7th SS 12. NORTH AMERICA सहावी समाज विज्ञान उत्तर अमेरिका
 

 इयत्ता – सातवी

विषय – समाज विज्ञान माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – 2023 सुधारित 

विषय – स्वाध्याय 

प्रकरण 12 – उत्तर अमेरिका  

अभ्यास

 I. दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.

1) उत्तर अमेरिका खंडाला ‘प्रेअरीचा प्रदेश’ असे का म्हणतात ?

उत्तर –  कारण उत्तर अमेरिकेच्या मध्यभागी असलेल्या सखल मैदानी प्रदेशात सपाट व लुसलुशीत हिरव्यागार गवताची कुरणे तयार झाली आहेत.म्हणून उत्तर अमेरिका खंडाला ‘प्रेअरीचा प्रदेश’ असे म्हणतात.

2) उत्तर अमेरिका खंडाचे स्थान आणि विस्तार गा.

उत्तर –  उत्तर अमेरिका हा खंड पूर्णपणे विषुववृत्ताच्या उत्तरेस,अंदाजे 7° N ते 84° N अक्षांश पर्यंत पसरलेला आहे.याच्या पूर्वेस अटलांटिक महासागर, पश्चिमेस प्रशांत महासागर आणि उत्तरेस आर्क्टिक महासागर आहे.पनामा कालव्यामुळे उत्तर अमेरिका खंडाचा दक्षिण अमेरिका खंडाशी संपर्क साधला आहे.तर बेरिंग सामुद्रधुनीमुळे हा खंड आशिया खंडापासून वेगळा झाला आहे.

3) उत्तर अमेरिका खंडातील प्रमुख देशांची यादी करा.

उत्तर –  उत्तर अमेरिकेतील काही महत्त्वाचे देश खालीलप्रमाणे –

– कॅनडा

– युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

– मेक्सिको

– क्युबा

– हैती

– जमैका

– ग्रीनलँड (डेन्मार्कचा भाग)

– बहामास

– बेलीज


4) उत्तर अमेरिकेच्या ग्रँड कॅननची निर्मिती कशी झाली आहे ?

उत्तर – कोलाराडो नदी कोलाराडो पठारातून अत्यंत वेगाने वाहत असते त्यामुळे उत्तर अमेरिकेत ग्रँड कॅननची निर्मिती झाली आहे.ग्रँड कॅनन जगातील नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.


5) उत्तर अमेरिकेतील प्रमुख वनस्पती आणि प्राणी कोणते ?

उत्तर – उत्तर अमेरिकेतील महत्वाच्या वनस्पती आणि प्राणी खालीप्रमाणे:

वनस्पती: ओक, मॅपल, बर्च,सैप्रस,ओक,ॲश, प्रेअरी वर विविध गवत इत्यादी प्रमुख वनस्पती आढळतात.

प्राणी: बिवर,हिम अस्वल,हिम उंदीर,लांडगे,मगर,

6) उत्तर अमेरिकेतील प्रमुख नद्यांची यादी करा.

उत्तर –  उत्तर अमेरिकेतील महत्त्वाच्या नद्यांमध्ये हे समाविष्ट आहे.

– मिसिसिपी नदी

– मिसोरी नदी

– कोलाराडो नदी

– रिओ ग्रँड

– युकोन नदी

– सेंट लॉरेन्स नदी

– कोलंबिया नदी

– कॅनेडियन नदी

– लाल नदी

7) उत्तर अमेरिकेत ‘लंबर जाक्स’ असे कोणाला म्हणतात ?

उत्तर –   ‘लंबर जाक्स’  म्हणजे लाकूड उद्योगात गुंतलेल्या व्यक्ती.उत्तर अमेरिकेत कॅनडामधील वृक्षतोड व्यवसायावर असणाऱ्या लोकाना ‘लंबर जाक्स’ असे म्हणतात.

8) उत्तर अमेरिकेत आढळणारे प्रमुख लोक व त्यांची भाषा कोणती? ते सांगा.

उत्तर –  उत्तर अमेरिकेतील बहुतेक लोक हे युरोपियन, अमेरिकन इंडियन्स् आणि आफ्रिकन वंशाचे आहेत. परंतु तेथे काही स्थानिक अथवा एका गटाचे लोक असून त्यातील बहुतेक लोक स्पॅनिश, इंग्लिश, फ्रेंच अथवा अमेरिकन इंडियन्न भाषा बोलतात.

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.