इयत्ता – नववी
विषय – समाज विज्ञान
विभाग – राज्यशास्त्र
सुधारित २०२२ पाठ्यपुस्तकानुसार
22. देशाची संरक्षण व्यवस्था
22.DEFENCE OF THE NATION
1. रिकाम्या जागी योग्य शब्दांनी भरा.
2. आपल्या
सुरक्षाव्यवस्थेचा मुख्य उद्देश राष्ट्राचे सार्वभौमत्व कायम अबाधित राखणे हा
आहे.
3. आपल्या तिन्ही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती
हे असतात.
4. भूसेनेच्या प्रमुखाला जनरल
म्हणतात.
5. संरक्षण मंत्रीमंडळाचे मुख्यालय नवी
दिल्ली येथे आहे.
6. हिंदुस्थान जहाज बांधणी कारखाना विशाखापट्टण
येथे आहे.
7. सीमासुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र बेंगळूर
येथील येलहंका येथे थाहे.
8. भारतीय रेडक्रॉस संघटनेची स्थापना 1920
मध्ये झाली.
2. समूहात चर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. कारवार जवळील नाविक
तळाला काय म्हटले जाते?
उत्तर – कारवार जवळील
नाविक तळाला सीबर्ड नाविक तळ म्हटले जाते.
2. संरक्षण मंत्रालयातील चार विभाग कोणते ?
उत्तर – संरक्षण
मंत्रालयाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.यांचे चार विभाग आहेत.
1. संरक्षण विभाग
2. संरक्षण उत्पादन विभाग
3. संरक्षण संशोधन आणि अभिवृध्दी विभाग
4. निवृत्त सेना कल्याण विभाग
3. भारतीय वायुसेनेच्या रचनेचे वर्णन करा.
उत्तर – भारतीय वायुसेना
हे अत्याधुनीक, सुसज्ज,
तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि विमानवाहू जहाजांनी युक्त असे
दल आहे.
मुख्यालय – दिल्ली
प्रमुख – एअर चीफ मार्शल
प्रशिक्षण केंद्रे – बंगळुर व हैद्राबाद
ऑपरेशनल कमांड (Operational
Commands):
1. पश्चिम कमांड – नवी
दिल्ली
2. पूर्व कमांड – शिलांग (मेघालय)
3. केंद्र कमांड ‘अलाहाबाद, (उत्तर प्रदेश)
4. उत्तर पश्चिम (वायव्य) कमांड – गांधी
गांधीनगर, (गुजरात)
5. दक्षिण कमांड – तिरुअनंतपुरम (केरळ)
फंक्शनल कमांड (Functional
commands):
1. ट्रेनिंग कमांड –
बेंगळुरु (कर्नाटक)
2. मेंटेनन्स कमांड नागपूर (महाराष्ट्र)
भारतीय वायुसेना युध्दकाळात तसेच शांततेच्या काळात अत्यंत
परिणामकारक आणि शौर्याने कार्य करते. देशातंगर्त सुरक्षितता, स्थैर्य, शातंता राखण्यात यशस्वी झाली आहे.
4. भूसेनाच्या कमांडर्स कोणकोणत्या आहेत ?
उत्तर – 1. पश्चिम
कमांड चांदी मंदीर, (हरियाणा)
2. पूर्व कमांड – कोलकत्ता (प. बंगाल)
3. उत्तर कमांड – उधमपूर (काश्मीर)
4. दक्षिण कमांड पुणे (महाराष्ट्र)
5. केंद्र कमांड – लखनौ (उत्तरप्रदेश)
6. प्रशिक्षण कमांड – महू (मध्यप्रदेश)
7. वायव्य कमांड – जयपूर (राजस्थान)
5. भारतीय वायुदलाच्या कार्याचे वर्णन करा.
उत्तर – भारतीय वायू
दलाचे कार्य पाच ऑपरेशनल कमांड,दोन फंक्शनल कमांड मार्फत पाहिले जाते. ते पुढील प्रमाणे
आहेत.
ऑपरेशनल कमांड (Operational
Commands):
1. पश्चिम कमांड – नवी
दिल्ली
2. पूर्व कमांड – शिलांग (मेघालय)
3. केंद्र कमांड ‘अलाहाबाद, (उत्तर प्रदेश)
4. उत्तर पश्चिम (वायव्य) कमांड – गांधी
गांधीनगर, (गुजरात)
5. दक्षिण कमांड – तिरुअनंतपुरम (केरळ)
फंक्शनल कमांड (Functional
commands):
1. ट्रेनिंग कमांड –
बेंगळुरु (कर्नाटक)
2. मेंटेनन्स कमांड नागपूर (महाराष्ट्र)
6. भूसेनेत भरती होण्यासाठी कोणत्या गुणवत्तेची
आवश्यकता आहे?
भूसेनेत भरती होण्यासाठी सेवाभाव,
देशप्रेम, आत्मबलिदानाची तयारी, तसेच देशातील विविध संस्कृतीची समजून घेण्याची वृत्ती
इत्यादी गुण असावे लागतात व शारीरिक क्षमता, मानसिक आरोग्य, शिक्षण आणि तंत्रज्ञान इत्यादी बाबतीत कांही अटींची पूर्तता
करावी लागते.
7. NCC चे उद्देश कोणते? त्याचे फायदे
कोणते ते लिहा.
उत्तर – विद्यार्थ्यांमध्ये
शिस्त, नेतृत्व,
मैत्री, सेवाभाव यासारखे गुण विकसित करणे आणि सैन्य दलात सामील
होण्यास मदत करणारे प्रशिक्षण देणे हे NCC चे मुख्य उद्देश आहेत.
NCC प्रशिक्षण घेतल्याने खालील फायदे होतात..
a) सेनादलात सहजपणे प्रवेश मिळतो.
b) ज्या छात्रांना प्रशिक्षणात उच्च श्रेणी
प्राप्त होते. त्यांच्यासाठी व्यावसायीक महाविद्यालयात कांही जागा राखीव ठेवल्या
जातात.
8. भारतीय रेड क्रॉस सोसायटी बद्दल माहिती लिहा.
उत्तर – भारतीय रेड क्रॉस
सोसायटी ही एक मानवतावादी स्वयंसेवी संस्था आहे.ज्याची स्थापना आणीबाणीच्या वेळी
मदत करण्यासाठी,भेदभाव न
करता मदत पुरवण्यासाठी आणि सात मूलभूत तत्त्वांवर आधारित कार्य करते आहे.