सजीव सृष्टी
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) सजीव म्हणजे काय ?
उत्तर — ज्याला जीव असतो त्याला सजीव म्हणतात.
2) निर्जीव कशाला म्हणतात ?
उत्तर – ज्याला जीव नसतो त्याला निर्जीव असे म्हणतात.
3) सजीवांची वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर – 1) सजीव पेशी पासून बनले आहे.
2 ) सजीव श्वसन करतात.
3) सजीव अन्नग्रहण करतात.
4) सजीव पुनरुत्पादन करतात.
5) सजीवांची वाढ होते.
6) सजीव हालचाल करतात.
7) सजीव उत्सर्जन करतात.
8) सजीवांना आयुर्मर्यादा
असते.
(4) प्रकाश संश्लेषण म्हणजे
काय?
उत्तर– वनस्पती पानातील हरितद्रव्य याच्या साह्याने सूर्य प्रकाशाच्या मदतीने हवेतील कार्बन-डाय-ऑक्साईड पाणी शोषून घेऊन आपले अन्न तयार करण्याच्या क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात.
5) आहाराच्या आधारावर प्राण्यांचे तीन प्रकार कोणते ?
उत्तर — शाकाहारी,मासाहारी,मिश्रहारी हे प्राण्यांचे
आहाराच्या आधारावर तीन प्रकार होतात
6) मांसाहारी प्राणी कोणते?
उत्तर – सिंह,लांडगा,कोल्हा,वाघ,चिता,बिबट्या इत्यादी मांसाहारी प्राणी होत.
7) मिश्राहारी प्राणी कोणते
उत्तर – मांजर,कुत्रा,मासा,गरुड,मनुष्य इत्यादी मिश्राहारी प्राणी होत.
8) वनस्पतीचे प्रकार कोणते?
उत्तर – 1) एक वर्षीय वनस्पती
2) दोन वर्षीय वनस्पती
3) बहुवर्षीय वनस्पती तीन प्रकार होत
9) एकदल वनस्पती चे उदाहरणे सांगा
उत्तर – जोंधळा गहू भात नाचना इत्यादी
10) द्विदल धान्यांचे उदाहरणे सांगा.
उत्तर – मसूर,भुईमूग,तूर,हरभरा,उडीद इत्यादी