कर्नाटक राज्य अभ्यासक्रम
माध्यम – मराठी
विषय – परिसर अध्ययन
इयत्ता – पाचवी
पाठावरील स्वाध्याय नमुना उत्तरे
प्रकरण -2. कुटुंब
वंशवृक्ष म्हणजे काय?
उत्तर – आई-वडील,आजी-आजोबा, नात- नातू यांची नावे जाणून घेऊन त्यांची झाडाच्या फांद्यांच्या स्वरूपात नोंद करणे याला वंशवृक्ष म्हणतात.


उत्तर –



उत्तर –


मित्राचे कुटुंब पाहिलास, त्याच्या कुटुंबाबद्दल तुझे मत लिही.
उत्तर – मित्राचे कुटूंब मोठे आहे,एकत्रित कुटुंब आहे आणि एक सुंदर कुटुंब आहे.
माझ्या मित्राचे कुटुब हे एकत्रित कुटुंब आहे. तुझ्या मित्रांसोबत चर्चा कर व या कुटुंबाचे फायदे आणि तोटे लिही.
फायदे | तोटे |
अनेक पिढ्या एकत्र राहतात. | सर्वांची मते वेगळी असू शकतात. |
सर्व निर्णय घरातील वडीलधारी मंडळी घेतात. | चुकीचे निर्णय असले तरी मान्य करावे लागतात, |
सर्व सण समारंभ एकत्र साजरे करतात. | सर्वजण सण एकत्र साजरे केल्याने कामे जास्त लागू शकतात. |
मी तुला वेगवेगळ्या कुटुंबांचा परिचय करून दिला आहे. खालील विधाने वाच आणि माझे कुटुंब आणि इतरांचे कुटुंब असे फरक कर. ते दिलेल्या चौकोनात लिही.
▶ पालन आणि रक्षण करणे.
▶ योग्य शिक्षण देणे.
▶ अन्नपुरवठा करणे.
▶ पाठ शिकविणे.
▶ खेळामध्ये हारल्यास समाधान करणे,
▶ आजारी असताना मदत करणे.
▶ प्रेम आणि आपुलकी दाखविणे.
▶ गरजा पूर्ण करणे.
▶ आई नसताना आधार देणे,
▶ जास्तीचा वेळ देणे.
माझे कुटुंब | इतरांचे कुटुंब |
पालन आणि रक्षण करणे. | अन्नपुरवठा करणे. |
योग्य शिक्षण देणे. | पाठ शिकविणे. |
प्रेम आणि आपुलकी दाखविणे. | खेळामध्ये हारल्यास समाधान करणे. |
गरजा पूर्ण करणे. | आजारी असताना मदत करणे. |
जास्तीचा वेळ देणे. | आई नसताना आधार देणे, |

चित्राच्या सहाय्याने खालील प्रश्नांची उत्तरे दे.
1. कुटुंबातून मी शिकावयाचे चांगले गुण कोणते?
मोठ्यांचा आशीर्वाद,एकत्र जगणे,मोठ्यांचा आदर,नातेसंबंध सुधारणे, प्रेम, पालनपोषण, आरोग्य, गरजांची पूर्तता, संरक्षण, सहकार्य इत्यादी चांगले गुण कुटुंबातून शिकायला मिळतात.
2. मला कुटुंब कशासाठी पाहिजे?
कौटुंबिक जीवन आपल्याला अर्थपूर्ण आणि यशस्वी जीवन जगण्यास मदत करते म्हणूनच मला कुटुंबाची गरज आहे.
सरावासाठी अधिक प्रश्न –
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) कुटुंब म्हणजे काय
उत्तर__ घरामधील एकत्र राहणाऱ्या सदस्य समूहाला कुटुंब असे म्हणतात.
2) कुटुंबाचे दोन प्रकार कोणते
उत्तर__ 1) एकत्र कुटुंब 2) विभक्त कुटुंब हे दोन प्रकार होत.
3) विभक्त कुटुंब कशाला म्हणतात?
उत्तर _ ज्या कुटुंबात दोन पिढ्यांचे सदस्य राहतात त्यांना विभक्त कुटुंब म्हणतात.
4) एकत्र कुटुंब कशाला म्हणतात?
उत्तर__ अनेक पिढ्या पासून घरामध्ये राहणाऱ्या कुटुंबास एकत्र कुटुंब म्हणतात.
5) माझ्या घरात एकूण पिढ्या किती आहेत?
याचे उत्तर तुम्ही लिहा