7th SS Textbook Solution 2.Medieval Europe 7वी समाज विज्ञान 2.मध्ययुगीन युरोप

इयत्ता – सातवी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – 2022 सुधारित 

विषय – स्वाध्याय 

अभ्यास

1. पुनरुज्जीवनाची सुरूवात इटली येथे झाली.

2. पुनरुज्जीवन काळातील चित्रकार लिओनार्दो-द-विंचीमायकेलेंजोलो.

3. कोलंबसने अमेरिकेतील रहिवाशांना इंडियन असे नांव दिले

4. पृथ्वी प्रदक्षिणा घालणारे पहिले जहाज व्हिक्टोरिया

5. जर्मनीत धर्मिक सुधारणा मार्टिन ल्यूथर यानी सुरु केली.

1. पुनरुज्जीवनाची दोन वैशिष्ट्ये कोणती ? 

उत्तर – मानवतावाद आणि वैचारिकता ही पुनरुज्जीवनाची दोन वैशिष्ट्ये होती.

2. छपाई यंत्राने पुनरुज्जीवनाला कशी प्रेरणा दिली ?

उत्तर – छपाई यंत्राने पुस्तके आणि हस्तलिखित सहजरीत्या उपलब्ध झाली.त्यामुळे ज्ञानाच्या प्रसारक्षेत्रात क्रांती आणि बदल झाले व पुनरुज्जीवनाला प्रेरणा मिळाली.

3. पुनरुज्जीवन काळातील तीन प्रसिद्ध साहित्यिक कोण ?

उत्तर – विल्यम शेक्सपियर,दांटे,पेट्रार्क हे पुनरुज्जीवन काळातील प्रसिद्ध साहित्यिक होते.

4. विल्यम शेक्सपियर कोण होते ?

उत्तर – विल्यम शेक्सपियर हे सुप्रसिद्ध इंग्रजी नाटककार होते.

5. पुनरुज्जीवन काळातील दोन प्रसिद्ध शास्त्रज्ञ कोणते ?

उत्तर – कोपर्निकस,केपलर,गॅलिलिओ हे पुनरुज्जीवन काळातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते.

6.प्रतिसुधारणा म्हणजे काय?

उत्तर – कॅथोलिक चर्चच्या अंतर्गत सुधारणांसाठी केलेल्या प्रयत्नांना प्रतिसुधारणा असे म्हणतात.

7. मार्कोपोलो कोण होता?

उत्तर – मार्कोपोलो हा आशियाई देशांना भेट दिलेला प्रवासी होता.

8.कोपर्निकसच्या सिद्धांताविषयी लिहा.

उत्तर – पृथ्वी हा सूर्याभोवती फिरणाऱ्या अनेक ग्रहांपैकी एक आहे असा कोपर्निकसने सिद्धांत मांडला.

Share with your best friend :)