CLASS – 6
MEDIUM – MARATHI
SUBJECT – Social Science
SYLLABUS – KARNATAKA STATE
QUESTION BANK OF LESSON BASED ASSESSMENT
प्रकरण 1 – इतिहासाचा परिचय आणि प्राचीन समाज
कर्नाटक राज्यातील सर्व शाळांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून ‘पाठ-आधारित मूल्यमापन परीक्षा’ (Lesson Based Assessment – LBA) प्रणाली अंमलात येणार आहे. हा बदल शिक्षण गुणवत्तेत वाढ करेल का, याबद्दल शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे.
काय आहे नवीन प्रणालीचा उद्देश?
सध्या सरकारी शाळांमध्ये रचनात्मक मूल्यमापन (FA – Formative Assessment) आणि संकलनात्मक मूल्यमापन (SA – Summative Assessment) या पद्धती वापरल्या जातात. नव्या LBA प्रणालीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या आकलनाची आणि त्यांच्या शिकण्याच्या गुणवत्तेची सातत्याने खात्री करणे हा आहे. प्रत्येक पाठ किंवा अध्याय शिकवून झाल्यानंतर लगेचच छोटी चाचणी घेतल्याने विद्यार्थ्यांना विषय किती समजला हे स्पष्ट होईल. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ परीक्षांच्या गुणांसाठी नव्हे, तर खऱ्या अर्थाने ज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. भविष्यात होणाऱ्या बोर्ड परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवण्यासाठी ही सुरुवातीपासूनची मूल्यमापन पद्धत उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने व्यक्त केली आहे.
अंमलबजावणी आणि स्वरूप:
ही घटक चाचणी पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (DSERT) या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका तयार करून शाळांना पुरवेल. शाळांना या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मिळालेले गुण ‘SATS’ पोर्टलवर (Student Achievement Tracking System) अपलोड करावे लागतील, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेणे सोपे होईल.
प्रत्येक चाचणी ३० गुणांची असेल आणि त्यात २५ प्रश्न असतील. प्रश्नपत्रिकेची रचना विशिष्ट प्रमाणात सोपे, सामान्य आणि कठीण प्रश्नांच्या मिश्रणाने केली जाईल:
- ६५% सोपे प्रश्न
- २५% सामान्य प्रश्न
- १०% कठीण प्रश्न
बहुतेक प्रश्न बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे असतील, जेणेकरून विद्यार्थ्यांचे आकलन तपासणे सोपे होईल. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रिकाम्या जागा भरणे, चित्रांना रंग भरणे, जोड्या जुळवा आणि गटात न बसणारा शब्द ओळखणे असे मनोरंजक प्रश्न असतील.
सदर प्रश्नावली DSERT च्या इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर आहे
प्रकरण 1 – इतिहासाचा परिचय आणि प्राचीन समाज
I. रिकाम्या जागा भरा
- इतिहासाचे जनक _________ आहेत. (सोपे)
- जशी मानवाला स्मरणशक्ती असते, तशी जगाची स्मरणशक्ती ________ आहे. (सोपे)
- एक शतक म्हणजे ________ वर्षे. (सोपे)
- ऐतिहासिक कथनातील कालक्रमानुसार मांडणीला _________ म्हणतात. (सोपे)
- लिखित साहित्य रचणाऱ्यांना _________ म्हणतात. (सोपे)
- हडप्पा संस्कृती __________ काळातील आहे. (सोपे)
- उत्क्रांतीच्या मार्गातील सर्वात पहिले विकसित प्राणी ___________ आहेत. (सोपे)
- आधुनिक शारीरिक वैशिष्ट्यांसह मानव सर्वप्रथम __________ येथे दिसले. (सोपे)
- पाषाणयुग ________ काळातील आहेत. (सोपे)
- सामान्य युग (CE) वर्ष _______ पासून सुरू झाले. (सोपे)
II. एका वाक्यात उत्तरे द्या
- 11. इतिहास म्हणजे काय? (सोपे)
- 12. इतिहास कशाबद्दल स्पष्टता प्रदान करतो? (सोपे)
- 13. इतिहास कसा लिहायचा हे सर्वप्रथम कोणी दाखवले? (सोपे)
- 14. साधने (sources) म्हणजे काय? (सोपे)
- 15 लोकगीते, कथा, लावणी आणि दंतकथा कोणत्या साहित्यात समाविष्ट आहेत? (सोपे)
- 16. उत्खनन म्हणजे काय? (सोपे)
- 17. मानवी उत्क्रांती कधी झाली? (सोपे)
- 18. इतिहासाच्या कोणत्या काळात लेखनाचे ज्ञान नव्हते? (सोपे)
- 19. पुरातत्वीय साधने (archaeological sources) म्हणजे काय? (सोपे)
- 20. कोणत्या काळात धातूंचा वापर सुरू झाला? (सोपे)
21. III. योग्य जोड्या जुळवा (मध्यम)
| अ. | ब. |
| 11. पुरातत्वीय साधने | अ. सामान्य युग 2001 ते 2100 |
| 2. 21 वे शतक | ब. शिलालेख |
| 3. कालक्रमिका (Timeline) | क. बल्लारीजवळ संगनकल्लू |
| 4. अग्नीचा शोध | ड. कालक्रमानुसार मांडणी |
| 5. हत्यार उत्पादन केंद्र | इ. जुने पाषाणयुग |
22. IV. कालक्रमानुसार मांडणी करा (मध्यम)
- विद्यार्थ्याने शाळेत प्रवेश घेतला
- विद्यार्थ्याचा जन्म झाला
- विद्यार्थ्याच्या वडिलांचा जन्म झाला
- विद्यार्थ्याच्या आईचा जन्म झाला
- विद्यार्थी 5 वी पास झाला
V. तिसऱ्या शब्दाशी संबंधित चौथा शब्द लिहा (मध्यम)
- 23. मध्य पाषाणयुग: सूक्ष्मपाषाणयुग :: जुने पाषाणयुग: __________
- 24. जुने पाषाणयुग: भटके :: मध्य पाषाणयुग: __________
- 25. कधी?: वेळ :: कुठे?: __________
- 26. लोकगीते: साहित्यिक साधने :: स्मारके: __________
- 27. सर्वात मजबूत धातू: लोह :: मजबूत मिश्रधातू: __________
VI. 2-4 वाक्यात उत्तरे द्या
- 28. तीन प्रमुख कालखंड कोणते आहेत? (मध्यम)
- 29. जुन्या पाषाणयुगातील लोकांनी वापरलेल्या हत्यारांची नावे सांगा. (सोपे)
- 30. इतिहासाची महत्त्वाची साधने कोणती आहेत? (मध्यम)
- 31. नवीन पाषाणयुगात शेतीची सुरुवात होण्यास कोणते घटक कारणीभूत ठरले? (मध्यम)
- 32. लोहाच्या शोधांमुळे कोणते बदल झाले? (मध्यम)
- 33. मुलांनो, आपल्याला इतिहासाची गरज का आहे? (मध्यम)
- 34. प्रागैतिहासिक काळाच्या तीन अवस्था कोणत्या आहेत? (मध्यम)
VII. 6 वाक्यात उत्तरे द्या
- 35. जीवनाच्या उत्क्रांतीबद्दल लिहा. (कठीण)
- 36. मध्य पाषाणयुगातील लोकांच्या जीवनाचे वर्णन करा. (कठीण)
- 37. खाली दिलेल्या भारताच्या नकाशात नवपाषाणयुगीन स्थळे ओळखा. (कठीण)

हे ही पहा – इयत्ता 6वी समाज विज्ञान भाग – 1 प्रश्नोत्तरे
हे ही पहा – इयत्ता 8वी सर्व विषयांची प्रश्नोत्तरे




