सेतुबंध पूर्व परीक्षा
नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – सातवी
विषय – मराठी
1. खालीलपैकी एक विषय निवडून त्याबद्दल बोलण्यास सांगणे.
1. शाळा 2. राष्ट्रीय सण 3. जत्रा
2. दिलेला उतारा स्पष्टपणे वाचा.
दुसरे दिवशी चोराला दरबारात हजर करण्यात आले. राजाने तेनालीरामला विचारले, “तू काय युक्ती केलीस बरे!” तेनालीरामने राजाला सांगितले की, “मी प्रदर्शनानंतर तिजोरीमध्ये भरपूर रंग शिंपडून ठेवला होता. त्यामुळे चोराचे हात लाल रंगाने रंगले व तो सापडला. – याच घटनेनंतर ‘रंगेहात पकडले जाणे‘ हा वाक्प्रचार प्रचलित झाला.
प्रश्नांची प्रात्यक्षिक उत्तरे द्या.
3. योग्य विरामचिन्हांचा वापर करून श्रुतलेखन करा. (शिक्षकांनी लिहिण्यास उतारा सांगणे.)
लेखी प्रश्नपत्रिका
4. महोत्सव – या शब्दाचे स्वर व्यंजन विग्रह करून लिहा.
5. आमच्या शाळेने पहिले बक्षीस जिंकले. (या वाक्याचा काळ ओळखा.)
6. धूम ठोकणे (या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.)
7. काटछाट – या शब्दाचा वाक्यात उपयोग करून वाक्य लिहा.
8. बिरबल हा अकबराचा प्रामाणिक सेवक होता. ( या वाक्यातील गुणविशेषण ओळखा.)
9. दिलेली अक्षरे क्रमाने लिहून अर्थपूर्ण शब्द तयार करा. – र्वा, शी , आ , द
10. वाडा – या नामाचे लिंग ओळखा.
11. खालील वाक्यात योग्य विराम चिन्हे वापरून वाक्य लिहा.
सुशांत मराठी इंग्रजी लेखन सुंदर करतो
12. सैन्य / राणीचे / निकराने / मोठ्या / लढले. (हे शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.)
13. राजाने शिक्षा सुनावली. (या वाक्यातील कर्म ओळखा.)
14. रवि, मित्र ,चंद्र , सूर्य ( गटात न बसणारा शब्द लिहा.)
15. बाळ दुडूदुडू पळत जात होते. (वाक्यातील लयबद्ध शब्द ओळखा.)
16. काखेत कळसा, …….. वळसा (म्हण पूर्ण करा.)
17. देवालय (संधी विग्रह लिहा.)
18. सवाल ( या शब्दाचा अर्थ लिहा.)
19. “आये, माझा बाबा कुठ गेला गं.” (हे वाक्य प्रमाण मराठीत लिहा.)
20. जात कोणती पुसू नका या कवितेचे कवी कोण आहेत?