School Prayer Songs And School Songs (शैक्षणिक व प्रार्थना गीते)




 
School Prayer Songs And School Songs (शैक्षणिक व प्रार्थना गीते)


प्रार्थना / गीताचे नाव –  
सत्यम् शिवम् सुंदरा..


 

सत्यम् शिवम् सुंदरा

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

सत्यम् शिवम् सुंदरा ॥धृ॥

शब्दरूप शक्ती दे

भावरूप भक्ती दे

प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा-

चिमणपाखरा – ज्ञानमंदिरा

सत्यम् शिवम् सुंदरा ॥१॥

विद्याधन दे अम्हांस

एक छंद, एक ध्यास

नाव नेई पैलतिरी दयासागरा –

दयासागरा – ज्ञानमंदिरा सत्यम् शिवम् सुंदरा ॥२॥

होऊ आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत

कीर्तिचा कळस जाय उंच अंबरा

उंच अंबरा – ज्ञानमंदिरा

सत्यम् शिवम् सुंदरा ॥३॥


शालेय प्रार्थना,गीते ऐका व डाऊनलोड करा.

➖➖➖➖♾️➖➖➖➖


















 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *