KALIKA HABBA 2022-23 (कलिका हब्ब 2022-23) A NEW INNOVATIVE PROGRAMME

Table of Contents

KALIKA HABBA A NEW INNOVATIVE PROGRAMME
कलिका हब्ब एक नाविन्यपूर्ण उपक्रम 



 


 




विषय:कलिका हब्ब (लर्निंग फेस्टिव्हल) 2022-23 प्रभावीपणे साजरा करण्याबाबत.

        कोविड-19 महामारीच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांमधील अध्ययन कमतरता भरून काढण्यासाठी लर्निंग रिकव्हरी प्रोग्राम (अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रम) तयार करण्यात आला आहे आणि शैक्षणिक वर्ष 2022-23 हे शिक्षण पुनर्प्राप्ती वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.या कार्यक्रमात, क्रियाकलापांची रचना केली गेली आहे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला मागील दोन वर्षांचे महत्त्वपूर्ण अध्ययन निष्पत्ती आणि चालू वर्षातील महत्त्वपूर्ण अध्ययन निष्पत्ती शिकता येतील.शिकणे आनंददायक होण्यासाठी अध्ययन निष्पत्तींवर आधारित क्रियाकलापांद्वारे शिकविले जाते.
        अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने 2022-23 या वर्षात राज्यात विविध स्तरांवर अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमास पूरक ‘कलिका हब्ब'(अध्ययन उत्सव) आयोजित करण्याचा मानस आहे. तोंडपाठ करण्याचे शिक्षण आपण सोडून दिले पाहिजे आणि उपयोजनात्मक वैज्ञानिक विमर्शनात्मक शिक्षण दिले पाहिजे.हे सर्व अंश ‘कलिका हब्ब'(अध्ययन महोत्सव) मध्ये आहेत.शिकणे आनंदी असले पाहिजे तसेच जीवन कौशल्ये वापरणे ही ‘कलिका हब्ब'(अध्ययन महोत्सव)ची संकल्पना आहे.हे N.E.P च्या मुख्य अशांपैकी एक आहे.




I. ‘कलिका हब्ब'(अध्ययन महोत्सव)ची उद्दिष्टे :-


1) अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रम आणि कृती आधारित शिक्षणाबद्दल पालक आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे.

2) नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक अध्यापनाला प्रोत्साहन देणे.

3) विद्यार्थ्यांना शिकण्याची आवड निर्माण करून त्यांना का? कसे? असे प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करणे.

4) शिकण्याची प्रक्रिया आनंददायी बनवणे.

5) विद्यार्थ्यांमधील संकोच दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे.
6)विद्यार्थ्यांना गटांमध्ये आणि वेगवेगळ्या वातावरणात काम करण्यास प्रवृत्त करणे,विविध परंपरांचा आदर करण्यास प्रोत्साहित करणे.




 

II. ‘कलिका हब्ब'(अध्ययन महोत्सव)ची व्याप्ती:

1) राज्यातील 35 शैक्षणिक जिल्हे आणि 4103 तालुक्यामध्ये कलिका हब्ब होणार आहे.
2) प्रत्येक क्लस्टरमधील विविध शाळांमधील एकूण 120 विद्यार्थी म्हणजे 4,92,360 विद्यार्थी क्लस्टर कलिका हब्ब मध्ये सहभागी होतील.



3) प्रत्येक जिल्ह्यांतील विविध तालुक्यांतून एकूण 300 विद्यार्थी म्हणजे 10,500 विद्यार्थी जिल्हा कलिका हब्बमध्ये सहभागी होतील.

4) कलिका हब्बमध्ये सहभागी होऊन शिकलेल्या गोष्टींवर आधारित विद्यार्थ्यांच्या नायकत्वाखाली प्रत्येक शाळेत कलिका हब्ब आयोजित केला जावा.




III. लर्निंग फेस्टची प्रक्रिया व कोपरे –

– लर्निंग फेस्टमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य व्यक्त करण्याची आणि विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत नवीन गोष्टी शिकण्याची उत्तम संधी मिळेल.
कलिका हब्ब मध्ये चार कोपरे आहेत.
1. पहिला कोपरा :- खेळ – गायन
या कोपऱ्यात भाषा कौशल्ये विकसित होतात.वयानुसार भाषाविषयक उपक्रम येथे दिले जातात.शब्दकोडी,चुटकुले,गाणी गाणे,
कथा तयार करणे आणि सांगण्याचे कौशल्य,नाटक तयार करणे आणि नाटक अभिनय करण्याचे कौशल्य विकसित होण्यासाठी या कोपऱ्यात विविध खेळ खेळल्यामुळे मुलाचा मेंदू आणि शरीराचे इतर बळकट होतील.विद्यार्थी केवळ गायन – खेळ कोपऱ्यात अतिशय प्रभावीपणे सहभागी होत नाही तर गटातील नवीन गोष्टी आनंदाने शिकतो.

२. दुसरा कोपरा :- कागद – कात्री रंग
येथे विद्यार्थी लहान मोठ्या बाहुल्या आणि पेपर कटिंगपासून विविध वस्तू बनवायला शिकतात.

3. तिसरा कोपरा :- करा – खेळा
येथे विद्यार्थ्यांची विज्ञान आणि गणित कौशल्ये विकसित होतात.विद्यार्थी आपापसात चर्चा करतात, तार्किक विचार करतात आणि स्वतःच समस्यांवर योग्य उपाय शोधतात. विद्यार्थी त्यांचे मत व्यक्त करण्यास मुक्त वातावरण असेल.प्रश्न, प्रयोग, निरीक्षण, नियोजन आणि इतर पद्धतींद्वारे प्राप्त केलेल्या माहितीचे परिशीलन करून मूल्यमापन करतात.

4. चौथा कोपरा:- आपण शहराभोवती/ गावाभोवती फिरू येथे चार गोष्टी आहेत.
A) एका झाडाचा अभ्यास करा
B) जैविक जग शोधूया
C) मुलाखत
D) नकाशा तयार करणे.



 
या चार विषयांसोबत इतर विषयही घेता येतील.
A) झाडाच्या अभ्यासात त्या झाडाची लांबी, रुंदी, उंची, घेर मोजून त्याची प्रत्यक्ष नोंद करणे म्हणजे गणिती संकल्पना झाडाचे वैज्ञानिक नाव,प्रादेशिक भाषेतील नाव,त्याचा उपयोग,ऑक्सिजन सोडण्याचेप्रमाण इत्यादीच्या सहाय्याने विज्ञानाची संकल्पना तयार करणे.त्या झाडाबद्दल विविध कवींनी लिहिलेल्या कविता,स्व-रचना,म्हणी,लोकगीते, ऐतिहासिक-पौराणिक कथांमध्ये नमूद केलेली भाषा संकल्पना,झाड, पान आणि साल चित्रनिर्मिती या अभ्यासातून विद्यार्थ्याला शिकायला मिळेल.
B) विद्यार्थी जैविक जग शिकून पर्यावरणप्रेमी बनतील.

C) मुलाखत :- येथे विद्यार्थ्यांना प्रचंड ज्ञान मिळते, प्रश्न विचारण्याची, बोलण्याची, वेगवेगळ्या परिस्थितीत वागण्याची आणि वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधण्याची कला नित्याची बनते. पुढच्या आयुष्यात पत्रकार म्हणून, माध्यमात मुलाखतकार म्हणून जगू शकता.

D) नकाशा- येथे मुलाला आपल्या घराचा,शाळा,शहराचा/गावाचा नकाशा कसा काढायचा हे कळते.दिशा, स्केल आणि चिन्हांद्वारे ओळखण्याच्या कल्पनेसह,नकाशा काढताना विचारात घेण्याचे महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थी शिकतील.



 

IV. कलिका हब्बची तयारीसाठी प्रशिक्षण :-

1. राज्यस्तरीय रहिवाशी कार्यागार 10.11.2022 ते 12.11.2022 3 दिवस
2. बेंगळुरू व म्हैसूर विभागातील जिल्ह्यांच्या MRP चे प्रशिक्षण – 14.11.2022 ते 16.11.2022 3 दिवस
3. बेळगावी व कलबुर्गी विभागातील जिल्ह्यांच्या MRP चे प्रशिक्षण 23.11.2022 ते 25.11.2022 3 दिवस
4. जिल्हास्तरीय प्रशिक्षण -12.12.2022 ते 22.12.2022 3 दिवस
5. तालुकास्तरीय प्रशिक्षण – 01.01.2023 ते 10.01.2023 3 दिवस

V. कलिका हब्ब कधी व कुठे –

1. क्लस्टर कलिका हब्ब 10.01.2023 ते 25.01.2023 2 दिवस
2. जिल्हा कलिका हब्ब 27.01.2023 ते 10.02.2023 3 दिवस

A. क्लस्टर स्तरावर आयोजन – 

        4103 क्लस्टर मध्ये 2 दिवसीय कलिका हब्ब आयोजित करणे.प्रती क्लस्टर व्याप्तीतील सरकारी हायस्कूल मुख्याध्यापकांवर क्लस्टर स्तरावरील कलिका हब्बची जबाबदारी असेल. सरकारी हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना क्लस्टर स्तरावरील कलिका हब्बसाठी 15000/- रुपये अनुदान जमा केले जाईल.क्लस्टरमधील सरकारी हायस्कूल/सर्वोत्तम प्राथमिक/उच्च प्राथमिक शाळा येथे क्लस्टर कलिका हब्बसाठी जागा नसल्यास क्लस्टर मधील इतर कोणत्याही ठिकाणी कलिका हब्ब आयोजित करावा. क्लस्टरमधील विविध सरकारी शाळांमधून 4थी ते 9वी पर्यंतचे एकूण 120 विद्यार्थी क्लस्टर लर्निंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतील.तालुकास्तरावर प्रशिक्षण घेतलेल्या 5 शिक्षकानी संपन्मुल व्यक्ती म्हणून हा उत्सव आयोजित करतील. विविध शाळा मधून विद्यार्थ्यांना कलिका हब्बसाठी घेऊन आलेल्या शिक्षकांनी या उत्सवातील कृती करण्यासाठी संपन्मुल व्यक्तींना मदत करावी.
     क्लस्टर स्तरावर कलिका हब्बचे आयोजन आणि यशस्वीतेची जबाबदारी सीआरपी आणि निवडलेल्या सरकारी हायस्कूलच्या मुख्याध्यापकांची असेल.कलिका हब्बसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना कलिका हब्बसाठी नेण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या शिक्षकांवर असेल.
समाज,लोकप्रतिनिधी,ग्रामपंचायत अध्यक्ष तसेच सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती,शाळेचे माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने गावातील शैक्षणिक उत्सव म्हणून साजरा करावा.




कलिका हब्ब मध्ये सहभागी होणाऱ्या मुलांची निवड

1. क्लस्टरमधील सर्व सरकारी प्राथमिक/उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा निवडीसाठी विचार केला जाईल.
2 इयत्ता 4थी ते 9वी च्या विद्यार्थ्यांचा विचार करावा.
3. सर्व समुदायातील विद्यार्थी असतील याकडे लक्ष द्यावे.
4. मुला-मुलींना समान संधी देणे.
5. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचा निवडीसाठी विचार करणे अनिवार्य असेल.
6. अध्ययनात मागास विद्यार्थ्यांचाही विचार करावा.

वरील बाबी लक्षात घेऊन, क्लस्टर मधील सर्व सरकारी प्राथमिक उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील किमान एक विद्यार्थी/विद्यार्थिनी (म्हणजे क्लस्टरची कोणतीही शाळा न वगळता)याप्रमाणे एकूण 120 विद्यार्थ्यांची निवड करणे .

B. जिल्हास्तरीय शिक्षण महोत्सव

    राज्यातील सर्व 35 जिल्ह्यांमध्ये हा जिल्हास्तरावरील कलिका हब्ब दिनांक 27.01.2023 ते 10.02.2023 या कालावधीत 3 दिवस चालणार असून,जिल्हा महोत्सवात इयत्ता 4 ते 9 वी पर्यंतचे एकूण 300 विद्यार्थी सहभागी होतील.विविध तालुक्यातील शाळेचे विद्यार्थी यजमान शाळेतील विद्यार्थ्यांच्या घरी 3 दिवस पाहुणे म्हणून एकत्र राहतील.




1. स्थळाची निवड
जिल्हा स्तरावरील कलिका साठी किमान 12 ते 15 वर्गखोली असणाऱ्या शाळा/कॉलेजची निवड करावी.मुलांचे उपक्रम राबवण्यासाठी पुरेशा खोल्या,खेळाचे मैदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे इ. मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात यावे.शिक्षक आणि संपन्मुल व्यक्तींसाठी निवास व्यवस्था,संध्याकाळी मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ठिकाण इत्यादी गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

2. मुलांची निवड:- जिल्हा स्तरावरील कलिका हब्बसाठी दोन पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करता येईल.
A.यजमानाची निवड
B.पाहुण्या मुलांची निवड-




A) यजमान मुलांची निवड:-
        जिल्हा स्तरावरील कलिका हब्बसाठी निवडलेल्या शहर अथवा गावातील सरकारी शाळेमध्ये 150 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील अशा शाळेतील विद्यार्थ्यांची (75 विद्यार्थी आणि 75 विद्यार्थिनी) निवड करून यादी तयार करणे.
        जर 90 विद्यार्थी + 60 विद्यार्थिनी असल्यास पाहुण्या मुलांची निवड त्याप्रमाणे करावी.निवडलेल्या शाळेत 150 विद्यार्थी नसल्यास जवळच्या शाळांच्या शाळा अभिवृद्धी समिती/विद्यार्थ्यांचे पालक यांची सभा घेऊन 150 (75 विद्यार्थी आणि 75 विद्यार्थिनी)यजमान मुलांची निवड करून यादी तयार करण्यात यावी.इयत्ता 4थी ते 9वी च्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना समान संख्येत संधी मिळेल याची काळजी घ्यावी.समाजातील सर्व मुलांना संधी मिळेल याची काळजी करून,15 मुलांचे 10 गट तयार करणे. प्रत्येक गटाला योग्य नावे देणे आणि त्या गटातील विद्यार्थ्यांच्या नाव व पत्त्यासह एक यादी तयार करणे.सर्व 150 यजमान मुलांना त्यांच्या गटाचे नाव माहित असले पाहिजे.त्यांचे नाव आणि पत्ता, फोन नंबर, अतिथी विद्यार्थ्यांचे नाव इत्यादी लिहिण्यासाठी जागेसह बॅज देण्यात यावे.यामुळे कलिका हब्बच्या दिवशी गट तयार करण्याचा वेळ वाचेल तसेच विद्यार्थ्यांची यादी तयार असल्याने,पाहुण्या मुलांनी शिबिरात येऊन वेळेवर नोंदणी करून यजमान मुलांशी जोडी बनवण्यास (वर्ग,लिंग इ. विचार करून) मदत होईल.यजमान मुलांनी शिबिरास येण्यापूर्वी त्यांनी मुकुट घालणे उपयुक्त ठरेल.




B. पाहुण्या मुलांची निवड
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 150 विद्यार्थ्यांची पाहूणे मुले म्हणून निवड करावी.क्लस्टर स्तरावरील कलिका हब्बमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना वगळून इतर विद्यार्थ्यांना संधी देणे.सर्व समुदायातील विद्यार्थ्यांना संधी मिळेल याची काळजी घ्यावी.4थी ते 9वी इयत्तेच्या मुलांना समान संख्येमध्ये संधी द्यावी.पाहुण्या मुलांची यादी ही यजमान मुलांच्या यादीशी ताळा होईल अशी करावी.
पाहुणे मुले शिबिरात येऊन नोंदणी करतात तेव्हा त्यांना बॅज देऊन ते कोणत्या गटामध्ये आहेत हे त्यांना सांगितले जाईल.बॅजवरील गटाचे नाव छापले पाहिजे.मुलांना या आधीपासून बनवलेल्या यजमान मुलांसह त्यांच्या गट खोल्यांमध्ये पाठवणे.जिथे त्या गटातील यजमान मुले स्वागत करतील आणि त्यांना मुकुट कसा बनवायचा ते शिकवतील.5 ते 6 मुलांसाठी एक शिक्षक नियुक्त करणे ज्या ठिकाणी जिल्हा अध्ययन महोत्सव आहे त्याठिकाणी विद्यार्थ्यांना आणणे.शक्‍यतो क्लस्टर स्तरावरील संपन्मुल व्यक्तींची नियुक्ती करावी.त्यांचे अनुभव हे जिल्ह्याचे शिक्षण
उत्सवात वापरता येईल.

VI.पाहुण्या आणि यजमान मुलांची संघटना:-

    यजमान व यजमान मुलांची संपूर्ण माहिती नोंदवावी.कोणता विद्यार्थी/कोणती विद्यार्थिनी कोणत्या विद्यार्थ्याच्या/ विद्यार्थिनीच्या घरी गेला आहे त्यांच्या पालकांचा पत्ता,फोन नंबर,कोणत्या शिक्षकाने त्यांना शिबिरात आणले,शिक्षकाचे नाव,शाळा,फोन नंबर इ. नोंद करणे.मुलाच्या पालकांशी तसेच शिबिरात घेऊन आलेल्या शिक्षकांशी बोलण्याची सुविधा उपलब्ध करून देणे.



VII.स्वागत समितीची रचना :-

    कलिका हब आयोजित शहर किंवा गावातील लोकप्रतिनिधी गावातील वडीलधारी मंडळी,युवक,माजी विद्यार्थ्यांचे मंडळ/संघ, जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील सरकारी तर स्वयंसेवी संस्था (N.G.O.),वैद्य,शिक्षक, अधिकारी यांची एकत्रित स्वागत समितीची रचना करणे.या स्वागत समितीची सभा घेऊन कलिका हब्बसंबंधी चर्चा करणे व कलिका हब्ब चे नियोजसाठी समुदायाचे तसेच लोकप्रतिनिधीच्या मार्फत करणे. कलिका हब्बच्या आयोजनामध्ये समुदायाला पूर्णपणे सहभागी करून घेणे. सजावट,जेवण व्यवस्था,साहित्य,मुलांची सुरक्षा इत्यादी उपसमिती तयार करणे आणि जबाबदारीची योग्य विभागणी करणे.




VIII.सजावट आणि परिसराची तयारी –

    ज्या ठिकाणी कलिका हब्ब आयोजीत केला आहे ती जागा मुलांना आकर्षक वाटेल अशा क्रियाशील आणि कलात्मक पद्धतीने सजवली पाहिजे.यासाठी स्थानिक विद्यार्थी/विद्यार्थिनी,एनसीसी विद्यार्थी,एनजीओ,माजी विद्यार्थी यांची मदत घेऊन प्लास्टिकचे बॅनर न वापरता स्थानिक पातळीवर कापडी किंवा कागदी बॅनर वापरणे.मलखांब,दोरीचा खांब इ.जिथे मिळेल अशा शाळांच्या आवारात कलिका हब्ब आयोजित करणे. त्याठिकाणी उपलब्ध विविध रंगाचे पन्नास मीटर कापड आवारात बांधून मुलांना त्यावर स्वतःची चित्रे काढण्यासाठी प्रोत्साहन देणे.ही एक सुंदर सजावट होईल.परिसराची एकूण सजावट कलात्मक,विद्यार्थीस्नेही, पर्यावरणपूरक आणि आकर्षक असावी.




IX.आरोग्य विभागाची मदत:

स्थानिक आरोग्य विभागाच्या मदतीने प्रथमोपचार किट आणि आरोग्य विभाग सहाय्यकांची व्यवस्था करणे.


X. मदत केंद्र :-

वेळोवेळी विद्यार्थी,शिक्षक आणि इतर सहभागी व्यक्तींना
आवश्यक माहिती येथे उपलब्ध असावी:मदत केंद्र
कायमस्वरूपी सुरू असावे.




XI.संपन्मुल व्यक्तींची निवड आणि तयारी:-

    किमान 20 ते 25 संपन्मुल व्यक्तींची निवड करावी.त्यामध्ये चित्रकला,नाट्य,चित्रपट कलाकार,गायक,कलाकार शिक्षक निवडावे.आधीच प्रशिक्षित एसआरपी,एमआरपी, टीआरपी,क्लस्टर संपन्मुल व्यक्ती आहेत याची खात्री करणे.जबाबदारीचे योग्यरित्या नियोजन करणे आणि चांगली तयारी करणे.

XII. शिबिरांचे उद्घाटन आणि समारोप :-

    कलिका हब्बचा शुभारंभ अर्थपूर्ण आणि सोपा असावा. त्यासाठी जास्त वेळ घालवू नये.उद्घाटन सोहळ्याची वाट पाहत बसलेले विद्यार्थी शिबिरात येताच उपक्रम सुरू करणे. सर्व विद्यार्थी सहभाग घेऊन उद्घाटन संपल्यानंतर उपक्रमाच्या सुरुवात होण्याची वाट पाहू नये.मुलं शिबिरात येताच विभागीय उपक्रमात सहभागी होतील.उद्घाटन समारंभात लांबलचक भाषणे आणि सन्मान नसतील. मुलांना मुकुट घालून पॅराशुट किंवा रॉकेटचे प्रक्षेपण करून एखाद्या उपक्रमाने उद्घाटनाचे आयोजन करणे.उद्घाटन आणि समारोप संक्षिप्त व सोप्या पद्धतीने होईल याकडे लक्ष द्यावे.




XIII. उपक्रम कोपरे (खोल्या):-

    कलिका हब्बमधील चार उपक्रम म्हणजे कोपरे (खोल्या) आधीच नियोजन करणे.एका गटात 30 पेक्षा जास्त मुले नाहीत याची खात्री करणे.पाहुणे आणि यजमान मुले एकाच गटात आहेत याची खात्री करणे.यामुळे केवळ त्यांचे बांधव्य विकसित होणार नाही तर परस्पर सहकार्य आणि समजूतदारपणा देखील विकसित होईल.
उपक्रम करत असताना मुलांच्या हातात कोणतीही धारदार/घातक वस्तू देऊ नये,शिक्षकांनी त्यांचा वापर करून मुलांना मदत करावी व अशा वस्तू शिक्षकानी स्वतःजवळ ठेवाव्यात.मुलांना घेऊन आलेले शिक्षकही या उपक्रमात पूर्णपणे सहभागी होतील.

प्रशिक्षणासाठी आवश्यक अध्ययन सामग्री (120 लोकांसाठी)






 

XIV.अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या:-

A.जिल्हा उपनिर्देशक प्रशासकीय तसेच कलिकासाठी नियोजित जिल्हा नोडल अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या-

B. क्षेत्र शिक्षणाधिकारी तसेच क्षेत्र समन्वय अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या

C. सीआरपींच्या जबाबदाऱ्या –




D.क्लस्टर स्तरीय कलिका नियोजनाची जबाबदारी असलेल्या सरकारी शाळेतील मुख्याध्यापकांची जबाबदारी –
1. कलिका हब्बसाठी जागेची निवड करणे
2. आवश्यक खुल्या खेळाचे मैदान जेवणाची व्यवस्था पिण्याचे पाणी इत्यादी सर्व मूलभूत सुविधांची व्यवस्था करणे.
3. क्लस्टर मधील प्रशिक्षण घेतलेले संपन्मुल व्यक्ती तसेच तालुका संपन्मुल व्यक्ती यांच्याशी चर्चा करून तसेच कलिका मार्गदर्शीकेनुसार उपक्रमासाठी आवश्यक साहित्यांची व्यवस्था करणे.
4. स्वागत समिती सजावट जीवनाची व्यवस्था साहित्य विद्यार्थ्यांची सुरक्षा इत्यादी समित्यांची रचना करणे.परिणामकारकपणे कार्य पार पाडण्यासाठी समितीना प्रोत्साहन देणे.
5. मदत केंद्राचे नियोजन करून विद्यार्थी शिक्षक किंवा पालकांना कोणताही त्रास होणार नाही गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यावी.
6. एसडीएमसी पालक सभा घेऊन कलिका हब्बची पूर्वतयारी करणे.
7. लोकप्रतिनिधी समुदाय पालक जास्त प्रमाणात सहभागी होतील यासाठी सीआरपीनी सहकार्य करणे.
8. राज्य कार्यालयातून वेळोवेळी येणारे आदेशांचे पालन करणे.
9. कलिका साठी मंजूर अनुदानाचे पारदर्शकपणे खर्च करणे व कलिका पार पडणे कलिका उपक्रमानंतर दहा दिवसाच्या आत उपयोगीता प्रमाणपत्र सीआरपी यांचे कडून क्षेत्र शिक्षणाधिकारी यांना सादर करणे.



 

XV. अनुदानाचे विवरण –

1.जिल्हा आणि तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी खर्च 290 रुपये असेल.कलिका हब्बशी संबंधित शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी विशेष 100 रुपये देण्यात आले आहेत.

2.क्लस्टर हब्बसाठी प्रत्येक क्लस्टर ला रु. 15,000/- प्रमाणे जबाबदार घेतलेल्या सरकारी हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना जमा केले जातील. जर क्लस्टरमध्ये सरकारी हायस्कूल नसेल तर नजीकच्या सरकारी हायस्कूल मुख्याध्यापकांना जबाबदारी देणे.

3. जिल्हास्तरीय कलिका हब्बसाठी 3,15,000/- रुपये जमा केले जातील.



 
निष्कर्ष -:
        कलिका हब्बमध्ये मुलांना नवीन गोष्टी शोधण्यासाठी, शिकण्यासाठी,पाहण्यासाठी,विचार करण्यास आणि आनंद घेण्यासाठी प्रेरित करणारे उपक्रम डिझाइन केले आहेत.कलिका हब्बमध्ये सहभागी होणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना उपक्रमात सहभागी करून घेणे.स्पर्धा आणि भाषणा या कार्यक्रमात नसून सर्व मुलांना समान संधी दिली जाते.
कलिका हब्ब मार्गदर्शिकेत कलिका हब्ब आणि उपक्रमांची माहिती दिली जाईल.सर्व अंमलबजावणी अधिकाऱ्यांना कलिका हब्ब संबंधित प्रशिक्षण घेण्याचे आणि शिक्षण महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

CLICK HERE FOR CIRCULAR




Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *