चौथी ते दहावी वर्गांचे मूल्यमापन वेळापत्रक
कर्नाटकातील राज्य पाठ्यक्रम शाळेतील चौथी ते दहावी वर्गांचे सन 2022-23 या वर्षाचे मूल्यमापन वेळापत्रक –
मूल्यमापन वेळापत्रक पाहण्यापूर्वी महत्वाच्या गोष्टी –
शाळा प्रारंभ उत्सव शाळा पूर्वतयारी सभा विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि सभेमध्ये अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमाचा परिचय व चर्चा करून त्यासंबंधी योग्य निर्णय घेणे.
17.05.2022 पासून अध्ययन पुनर्प्राप्ती वर्षाच्या अंमलबजावणीसाठी मागील वर्षांच्या सामर्थ्यावर आधारित तयार केलेल्या अध्ययन पुस्तिका विषयानुसार व इयत्तेनुसार वर्गामध्ये वापरणे तसेच या उपक्रमासाठी तयार केलेल्या शिक्षक हस्तपुस्तिकेचे शिक्षकांनी अध्ययन करणे.
2022-23 या वर्षात मूल्यमापनासाठी मूल्यमापन व संकलित मूल्यमापनाचे नियोजन करणे.
प्रथम आकारिक मूल्यमापन FA-1 – संबंधित इयत्तेचे विषयानुसार निर्धारित LO (Learning Outcomes- अध्ययन निष्पत्ती)पैकी शेकडा 25 टक्के अध्ययन निष्पत्तीचा विचार करणे. याप्रकारे उर्वरित इतर FA मूल्यमापन करताना शेकडा 25 अध्ययन निष्पत्तीचा विचार करणे.याला संबंधित या अध्ययन पत्रकातील पूर्ण केलेल्या कृतींवर आधारित ग्रेड देऊन त्यांची नोंद ठेवणे.
उदा.एकाविद्यार्थ्याने 8 कृतीमध्ये एकूण किती टक्के कृती पूर्ण केल्या आहेत हे ठरवून.त्यावर आधारित ग्रेड देणे.
विद्यार्थी संचयिका (CHILD PROFILE) मध्ये संबंधित अध्ययन पत्रके ठेवणे.याप्रमाणे FA 2,3,4 मध्ये ग्रेडची नोंद करून वार्षिक निकालांमध्ये त्यांचा समावेश करणे.
2022-23 या शैक्षणिक वर्षात संकलित मूल्यमापन 1 आणि 2 मध्ये संबंधित इयत्ता आणि विषयांच्या 50 टक्के अध्ययन निष्पत्तींचा विचार करणे.
शिक्षकांनी 2022-23 या वर्षांमधील अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी
अध्ययन पुस्तिकेतील कृतीवर आधारित पाठ योजना,घटक योजना तयार करणे.
इयत्ता दहावीसाठी मागील शैक्षणिक वर्षातील सेतुबंध कार्यक्रम 2022-23 वर्षांमध्ये आहे तसाच सुरू ठेवावा.
इयत्ता पहिली ते नववी मूल्यमापन वेळापत्रक
नैदानिक अवलोकन आणि प्रगतीची नोंद ठेवणे-
विवरण | चालू शैक्षणिक वर्षात नैदानिक लिखित परीक्षा असणार नाही नैदानिक चर्चा वाचन-लेखन यांच्या माध्यमातून पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेणे.या नैदानिक अवलोकनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीची नोंद ठेवणे.या कार्यामध्ये भाषा आणि गणित विषयांच्या मूलभूत अध्ययन निष्पत्तीवर आधारित अवलोकन करण्यास जास्त प्राधान्य देणे. मागील दोन वर्षातील झालेल्या अध्ययन नसते वर आधारित अध्ययन हस्तपुस्तिका तयार केल्या असून त्यांची पूर्वतयारी म्हणून पहिल्या आठवड्यात अध्ययन निष्पत्तीचे मूलभूत पुनर्बलन कार्य,विद्यार्थ्यांची मानसिक तयारी व भावनिक सुरक्षितता हे कार्य करणे. |
गुण | —- |
कालावधी | शाळा सुरु झाल्यावर पहिल्या आठवड्यात |
आकारिक मूल्यमापन -1 (FA-1 )
विवरण | संबंधित इयत्तेचे विषयानुसार निर्धारित LO (Learning Outcomes- अध्ययन निष्पत्ती)पैकी शेकडा 25 टक्के अध्ययन निष्पत्तीचा विचार करणे. तयार केलेल्या अध्ययन हस्तपुस्तिका मूल्यमापनाचे स्त्रोत म्हणून तयार केलेल्या असून विद्यार्थी संचयिका मध्ये त्यांचा संग्रह ठेवणे. अत्यंत पत्रिकांचा संग्रह करून त्यांचे अवलोकन करून त्यांचे 15पैकी अंकामध्ये रूपांतर करणे. इयत्ता नववीसाठी गरज असल्यास लिखित परीक्षा घेऊन त्यांचे आकारिक मूल्यमापन (FA) करणे. |
गुण | 15 गुण |
दिनांक – | 18 -07 -2022 ते 20-07-2022 |
आकारिक मूल्यमापन -2 (FA-2)
विवरण | द्वितीय आकारिक मूल्यमापन FA-2 – संबंधित इयत्तेचे विषयानुसार निर्धारित LO (Learning Outcomes- अध्ययन निष्पत्ती)पैकी शेकडा 25 टक्के अध्ययन निष्पत्तीचा विचार करणे. तयार केलेल्या अध्ययन हस्तपुस्तिका मूल्यमापनाचे स्त्रोत म्हणून तयार केलेल्या असून विद्यार्थी संचयिका मध्ये त्यांचा संग्रह ठेवणे. अत्यंत पत्रिकांचा संग्रह करून त्यांचे अवलोकन करून त्यांचे 15पैकी अंकामध्ये रूपांतर करणे.गरज असल्यास लिखित परीक्षा घेऊन त्यांचे आकारिक मूल्यमापन (FA) करणे. |
गुण | 15 गुण |
दिनांक – | 22 -09 -2022 ते 24-09-2022 |
संकलित मूल्यमापन – 1 (SA-1)
विवरण | यावर्षी अध्ययन पुस्तिकेमध्ये निर्धारित एकूण अध्ययन निष्पत्तीच्या संख्यांच्या 50% अध्ययन निष्पत्ती वर आधारित लेखी परीक्षा घेणे.लेखी परीक्षेतील प्रश्न सामर्थ्य आधारित किंवा अध्ययन निष्पत्तीवर आधारित असावेत. इयत्ता 1 ते 5 20 गुण लेखी परीक्षा + 20गुण तोंडी परीक्षा = 40 गुणांची SA-1 परीक्षा घेणे व नंतर त्यांचे 20पैकी रूपांतर करणे. इयत्ता 1 ते 5 -(इंग्रजी) इंग्रजी भाषेची SA-1 परीक्षा 10 लेखी + 30 तोंडी = 40 गुणांची परीक्षा घेणे व नंतर त्यांचे 20पैकी रूपांतर करणे. इयत्ता सहावी ते आठवी – लेखी परीक्षा 30 गुण + तोंडी परीक्षा 10 गुण = 40 गुणांची परीक्षा घेणे व त्याचे 20 मध्ये रूपांतर करणे. इयत्ता नववीसाठी इयत्ता दहावीप्रमाणे परीक्षा घेणे. |
गुण | 20 गुण |
दिनांक – | 17 -10 -2022 ते 25-10-2022 |
आकारिक मूल्यमापन -3 (FA-3 )
विवरण | संबंधित इयत्तेचे विषयानुसार निर्धारित LO (Learning Outcomes- अध्ययन निष्पत्ती)पैकी शेकडा 25 टक्के अध्ययन निष्पत्तीचा विचार करणे. तयार केलेल्या अध्ययन हस्तपुस्तिका मूल्यमापनाचे स्त्रोत म्हणून तयार केलेल्या असून विद्यार्थी संचयिका मध्ये त्यांचा संग्रह ठेवणे. अत्यंत पत्रिकांचा संग्रह करून त्यांचे अवलोकन करून त्यांचे 15पैकी अंकामध्ये रूपांतर करणे. इयत्ता नववीसाठी गरज असल्यास लिखित परीक्षा घेऊन त्यांचे आकारिक मूल्यमापन (FA) करणे. |
गुण | 15 गुण |
दिनांक – | 26 -12 -2022 ते 28-12-2022 |
आकारिक मूल्यमापन -4 (FA-4)
विवरण | आकारिक मूल्यमापन FA-4 – संबंधित इयत्तेचे विषयानुसार निर्धारित LO (Learning Outcomes- अध्ययन निष्पत्ती)पैकी शेकडा 25 टक्के अध्ययन निष्पत्तीचा विचार करणे. तयार केलेल्या अध्ययन हस्तपुस्तिका मूल्यमापनाचे स्त्रोत म्हणून तयार केलेल्या असून विद्यार्थी संचयिका मध्ये त्यांचा संग्रह ठेवणे. अत्यंत पत्रिकांचा संग्रह करून त्यांचे अवलोकन करून त्यांचे 15पैकी अंकामध्ये रूपांतर करणे.गरज असल्यास लिखित परीक्षा घेऊन त्यांचे आकारिक मूल्यमापन (FA) करणे. |
गुण | 15 गुण |
दिनांक – | 04 -02 -2023 ते 06-02-2023 |
संकलित मूल्यमापन – 2 (SA-2)
विवरण | यावर्षी अध्ययन पुस्तिकेमध्ये निर्धारित एकूण अध्ययन निष्पत्तीच्या संख्यांच्या 50% अध्ययन निष्पत्ती वर आधारित लेखी परीक्षा घेणे.लेखी परीक्षेतील प्रश्न सामर्थ्य आधारित किंवा अध्ययन निष्पत्तीवर आधारित असावेत. इयत्ता 1 ते 5 20 गुण लेखी परीक्षा + 20गुण तोंडी परीक्षा = 40 गुणांची SA-2 परीक्षा घेणे व नंतर त्यांचे 20पैकी रूपांतर करणे. इयत्ता 1 ते 5 -(इंग्रजी) इंग्रजी भाषेची SA-2 परीक्षा 10 लेखी + 30 तोंडी = 40 गुणांची परीक्षा घेणे व नंतर त्यांचे 20पैकी रूपांतर करणे. इयत्ता सहावी ते आठवी – लेखी परीक्षा 30 गुण + तोंडी परीक्षा 10 गुण = 40 गुणांची परीक्षा घेणे व त्याचे 20 मध्ये रूपांतर करणे. इयत्ता नववीसाठी इयत्ता दहावीप्रमाणे परीक्षा घेणे. |
गुण | 20 गुण |
दिनांक – | 01 -04 -2023 ते 05-04-2023 |
परीक्षा | गुण |
FA – 1 | 15 |
FA – 2 | 15 |
SA -1 | 20 |
FA -3 | 15 |
FA -4 | 15 |
SA -2 | 20 |
TOTAL MARKS | 100 |
पहिली ते आठवी इयत्ताचा निकाल समुदायदत्त शाला कार्यक्रमांमध्ये जाहीर करणे.
इयत्ता दहावी मूल्यमापन वेळापत्रक
सविस्तर माहितीसाठी खालील आदेश पहा –
अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रम 2022-23 प्रशिक्षणसंबंधी
आदेश दि. 26-04-2022
2022-23 मध्ये 1ली ते 10 वी शाळेची वेळ असेल 10.00 ते 4.20
असे असेल नियोजन
https://bit.ly/3K2KDRp
16 मे 2022 पासून शाळा सुरू
येत्या शैक्षणिक वर्षात क्रियाकलाप व No Bag Day साठी उपक्रम यादी
शाळेतील राष्ट्रीय दिन व इतर कार्यक्रमाचे नियोजन
2022-23 या शैक्षणिक वर्षातील परीक्षा,मूल्यमापन,प्रतिभा कारंजी,क्रीडा स्पर्धा व इतर उपक्रम नियोजन
सन 2022-23 शैक्षणिक वर्ष नियोजन
महिनावार शाळा चालू दिवस व सुट्टीचे दिवस
IMP NOTES,PDF, LINKS
GPT RECRUITMENT 2022 RELATED SYLLABUS BOOKS,NOTES
https://bit.ly/3ENdVCK
1st To 12th Textbooks,Grammar,Computer, Science,SS, Kannada subjects’ material
6वी ते 8वी विद्यार्थ्यासाठी अवांतर वाचन पुस्तके
1ली ते 5वी विद्यार्थ्यासाठी अवांतर वाचन पुस्तके
⚜️ऐतिहासिक पुस्तके
प्रसिध्द 400 हून जास्त पुस्तके वाचण्यासाठी येथे स्पर्श करा..
स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके
1976 पासूनची किशोर मासिके
बालगोष्टी
1ली ते 12वी पुस्तके
https://bit.ly/3fHfXZT
मराठी व्याकरण
इंग्रजी व्याकरण