प्रकरण 4: संख्यांचे अवयव व पटी
एक गुणांचे प्रश्न
योग्य पर्याय निवडा आणि रिकाम्या जागा भरा.
1. खालीलपैकी ….. 8 च्या पटीत आहे.
- A) 2
- B) 6
- C) 32
- D) 4
2. ……….ही संख्या भाज्य संख्या नाही किंवा अविभाज्य संख्या नाही.
- A) 1
- B) 0
- C) 2
- D) 4
3. 4 च्या पटीत नसलेली संख्या……….
- A) 12
- B) 15
- C) 32
- D) 8
4. 2 ही …….संख्या आहे.
- A) भाज्य
- B) अविभाज्य
- C) अवयव
- D) पटीतील
5. 10 ही …….संख्या आहे.
- A) भाज्य
- B) अविभाज्य
- C) अवयव
- D) पटीतील
6. 15 च्या पटीत नसलेल्या संख्या ……..
- A) 30, 45
- B) 45, 55
- C) 60, 75
- D) 75, 105
7. 6 आणि 15 चे सामान्य अवयव……….
- A) 1, 3
- B) 2, 5
- C) 3, 5
- D) 1, 2
8. 12 चे अवयव………
- A) 4, 3, 6, 5, 8, 9
- B) 1, 2, 3, 4, 5, 6
- C) 1, 2, 3, 4, 6, 12
- D) 2, 4, 6, 8, 10, 12
रिकाम्या जागा भरा.
9. जेव्हा दोन किंवा अधिक संख्यांचा गुणाकार केला की ……… येतो
10. 2 चे अवयव ……..आणि ……..आहेत.
11. गुणलेल्या संख्यांना गुणाकार असलेल्या संख्येचे……….असे म्हणतात
12. जेव्हा दिलेल्या संख्येला दिलेल्या संख्येने निःशेष भाग जातो, तेव्हा ती संख्या दिलेल्या संख्येचा…….असते.
13. ………ही संख्या प्रत्येक संख्येचा अवयव असते.
14. गुणाकार रूपात चित्राद्वारे अवयव दर्शविणाऱ्या आकृतीला…….म्हणतात.
जोड्या जुळवा.
खालील विधाने बरोबर की चूक आहेत ते ओळखा.
21. 8 या संख्येचे चार अवयव आहेत.
22. 7 ही संख्या भाज्य संख्या आहे.
23. 6 या संख्येचे फक्त तीन अवयव आहेत.
24. 24 चे अवयव पाच आहेत.
25. 1 हे भाज्य संख्या आहे.
26. 2 व 12 हे 24 चे अवयव आहेत.
27. सर्व संख्यांचे अवयव म्हणून 1 आणि 2 यांची ओळख आहे.
28. कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा अवयव म्हणजे ती संख्याच असते.
29. 15 चा सर्वात मोठा अवयव 30 आहे.
30. कोणत्याही संख्येचा आणि शून्याचा गुणाकार नेहमीच शून्य असतो.
—(दोन गुणांचे प्रश्न)
खालील समस्या सोडवा.
31. 24 या संख्येचा अवयव वृक्ष पूर्ण करा. (सोपा)
32. 48 या संख्येचा अवयव वृक्ष पूर्ण करा. (सोपा)
33. खाली दिलेल्या संख्यांमधील 7 च्या पटीत असणाऱ्या संख्याभोवती गोल करा. (मध्यम)
7, 8, 14, 16, 20, 21, 35, 28, 42, 49, 56, 62.
34. खालील संख्यांमधील 9 च्या पटीत असणाऱ्या संख्यांना वर्तुळ करा आणि त्यांना हिरव्या रंगाने भरा. (मध्यम)
9, 15, 18, 20, 27, 32, 36, 40, 45, 50, 54, 60, 63, 70, 72.
35. 20 आणि 30 या दोन संख्यांमधील 3 च्या पटीत असणाऱ्या सर्व संख्या लिहा. (मध्यम)
36. 50 व 100 या दोन संख्यांमधील 15 च्या पटीत असणाऱ्या सर्व संख्या लिहा. (मध्यम)
(तीन गुणांचे प्रश्न)
खालील समस्या सोडवा.
37. 8 आणि 15 चे अवयव शोधा आणि सामान्य अवयवांची यादी करा. (मध्यम)
38. 2 आणि 8 चे अवयव शोधा आणि त्यांची यादी करा. (मध्यम)
39. 2 आणि 3 च्या पहिल्या 10 पटीतील संख्यांची यादी करा आणि सामान्य पट शोधा. (मध्यम)
40. 8 आणि 6 च्या पहिल्या 10 पटीतील संख्यांची यादी करा आणि सामान्य पट शोधा. (मध्यम)
(चार गुणांचे प्रश्न)
खालील समस्या सोडवा.
41. 2, 3 आणि 4 चे अवयव शोधा आणि सामान्य अवयवांची यादी करा. (मध्यम)
42. 48, 6 आणि 10 चे अवयव शोधा आणि सामान्य अवयवांची यादी करा. (मध्यम)
43. 45 या संख्येचा अवयव वृक्ष लिहा. (मध्यम)
44. 72 या संख्येचा अवयव वृक्ष लिहा. (मध्यम)
प्रश्न क्रमांक 31,32 संबंधी अवयव वृक्ष
