इयत्ता-5वी विषय – परिसर अध्ययन (EVS)
द्वितीय संकलित मूल्यमापन (SA-2) – नमूना प्रश्नपत्रिका – 3
इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी परिसर अध्ययन विषयाची द्वितीय संकलित मूल्यमापन (SA-2) नमूना प्रश्नपत्रिका – 3 येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही प्रश्नपत्रिका शैक्षणिक वर्षातील द्वितीय सत्राच्या शेवटच्या मूल्यमापनासाठी मार्गदर्शक ठरेल.
या प्रश्नपत्रिकेची रचना अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) लक्षात घेऊन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभरात आत्मसात केलेल्या संकल्पना, पर्यावरणाविषयीची जाणीव, सामाजिक व भौगोलिक समज, तसेच दैनंदिन जीवनातील ज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता यांचे मूल्यमापन करण्यासाठी ही प्रश्नपत्रिका उपयुक्त आहे.
वर्ग: 5वी
विषय: परिसर अध्ययन
एकूण गुण: 40
वेळ: 90 मिनिटे
या नमुना प्रश्नपत्रिकेमध्ये पुढील प्रकारचे प्रश्न समाविष्ट आहेत:
- • वस्तुनिष्ठ प्रश्न (MCQ)
- • रिकाम्या जागा भरा
- • जुळवा
- • लघुउत्तरी प्रश्न
- • स्पष्टीकरणात्मक प्रश्न
- • कारणे लिहा / फरक स्पष्ट करा
ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी सराव करण्यासाठी तसेच शिक्षकांना प्रश्नरचना व मूल्यमापन नियोजनासाठी मार्गदर्शक म्हणून उपयोगी ठरेल.
सर्व प्रश्नपत्रिका Printable PDF Format मध्ये उपलब्ध आहेत. शिक्षक व विद्यार्थी सोयीस्करपणे डाउनलोड करून प्रिंट काढू शकतात.
ही प्रश्नपत्रिका केवळ नमुना (Model) स्वरूपाची आहे. शिक्षकांनी आपल्या शाळेच्या गरजेनुसार, विद्यार्थ्यांच्या पातळीप्रमाणे किंवा अभ्यासक्रमातील बदलांनुसार कोणताही प्रश्न किंवा मजकूर आवश्यकतेनुसार बदलू शकतात.
- (अ) दुष्काळ
- (ब) पूर
- (क) भूकंप
- (ड) वादळ
- (अ) मुंबई
- (ब) नवी दिल्ली
- (क) बंगळूर
- (ड) चेन्नई
- (अ) पी. टी. उषा
- (ब) इंदिरा गांधी
- (क) कल्पना चावला
- (ड) मदर तेरेसा
- (अ) स्वतःचे घर
- (ब) स्वतःची कार
- (क) सरकारी शाळा
- (ड) स्वतःची सायकल
- नकाशात उत्तर दिशा दाखवण्यासाठी ______ हे इंग्रजी अक्षर वापरतात.
- दूषित पाणी प्यायल्यामुळे कॉलरा आणि ______ सारखे आजार होतात.
- भारताला 15 ऑगस्ट ______ रोजी स्वातंत्र्य मिळाले.
- कर्नाटकातील शरावती नदीवर असलेला सर्वात उंच धबधबा ______ हा आहे.
- खूप दिवस पाऊस न पडल्यास कोणती नैसर्गिक आपत्ती येते?
- भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे?
- सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
- हवेत वाहनांचा काळा धूर मिसळल्याने कोणते प्रदूषण होते?
- पूर आल्यावर तुम्ही कोणती दोन काळजी घ्याल?
- भारताच्या नैसर्गिक रचनेचे कोणतेही दोन भाग सांगा.
- कर्नाटकात वाहणाऱ्या कोणत्याही दोन नद्यांची नावे लिहा.
- सार्वजनिक मालमत्तेचे (उदा. बस स्थानक) रक्षण करणे का गरजेचे आहे?
- नकाशाचे कोणतेही दोन मुख्य घटक लिहा.
- जलप्रदूषण थांबवण्यासाठी तुम्ही कोणते दोन उपाय कराल?
- कृत्रिम उपग्रहांचे कोणतेही दोन उपयोग लिहा.
- महात्मा गांधीजींनी कोणत्या मार्गाने भारताचा स्वातंत्र्यलढा दिला?
- भूकंप आल्यावर तुम्ही स्वतःचे रक्षण कसे कराल? (कोणतेही दोन उपाय)
- तुमच्या गावातील कोणत्याही दोन ‘सार्वजनिक मालमत्तांची’ नावे लिहा.
अ) हे चित्र कशाचे आहे?
ब) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे?
क) आपण ज्या ग्रहावर राहतो (सजीवसृष्टी असलेला), त्या ग्रहाचे नाव काय?
ड) कडी (Ring) असलेला ग्रह कोणता आहे?
तुमच्या शाळेच्या आणि घराच्या परिसरात पर्यावरण स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी तुम्ही कोणते 4 सोपे उपाय कराल ते लिहा.
Q.1: A) योग्य पर्याय:
1. (ब) पूर
2. (ब) नवी दिल्ली
3. (क) कल्पना चावला
4. (क) सरकारी शाळा
B) रिकाम्या जागा भरा:
5. ‘N’ (किंवा N)
6. टायफॉइड (किंवा जुलाब)
7. 1947
8. जोग
C) एका शब्दात उत्तरे:
9. दुष्काळ
10. हिंदी महासागर
11. गुरू
12. हवेचे प्रदूषण
Q.2: 2-3 वाक्यात उत्तरे
13. १) पुराचे दूषित पाणी पिणार नाही. २) सुरक्षित आणि उंचावरील ठिकाणी जाऊन थांबू.
14. १) उत्तरेकडील हिमालय पर्वत. २) उत्तरेकडील सुपीक मैदान. (किंवा द्वीपकल्पीय पठार, किनारपट्टीचे प्रदेश).
15. 1) कृष्णा 2) कावेरी (किंवा तुंगभद्रा).
16. सार्वजनिक मालमत्ता सर्वांच्या उपयोगासाठी असते आणि ती आपल्या कराच्या पैशातून बनलेली असते, त्यामुळे तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे.
17. 1) शीर्षक 2) दिशा (किंवा प्रमाण/चिन्हे).
18. 1) नदीत किंवा तलावात कचरा व प्लास्टिक टाकणार नाही. 2) कारखान्यांचे सांडपाणी थेट नदीत सोडू देणार नाही.
19. 1) हवामानाचा अंदाज मिळवण्यासाठी. 2) टीव्ही पाहण्यासाठी आणि मोबाईल संवादासाठी.
20. महात्मा गांधीजींनी ‘अहिंसा’ आणि ‘सत्याग्रह’ या शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढा दिला.
21. 1) तत्काळ घराबाहेर पडून मोकळ्या मैदानात जाऊ. 2) जर घरात अडकलो तर मजबूत टेबलाखाली लपून बसू.
22. 1) सरकारी शाळा 2) सरकारी दवाखाना (किंवा बस स्टँड, सार्वजनिक बाग).
Q.3: सविस्तर उत्तरे (4 गुण प्रत्येकी)
23. चित्र आधारित प्रश्न:
अ) हे चित्र ‘सूर्यमालेचे’ आहे.
ब) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह ‘बुध’ आहे.
क) सजीवसृष्टी असलेला ग्रह ‘पृथ्वी’ आहे.
ड) कडी असलेला ग्रह ‘शनी’ आहे.
24. पर्यावरण रक्षण (कोणतेही 4 उपाय – प्रत्येकी 1 गुण):
1. मी कचरा नेहमी कचराकुंडीतच (Dustbin) टाकेन.
2. मी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करणार नाही.
3. मी शाळेत आणि घराच्या परिसरात नवीन झाडे लावेन आणि त्यांना पाणी घालेन.
4. मी पाण्याचा योग्य वापर करेन आणि पाणी वाया घालवणार नाही.



