7वी समाज विज्ञान
24.भारत आणि शेजारील देश
इयत्ता – सातवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2024 सुधारित
विषय – स्वाध्याय
24.भारत आणि शेजारील देश
I. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा :
- कारगिल युद्ध १९९९ साली झाले.
- तिबेटीयन धर्म गुरू दलाई लामा हे होत.
- शेख मुजाबीर रहमान यांच्या नेतृत्वाखाली अवामी लिंग मुक्ती चळवळ सुरू झाली.
- SAARC ची स्थापना १९८५ साली झाली.
- चितगाँव पर्वतमय प्रदेशातून भारतात आलेले स्थलांतरीत म्हणजे चकमा होय.
II. दोन तीन वाक्यात उत्तरे द्या :
- भारताच्या शेजारील देश कोणते?
उत्तर – पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका.
2. भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यातील अडथळ्यांची यादी करा.
उत्तर – काश्मीर प्रश्न, दहशतवाद, सीमेवरील तणाव, ऐतिहासिक वाद.
3. भारत चीन संघर्षांची मुख्य कारणे कोणती ?
उत्तर – सीमावाद, अरुणाचल प्रदेश व लडाखवरील दावा, व्यापार तणाव.
4. बांगला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारताने बजावलेल्या भूमिकेचे विश्लेषण करा.
उत्तर – भारताने पाकिस्तानशी युद्ध केले, बांगलादेशला लष्करी मदत केली आणि निर्वासितांची काळजी घेतली.
5. 1962 च्या चीन भारत युद्धाचे परिणाम कोणते ते लिहा.
उत्तर – भारताला पराभव पत्करावा लागला;
भारत-चीन संबंध ताणले गेले;
भारताने संरक्षणावर भर दिला.
6. सार्क संघटनेच्या स्थापनेचे उद्देश कोणते ?
उत्तर – सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवणे.