पावसाळ्याची सुंदर कल्पना चित्रात दाखवून त्याबद्दल सांगणे
अक्षर ओळख :
फ्लॅश कार्ड वापरून अक्षरे ओळखणे.
चार्ट वापरून अक्षरे शिकवणे.
संख्या गीते :
कन्नड संख्यांसाठी गाणी म्हणणे.
उदा: “ಒಂದು ಎರಡು ಬಾಳೆಲೆ ಹರಡು…”
चित्र संभाषण :
पाठ्यपुस्तकातील एखादा प्रसंग घेऊन सोपी संवाद शैलीने नाटक करणे.
शिक्षकांच्या मदतीने गोष्ट तयार करून मित्रांशी संवाद सादर करणे.
रंग सांगूया :
विविध रंगांची नावे सांगणे.
इंद्रधनुष्यातील रंग सांगणे.
रंगांसाठी वस्तूंची तुलना करणे.
इंग्रजी शिकूया
गाणी म्हणूया :
ओळखलेली किंवा पाठ्यपुस्तकातील इंग्रजी गाणी म्हणणे
शिक्षकांच्या मदतीने नवीन इंग्रजी गाणी शिकणे
भाजीपाल्यांची नावे ओळखूया :
रोजच्या वापरातील भाज्यांची नावे इंग्रजी व कन्नडमध्ये सांगणे
भाजीपाल्यांची चित्रे दाखवून ओळख करणे
फळांची नावे ओळखूया :
रोजच्या वापरातील फळांची नावे इंग्रजी व कन्नडमध्ये सांगणे.
फळांची चित्रे दाखवून त्यांची नावे सांगणे.
आकडे सांगूया :
शिक्षकांच्या मदतीने आकडे इंग्रजी व कन्नडमध्ये सांगणे
रंगांची नावे इंग्रजीत सांगूया :
विविध रंगांची नावे इंग्रजीत सांगणे.
रंगांच्या मिश्रणामुळे होणारे बदल सांगणे.
वस्तूंसह रंगांची तुलना करणे
इंग्रजी अक्षर ओळख :
फ्लॅश कार्ड वापरून इंग्रजी अक्षरे ओळखणे.
सोप्या शब्दांमधील अक्षरे ओळखणे.
नवीन शब्द शिकूया :
नवीन इंग्रजी शब्द सांगून त्याचा अर्थ समजावणे.
दररोज वापरले जाणारे शब्द इंग्रजीत सांगणे.
वस्तूंची ओळख करूया :
वर्गात किंवा घरी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची इंग्रजी नावे सांगणे.
वस्तूंची चित्रे दाखवून इंग्रजी नावे सांगणे.
यमक शब्द सांगूया :
शिक्षकांच्या मदतीने सोपे यमक शब्द म्हणणे.
उपक्रमांचा उद्देश मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.




