सेतुबंध पूर्व परीक्षा 2021-22
इयत्ता – पाचवी
विषय
– गणित
लेखी परीक्षा
1. दिलेल्या आकृतीची परिमिती काढा.
2. 3,704 ही संख्या
अक्षरात लिहा.
3. 2684, 7712, 3196, 8023 या संख्या चढत्या क्रमाने लिहा.
4. 3,784 + 2,809 किंमत
काढा.
5. 7,986 – 3,243 वजाबाकी
करा.
6.324×4 वजाबाकी करा.
7.6084÷4 भागाकार करा.
8. 786 ही संख्या 100 च्या
पटीत अंदाजे लिहा.
9. भौमितिक उपकरणांचा
उपयोग न करता वर्तुळ रचा.
10. रंगवलेला भाग
अपूर्णांकात लिहा.
11. रश्मी जवळ 9 लिटर 15 लिटर आणि 20 लिटर आकाराच्या तीन
बकेट आहेत.त्या सर्वा बकेटमध्ये एकूण किती लिटर पाणी साठवता येईल?
12. वस्तूचे वजन…….आणि
………मध्ये सांगतात.
13.6 मीटर = ……..
सेंटिमीटर
14. 10,11,13,16,20,..,..,38,..,.. संख्या
श्रेणी पूर्ण करा.
तोंडी परीक्षा
15. सतीश पुस्तकांच्या
दुकानात गेला. त्याच्याकडे 40रुपये होते.त्या मधील 25 रुपयांची पुस्तके विकत घेतली तर
सतीशकडे उरलेले पैसे किती?
16. घड्याळ पाहून वेळ
सांगा. (शिक्षक विद्यार्थ्यांना घड्याळ दाखवून वेळ विचारतील.)
17. रेल्वे वेळापत्रक आज
रेल्वे जाण्याची वेळ 18 तास अशी आहे तर 12 तासांच्या घड्याळांमध्ये रेल्वे
जाण्याची वेळ सांगा.
18. श्रीनिका दिनांक
03.10.2019 ते दिनांक 07.10.2019 पर्यंत आपल्या शाळेच्या सहलीला जात आहे.तर ती
एकूण किती दिवस शाळेच्या सहलीला जात आहे.
19. शिक्षक खालील खालील टप्प्यातील स्तंभालेख दाखवून
विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतील..(प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारणे.)
1. सर्वात जास्त विद्यार्थ्यांना आवडलेला नाष्टा कोणता?
2.8 पेक्षा कमी व 6
पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आवडलेला नाष्टा कोणता?
3.4 पेक्षा जास्त 7 पेक्षा
कमी विद्यार्थ्यांना आवडलेला नाष्टा कोणता?
4.सर्वात कमी
विद्यार्थ्यांना आवडलेला नाष्टा कोणता?
5.पुरी खाल्लेल्या
विद्यार्थ्यांची संख्या किती?