इयत्ता – आठवी
विषय – समाज विज्ञान
विभाग – इतिहास
प्रकरण 13. राज्यशास्त्राचा अर्थ व महत्व
सुधारित 2024 पाठ्यपुस्तकानुसार
I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. ‘पॉलिटीक्स‘ हा शब्द या ग्रीक शब्दापासून आला आहे पोलीस.
2. रिपब्लिक हे पुस्तक प्लूटो यांचे आहे.
3. ऑरिस्टॉटलने राज्यशास्त्रावर लिहिलेल्या पुस्तकाला पॉलिटिक्स म्हणतात.
4. कौटिल्याचे राज्याशास्त्राशी संबंधित लिहिलेले पुस्तक अर्थशास्त्र
II. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
5. राज्यशास्त्र म्हणजे काय ?
उत्तर – राज्याचा उगम,विकास,स्वरुप,राज्यपद्धती,हक्क,कर्तव्य यांचा अभ्यास म्हणजे राज्यशास्त्र.
6. राज्यशास्त्राचा पद्धतशीर अभ्यास कोणी सुरु केला?
उत्तर – राज्यशास्त्राचा पद्धतशीर अभ्यास ग्रीकांनी केला.
7. ‘राज्यशास्त्राचा जनक‘ कोणाला म्हणतात?
उत्तर – राज्यशास्त्राचा जनक असे ॲरिस्टॉटलला म्हणतात.
8. राज्यशास्त्राची एक व्याख्या सांगा.
उत्तर – राज्यशास्त्र म्हणजे राज्याचे चौफेर अध्ययन होय.
9. राज्यशास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला कोणता फायदा होतो?
उत्तर – राज्यशास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला खालील फायदे होतात -:
➤राज्याचा विकास समजतो.
➤ राज्याच्या घडामोडी समजतात.
➤ राज्यघटना कायद्याचे ज्ञान राज्यशास्त्रामुळे मिळते.
➤ लोक राजकीयदृष्ट्या सक्षम बनतात.
➤ उत्तम नेतृत्व व नागरिक करतात.
➤ आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण होते.
➤ राजकीय पक्ष,स्थानिक
➤ स्वराज्य संस्थांची माहिती मिळते. लोकांच्या समस्या समजतात.
➤ सरकारच्या कार्याचा आढावा मिळतो.
प्रकरण 1 – साधने या पाठाची प्रश्नोत्तरे – CLICK HERE