STATE SYLLABUS
CLASS – 8
MARATHI MEDIUM
SUBJECT – SCIENCE
PART – 2
विज्ञान
प्रकरण- 6
Reproduction In Animals
प्राण्यांमधील पुनरुत्पादन
अभ्यास
1. सजीवांमधील पुनरुत्पादनाचे महत्व सांगा.
उत्तर – सजीवांमध्ये पुनरुत्पादन घडते.त्यामुळे पुढची पिढी तयार होते. पुनरुत्पादनामध्ये लैंगिक प्रजनन व लैंगिक प्रजनन असे दोन प्रकार आढळतात. प्रजनन क्रियेमुळे माता- पित्यांमधील काहीसे गुणधर्म त्यांच्या संततीमध्ये येतात. सजीवांचे पिढ्यानपिढ्या अस्तित्व टिकून राहते.
2. मानवामधील फलन क्रियेचे वर्णन करा.
उत्तर – शुक्राणू आणि बीजांडाचे मिलन होते.ज्यावेळी अनेक शुक्राणू बीजांडाच्या संपर्कात येतात. तेव्हा त्यांच्यापैकी एका शुक्राणूचे बीजांडाशी मिलन घडते.शुक्राणू आणि बीजांडाच्या मिलनाला ‘फलन’ असे म्हणतात.फलनाच्या वेळी शुक्राणूंच्या केंद्राचा व बीजांडाच्या केंद्राचा संयोग होऊन एकच केंद्र तयार होते. अशाप्रकारे फलन झालेले अंडे किंवा युग्मनजा तयार होते.मानवामध्ये आंतरफलन घडते.
3. योग्य उत्तर निवडा.
(a) आंतर फलन खालील ठिकाणी घडते.
(i) मादीच्या शरीराच्या आतमध्ये
(ii) मादीच्या शरीराच्या बाहेर
(iii) नराच्या शरीरामध्ये
(iv) नराच्या शरीराबाहेर
उत्तर – (i) मादीच्या शरीराच्या आतमध्ये
(b) टँडपोलचा प्रौढ बेडकात खालील क्रियेने विकास
होतो.
(i) फलन
(ii) रुपांतरण
(iii) गर्भाशयात रुतल्यामुळे
(iv) मुकुलायन
उत्तर – (ii) रुपांतरण
(c) युग्मनजामध्ये आढळणारी केंद्राची संख्या
(i) एकही नाही
(ii) एक
(iii) दोन
(iv) चार
उत्तर – (ii) एक
4. खालील विधाने सत्य (स) आहेत की असत्य (अ) ते सांगा.
(a) अंडज प्राणी पिलांना जन्म देतात. (अ)
(b) प्रत्येक शुक्राणु एकाच पेशीने बनलेला असतो. (स)
(c) बेडकामध्ये बाह्य फलन घडते. (स)
(d) युग्मक नावाच्या एका पेशीपासून नवीन मानव तयार होतो. (अ)
(e) फलनानंतर दिलेले अंडे हे एका पेशीने बनलेले असते.(स)
(f) मुकुलायनाने अमिबाचे प्रजनन होते. (अ)
(g) अलैंगिक प्रजननामध्ये सुध्दा फलनाची आवश्यकता असते. (अ)
(h) द्विविभाजन पध्दत ही अलैंगिक प्रजननाचा एक प्रकार आहे. (स)
(i) फलनामुळे युग्मनजाची निर्मिती होते. (स)
(j) एका पेशीपासून पिंडाची निर्मिती होते. (अ)
5. युग्मनजा आणि गर्भ यांच्यामधील दोन फरक सांगा.
उत्तर – युग्मनजा -:
• शुक्राणू चा केंद्र आणि बीजांड याचा केंद्र यांचा संयोग होऊन युग्मनज तयार होते.
• फलन क्रिया झाल्यानंतरच युग्मनज तयार होते.
गर्भ -:
• पिंडा नंतर शरीराचे सर्व भाग स्पष्टपणे ओळखता येतात त्या अवस्थेला गर्भ म्हणतात.
• युग्मनजापासून पिंड आणि पिंड गर्भाशयात रुतून बसतो.त्याची वाढ होते.तेव्हा गर्भ तयार होते.
6. अलैंगिक प्रजननाची व्याख्या सांगा.
उत्तर – ज्या प्रजननामध्ये केवळ एकाच जनक सजिवाचा समावेश असतो. त्याला अलैंगिक प्रजनन असे म्हणतात.
7. मादीच्या कोणत्या पुनरुत्पादक अवयवामध्ये गर्भाची वाढ होते?
उत्तर – मादीच्या गर्भाशयात पुनरुत्पादक अवयवांमध्ये गर्भाची वाढ होते.
8. रुपांतरण (कायापालट) म्हणजे काय ? उदाहरणे सांगा.
उत्तर – अळीमध्ये परिणामकारक बदल होऊन त्याचे प्रौढ प्राण्यात रूपांतर होते.त्या क्रियेला रूपांतरण किंवा कायापालट असे म्हणतात.
उदा. फुलपाखरू, बेडूक मधमाशी,रेशीम किडा.
9. आंतर फलन आणि बाह्य फलन यांच्यामधील फरक सांगा.
उत्तर –
आंतर फलन | बाह्य फलन |
जेव्हा मादीच्या शरीराच्या आत मध्ये फलन होते.तेव्हा त्याला अंतर फलन असे म्हणतात. उदा.गाय,कोंबडी,कुत्रा. | जे फलन मादीच्या शरीराच्या बाहेर घडते.त्याला बाह्य फलन असे म्हणतात. उदा. बेडूक,मासा,तारामासा |
10. खालील विधानांची उत्तरे कोडयात आडवी, उभी व
तिरकस इत्यादी स्करुपात व लपलेली आहेत,ती शोधून त्यांच्याभोवती लंब गोलाकार खुणा करा.
1. गॅमेटस् एकत्रित येण्याची क्रिया – फलन
2. कोंबडी मधील प्रजननाचा प्रकार – आंतर फलन
3. हैड्राच्या बाह्यांगावर मुकूल येणाची क्रिया – मुकुलायन
4. अंडी येथे तयार होतात – अंडाशय
5. नराच्या या इंद्रियात शुक्राणू तयार होतात वृषण
6. शरीराबाहेर घडणारे प्रजनन – बाह्य
फलन
7. अंडी देणारे प्राणी – अंडज
8. अमिबामधील विभाजनाचा प्रकार- द्विविभाजन.
