Learning Recovery Programme (ಕಲಿಕಾ ಚೇತರಿಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ) 2022-23




             




State – KARNATAKA

File Name – Learning Recovery Programme

Class –  1 TO 10 

File Format – PDF

DEPARTMENT – EDUCATION 

 




 

 

2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रम अंमलबजावणी करणे बाबत.. आदेश – दि. 04/०३/२०२२

 

 

कोविडमुळे राज्यातील सर्व शाळेमध्ये भौतिक वर्ग निरंतरपणे चालू नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती प्रतिकूल परिणाम झालेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात निर्माण झालेले अंतर भरून काढण्यासाठी व पुढील वर्गातील शैक्षणिक प्रक्रिया सुलभ होण्यासाठी पहिली ते नववी विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला चालना देण्यासाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रम (Learning Recovery Programme) आयोजित करण्यात येत आहे.




 


कार्यक्रमाचे ध्येय –
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्देशानुसार पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचा पाया तयार करणे.

2022-23 हे शैक्षणिक वर्ष अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष म्हणून घोषित करून राज्यव्यापी एकरूप शिक्षण प्रक्रियेची अंमलबजावणी करणे.

सर्व विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजावर लक्ष केंद्रित करून अध्ययन प्रक्रियेला पूरक होण्यासाठी विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणे.

सर्व विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता,संख्याज्ञान आणि या आधीच्या दोन वर्गातील साध्य करावयाची महत्त्वाची अध्ययन फळे व सध्याच्या वर्गातील सर्वात महत्वाचे अध्ययन फळे साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे.

एकंदरीत,प्रत्येक विद्यार्थ्याने 2023-24 या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या वर्गातील अभ्यासाची पातळी गाठली पाहिजे.

अध्ययन पुनर्प्राप्ती ही मुलांना मागील वर्गातील आणि सद्याच्या वर्गातील अध्ययन सामर्थ्य शिकवण्याची प्रक्रिया आहे.





अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रम  २०२२-२३ मधील महत्वाचे मुद्दे :
गेल्या अठरा महिन्यात मुले न शिकताच पुढील वर्गात गेली आहेत त्या दोन वर्गातील अभ्यासक्रमावर आधारित एक पुस्तक तयार करण्यात येईल.

निरंतर शिक्षण म्हणजे 2022-23 हे पूर्ण वर्षभर अध्ययन प्रक्रिया.

अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रमाला संबंधित सर्व विषयांचे 2 दिवसांचे प्रशिक्षण सर्व शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत देण्यात येणार आहे.

प्रत्येक शिक्षकांना प्रत्येक विषयाला संबंधित 40-50 पानी माहिती पुस्तिका देण्यात येणार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाची अभ्यास पुस्तिका देण्यात येणार ही पुस्तिका 140-160 पानी असून ती विद्यार्थ्यांनी सोडवल्यानंतर विद्यार्थी संचयिका मध्ये ठेवणे.

पहिल्या पाठाचे सामर्थ्य व सहाव्या पाठाचे सामर्थ्य एकच असेल तर कोणत्याही एकाच सामर्थ्याची निवड करणे.

अध्ययन पुनर्प्राप्ती ही योजना विद्यार्थ्याना स्वयं अध्ययन करण्यास मदत करणारी आहे.

या अभियानाचे महत्व मुख्यतः पालकांना पटवून देणे गरजेचे आहे.

या आपण सर्वांनी मिळून आमच्या शाळेतील मुलांना दर्जेदार शिक्षणावर भर देऊन हे अभियान यशस्वी करूया.




मूल्यमापन प्रक्रिया २०२२-२३ :

 

अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रम (Learning Recovery Programme) अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया:

 

      चालू शैक्षणिक वर्षातील इयत्ता 1 ते 9 च्या मूल्यमापन प्रक्रिया सद्या चालू असलेल्या शाळा-आधारित मूल्यमापन (CCE) प्रमाणे होईल.परंतु हे मूल्यमापन चालू शैक्षणिक वर्षासाठी पुनर्रचित अध्ययन फळे,अभ्यासपुस्तिका व वर्गात आयोजित विविध कृतींमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग यावर आधारित करण्यात यावे.मूल्यमापनसंबंधी आवश्याक मार्गदर्शी सविस्तर सांगण्यात येईल.

इयत्ता 10 वी चे मूल्यमापन – 

  2021-22 या शैक्षणिक वर्षातील सेतुबंध कार्यक्रम 2022-23 वर्षामध्ये आहे तसा सुरु ठेवावा.रुपनात्मक मूल्यमापन व इतर कृती मागील वर्षीप्रमाणे आहे तशा सुरु ठेवून विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षेसाठी तयारी करून घेणे.




 

अधिक माहितीसाठी खालील आदेश………………




 

 





 

 

 

 




Share with your best friend :)